उड्या तर मारून दाखवणारच! लहान मुलांच्या Bouncy Castleमध्ये कसा घुसतो तरूण? हसवणारा Viral video पाहा

उड्या तर मारून दाखवणारच! लहान मुलांच्या Bouncy Castleमध्ये कसा घुसतो तरूण? हसवणारा Viral video पाहा
Bouncy Castleमध्ये जाण्यापासून तरुणाला रोखणारा गार्ड
Image Credit source: Youtube

Funny video : लहान मुलांचे (Kids) व्हिडिओ (Video) पाहिले, की लहानपणीची आठवण येते. सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडिओ सध्या व्हायरल (Viral) होत आहे. तो पाहिल्यानंतर तुम्हाला लहान व्हावेसे तर वाटेल पण लहान मुलांप्रमाणे मस्ती तुम्ही करू शकणार नाहीत.

प्रदीप गरड

|

Mar 29, 2022 | 7:30 AM

Funny video : लहान मुलांचे व्हिडिओ (Kids Video) पाहिले, की लहानपणीची आठवण येते. असे अनेक व्हिडिओ असतात, जे आपल्याला बालपणीच्या विश्वात घेऊन जातात. लहान मुलांचे खेळणे, बागडणे, बागेमध्ये धमाल, लहान मुलांच्या पार्कमध्ये मजामस्ती अशा अनेक छोट्या मोठ्या धमाल गोष्टी असतात. त्या पाहिल्यानंतर आपल्यालाही वाटते लहान व्हावे. पण आता आपल्याला मर्यादा आहेत. तुम्हाला वाटले, की लहान मुलांप्रमाणे मस्ती करावी, तर तुम्ही करू शकत नाहीत. होय. तुम्ही करू शकत नाहीत आणि केलीच तर त्याचा फटकाही तुम्हाला बसू शकतो. तुम्ही म्हणाल, का आणि कसा फटका बसेल? तर सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडिओ सध्या व्हायरल (Viral) होत आहे. तो पाहिल्यानंतर तुम्हाला लहान व्हावेसे तर वाटेल पण लहान मुलांप्रमाणे मस्ती तुम्ही करू शकणार नाहीत.

माणूस अडवतो, जाऊच देत नाही

व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरूण दिसत आहे. तो लहान मुलांच्या अॅम्युझमेंट पार्कमध्ये आला आहे. त्याला Bouncy Castleमध्ये खेळणारी काही मुले दिसतात. त्यालाही तिथे जाऊन उड्या मारण्याची आणि खेळण्याची इच्छा होते. तो जातो पण तितक्यात त्याला तिथला माणूस अडवतो आणि जाता येणार नाही, असे म्हणतो. पण या तरुणाची इच्छाच इतकी अफाट असते की तो त्याच्याशी हुज्जत घालतो. दोघेही एकमेकांशी वाद घालतात, पण काही ते त्याला पुढे जाऊ देत नाही. पण शेवटी असे काहीतरी होते, की तुम्हाला ते पाहून मज्जा येईल.

यूट्यूबवर अपलोड

हा गंमतीदार व्हिडिओ यूट्यूबवर सलमान नोमान (Salman Noman) या चॅनेलनर अपलोड करण्यात आला आहे. 21 मार्चला व्हिडिओ अपलोड करण्यात आला असून 16 मिलियन व्ह्यूज या व्हिडिओला मिळाले आहेत. Kabhi kooday ho? bachpan main kiya kabhi? अशी मजेशीर कॅप्शनही देण्यात आलीय. हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि बालपणातही घेऊन जाईल.

आणखी वाचा :

Video viral : ‘या’ महाभागाला पाहा; पोलिसांना एकवेळ चकवा देईल, पण यमराजाला..?

सॅलड खाण्याची स्पर्धा तीही सशांबरोबर! कोण जिंकलं? भन्नाट Challenge video पाहाच

Video : आता तर हद्द झाली! Kacha Badamनंतर आणखी एक गाणं सोशल मीडियावर Viral

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें