AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना महामारी के वक्त… कोविड कॉलरट्यून बंद होणार? केंद्र सरकार लवकरच निर्णय घेण्याची शक्यता

कोरोना विषाणू (Corona) संसर्गाच्या काळात प्रबोधनासाठी केंद्र सराकर आणि राज्य सरकारनं अनेक उपक्रम राबवले आहेत. अभियानाच्या माध्यमातून लोकांचं जनप्रबोधन करण्यासाठी हे प्रयत्न करण्यात आले होते.

कोरोना महामारी के वक्त... कोविड कॉलरट्यून बंद होणार? केंद्र सरकार लवकरच निर्णय घेण्याची शक्यता
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 27, 2022 | 11:08 PM
Share

नवी दिल्ली : कोरोना विषाणू (Corona) संसर्गाच्या काळात प्रबोधनासाठी केंद्र सरकार (Union Government) आणि राज्य सरकारनं अनेक उपक्रम राबवले आहेत. अभियानाच्या माध्यमातून लोकांचं जनप्रबोधन करण्यासाठी हे प्रयत्न करण्यात आले होते. केंद्र सरकारच्या माध्यमातून कोरोना कॉलरट्यून देखील सुरु करण्यात आली होती. ज्यावेळी आपण दुसऱ्या व्यक्तींना फोन करतो त्यावेळी प्री-कॉल ऑडिओ (Pre Call Audio) ऐकवलं जातं. त्या ऑडिओत आपण दुसऱ्यांना कोरोना संसर्गापासून वाचवण्याबद्दल सूचना दिल्या जातात. आता कोरोना विषाणू संसर्ग कमी झाल्यामुळं अनेकांनी इमरजन्सी फोन कॉल करायचा असल्यास त्यावेळी ऑडिओ ऐकायला लागते. प्री कॉलर ट्यूनमुळं अनेकांना मनस्तापाला सामोरं जावं लागत होतं. आता सरकार प्री कॉल ऑडिओ लवकरचं बद केला जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या आदेशानं टेलिकॉम ऑपरेटर्सनी प्री कॉल ऑडिओ ऐकवण्यास सुरुवात केली होती.

प्री कॉल ऑडिओ बंद होणार

प्री कॉल ऑडिओच्या माध्यमातून दोन वर्ष प्रबोधन करण्यात आल्यानंतर येत्या काही दिवसात प्री कॉल ऑडिओ बंद केला जाण्याची शक्यता आहे. प्री कॉलर ट्यूनच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून यशस्वी प्रबोधन करण्यात आलं आहे. पीआटीआच्या रिपोर्टनुसार दोन वर्ष प्रबोधन केल्यानंतर आता प्री कॉल ऑडिओ बंद केला जाण्याची शक्यता आहे.

डीओटीचं आरोग्य विभागाला पत्र

प्री कॉलर ट्यून संदर्भात खात्रीशीर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डीओटीनं आरोग्य विभागाला पत्र लिहिलं आहे. कोरोना संबंधित कॉलर ट्यून आणि प्री कॉलर ऑडिओ बंद करण्याची शिफारस करण्यात आल्याची माहिती आहे. सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया आणि मोबाईल ग्राहक यांनी देखील प्री कॉल ऑडिओ क्लिप हटवण्याची मागणी केली होती. याशिवाय कोरोनासंबंधी जनजागृतीसाठी इतर प्रबोधनाचे उपक्रम सुरु राहणार आहेत, अशी माहिती आहे.

तातडीनं फोन लावताना अडचण

अनेकदा अडचणीच्या काळात फोन लावताना प्री कॉल ऑडिओ क्लिप सुरु असल्यानं अनेकदा उशीर होतो. टेलिकॉम ऑपरेटर्सना देखील यामुळं अधिक भार सहन करावा लागातोय. तर, माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत.

इतर बातम्या:

Rohit Sharma Fined, IPL 2022: Mumbai Indians ला दुहेरी फटका, रोहितला भरावा लागला 12 लाखाचा दंड

गोपीचंद पडळकर देवेंद्र फडणवीस जेवढी स्क्रिप्ट देतात तेवढंच करतात, सक्षणा सलगर यांचा आरोप

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.