AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

3D Model viral photo trend : ‘3D मॉडेल फोटो’चा सोशल मीडियावर धूमाकूळ, तुम्ही बनवलं का तुमचं मॉडेल ? जाणून घ्या सोप्पी पद्धत

3D Model viral photo trend : सोशल मीडियावर रोज नवनवे ट्रेंड येत असतात. आधी गिबली आर्टने धूमाकूळ घातला, तर आता 3D Model भलंतच व्हायरल झालं आहे. अवघ्या काही सेकंदांच्या आत हे AI Tool कोणत्याही फोटोचे 3D Model मध्ये रुपांतर करू शकतो. तुम्ही केलं का ट्राय ?

3D Model viral photo trend : ‘3D मॉडेल फोटो’चा सोशल मीडियावर धूमाकूळ, तुम्ही बनवलं का तुमचं मॉडेल ? जाणून घ्या सोप्पी पद्धत
3D Model viral photo trend Image Credit source: X (Twitter)
| Updated on: Sep 10, 2025 | 5:23 PM
Share

इन्स्टाग्राम असो की फेसबूक, कोणत्याही सोशल मीडिया साईटवर स्क्रोलिंग करताना तुम्हाला आजकाल तुमच्या मित्र-मैत्रिणींचे किंवा एखाद्या सेलिब्रिटीचे कूल असे 3D मॉडेल दिसत असेल ना. कधी त्यांचे किंवा कधी त्यांच्या पाळीव प्राणी -पक्ष्यांचे 3D Model फोटो, पोस्ट केलेले दिसतील. पण हे 3D Modelकसं बनवतं असतील असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना ? सोप्पं आहे, ही आहे एआयची जादू! खरंतर हे एक ‘नॅनो बनाना’ नावाचं एक AI tool आहे, जे सध्या सगळीकडे धूमाकूळ घालतंय. काही दिवसांपूर्वी घिबली (Ghibli) इमेजचा ट्रेंड आला होता, तो मागे पडल्यावर आता एआयने नवं टूल आणलं असून त्यात अगदी सोप्या पद्धतीने, घरच्या घरी तुम्ही देखील तुमचं 3D Model बनवू शकता आणि मग तो सोशल मीडियावरही शेअर करू शकता.

अनेक सेलिब्रिटींनीही हा ट्रेंड फॉलो करत त्यांची 3D Model बनवली असून सोशल मीडियवर फोटो शेअर केलेत, ज्यांना नेहमीप्रमाणेच भरपूर लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. अतिशय कूल आणि अगदी फुकट असलेल्या या एआय टूलचा कसा वापर करायचा असेल ते जाणून घ्यायचं असेल तर नक्की वाचा.

तुमचं 3D मॉडेल बनवण्यासाठी स्टेप बाय स्टेप गाईड (Step-By-Step Guide To Create Your Own 3D Model)

1) नॅनो बनाना करा ओपन

– सर्वात पहिले तुमचा मोबाईल, लॅपटॉप किंवा, कॉम्प्युटरवर क्रोम / सफारी किंवा कोणतंही ब्राऊजर उघडा आणि Google AI Studio टाईप करून सर्च करा.

– ते उघडल्यावर Try Gemini हा ऑप्शन सिलेक्ट करा.

– तिथे तुम्हाला एका पॅनेलवर Nano Banana (Gemini 2.5 Flash Image) असं दिसेल, तो पर्याय निवडा आणि तुमच्या गुगल अकाऊंटने लॉग इन करा.

– पुढची प्रोसेस सुरू करण्यााठी टर्म्स (terms) ॲक्सेप्ट करा.

2) फोटो अपलोड करा

– हे सर्व झाल्यावर रनच्या शेजारी असलेल्या “+” आयकॉन वर क्लिक करा आणि अपलोड इमेज किंवा अपलोड फाईल सिलेक्ट करा.

– तुम्हाला ज्या फोटोचं 3D मॉडेल हवं असेल तो फोटो (तुमचा, प्राण्यांचा किंवा कोणताही) तुम्ही तिथे अपलोड करू शकता.

3) 3D Model Prompt करा रन

त्यानंतर खाली दिलेला प्रॉम्प्ट कॉपी करून चॅटबॉक्समध्ये पेस्ट करा आणि रन बटण दाबा:

Copy and paste the following prompt into the chatbox and hit Run:

“A highly detailed 1/7 scale figurine of the characters from the provided picture, crafted in a realistic style, is displayed in a real-world environment. The figurine is posed dynamically on a round, transparent acrylic base with no text, placed on a sleek, modern computer desk made of wood with a glossy finish. The desk is organised, featuring a monitor, keyboard, and a few small accessories like a pen holder and a coffee mug. The computer screen prominently displays the ZBrush modeling process of the figurine, showcasing intricate sculpting details, wireframes, and texture maps in progress. Next to the monitor, a BANDAI-style toy packaging box stands upright, featuring vibrant, two-dimensional flat illustrations of the characters in dynamic poses, with the original artwork faithfully reproduced. The scene is well-lit with natural light streaming through a nearby window, casting soft shadows and emphasising the figurine’s realistic textures and fine details.”

त्यानंतर AI तुमची इमेज प्रोसेस करेल आणि एक 3D फिगर किंवा मॉडेल जनरेट करेल.

4) डाऊनलोड आणि शेअर

– तुमचं 3D मॉडेल तयार झाल्यावर तुम्ही तो फोटो फ्रीमध्ये डाऊनलोड करू शकता. त्यानंतर तुमचा हा क्यूट फोटो तुम्ही इन्स्टाग्राम, फेसबूक, ट्विटर कुठेही शेअर किंवा पोस्ट करू शकता. मग बघा तुमच्याही युनिक क्रिएशनला लाईक्स मिळतील.

सेलिब्रिटींनीही शेअर केले 3D मॉडेल फोटो

अभिनेता इम्रान हाश्मी तसेच आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही त्यांची 3D मॉडेल फोटो काढत सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यावर लाईक्स,कमेंट्सचा पाऊस पडलाय.

आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.