बायकोचं मित्राशी अफेअर, त्याचंच मुल पोटात, थेट घटस्फोट मागितला, दिनेश कार्तिकची मुळासकट हलवून सोडणारी स्टोरी

| Updated on: Jun 18, 2022 | 8:09 AM

16 वर्षांत 36 टी-20 सामने खेळणारा दिनेश तिसऱ्यांदा सामनावीर ठरला आहे. त्याच्या बहारदार कारकिर्दीसोबत त्याच्या आयुष्यात संकटेही कमी नव्हती.

बायकोचं मित्राशी अफेअर, त्याचंच मुल पोटात, थेट घटस्फोट मागितला, दिनेश कार्तिकची मुळासकट हलवून सोडणारी स्टोरी
दिनेश कार्तिक आणि दीपिका पल्लीकल
Follow us on

मुंबई : आयुष्यात येणाऱ्या छोट्या मोठ्या अपयशाने आपण खचून जातो. पण काही गोष्टी काही माणसं आपल्याला प्रेरणा देतात. जगण्याची नवी उमेद देतात. अशीच एक प्रेरणादायक कथा (Inspirational story) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही स्टोरी आहे क्रिकेटपटू दिनेश कार्तिकची (Dinesh Karthik). त्याच्या आयुष्यात सुरू असणाऱ्या संकटांची मालिका अन् त्यातून त्याला उभं करणारी काही माणसं यांची ही गोष्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी ही गोष्ट आपल्या सोशल मीडियावर शेअर केली आहे.

व्हायरल स्टोरी

एक वेळी होती जेव्हा दिनेश कार्तिक हा खेळाडू भारतीय संघात चांगली कामगिरी करत होता. धोनी नंतर विकेटकिपर म्हणून त्याचीच ओळख होती. तसेच तो तामिळनाडूचा कॅप्टन पण होता. पण याच काळात त्याच्या वैयक्तिक आयुष्यात मोठे वादळ घोंघावत होते.

तामिळनाडू संघातील त्याचा सहकारी आणि मित्र मुरली विजय याचे दिनेश कार्तिकच्या बायकोबरोबर प्रेमसंबंध होते. या गोष्टीची पुसटशी देखील कल्पना दिनेश कार्तिकला नव्हती. पूर्ण टीमला मात्र हे प्रकरण माहीत होते. एके दिवशी अचानक दिनेश कार्तिकची बायको आली आणि त्याला म्हणाली, ‘माझ्या पोटात मुरली विजयचे मूल असून मला घटस्फोट हवा आहे.’ पायाखालची जमीन सरकणे म्हणजे काय असते, याचा अनुभव त्या दिवशी दिनेश कार्तिकला आला.

दिनेशची बायको घटस्पोट घेऊन मुरली विजय सोबत संसारात रमली तर मुरली विजय पण चेन्नई सुपर किंगस कडून चांगली कामगिरी करत होता. दुसरीकडे दिनेश कार्तिक मात्र पूर्णपणे आयुष्यातुन उठला होता. इतका मोठा झटका पचवणे कुणालाही सहजासहजी शक्य नसते. तो पूर्ण डिप्रेशनमध्ये गेला. त्याचा फटका त्याला लगेच बसला. भारतीय संघातील त्याची जागा चालली गेली. त्याची कामगिरी इतकी खालावली की त्याच्या कडून तामिळनाडू रणजी संघाची कॅप्टनसी काढून घेऊन तीच मुरली विजयला देण्यात आली. अशावेळी त्याच्या मनःस्थितीची कल्पना तुम्ही करू शकता.

आता आत्महत्या करून जीवन संपवून टाकावे असे त्याच्या मनात येऊ लागले होते. एके दिवशी त्याला ट्रेनिंग देणारा ट्रेनर त्याला भेटायला गेला असता त्याने त्याची ही अवस्था बघितली. ट्रेनरने त्याला जबरदस्ती जिमला नेले. तिथे दीपिका पल्लीकल ही राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू पण येत असे. तिने दिनेश कार्तिकची ही अवस्था बघून त्याला आधार दिला. दोघांनी मिळून हळूहळू ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली.

दीपिकाच्या आधाराचा परिणाम आत दिसू लागला. दिनेश कार्तिक प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये धुवांधार बॅटिंग करू लागला. त्याला भारतीय संघात पण घेतले गेले आणि तो कोलकाता नाईट रायडर्स या संघाचा कॅप्टन पण झाला. दुसरीकडे मुरली विजयची कामगिरी खालावत चालली होती. तो चेन्नई सुपर किंगसमधून पण बाहेर फेकला गेला.

2018 साली निदाहस ट्रॉफीच्या फायनलमध्ये सिक्स मारत दिनेश कार्तिकने भारताला सामना जिंकून दिला आणि तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. दिनेश कार्तिकने आपल्या तडाखेबंद कामगिरीने आपण संपलेले नसून फिनिक्सप्रमाणे पुन्हा भरारी घेऊन परत आलो आहोत हे दाखवून दिले. दीपिका पल्लीकल सोबत लग्न करून या दोघांना जुळी मुले झाली. डिलिव्हरीच्या अवघ्या सहा महिन्यांनी झालेल्या चॅम्पियनशिपमध्ये दीपिका पल्लीकलने अनेक पदके कमावत आपल्या नवऱ्याप्रमाणे आपण पण कमी नाही हे सिद्ध केले.

पुढे या जोडप्याने आपले स्वप्नातले भव्य घर विकत घेतले आणि आपला सुखी संसार सुरू ठेवला. दिनेश कार्तिक हे नाव त्याच याच सर्व मातीन मिसळून पुन्हा मुसंडी मारण्याच्या ईच्छाशक्तीमुळे जगभर ओळखले जायला हवे इतके प्रेरणादायी आहे. Dreams suffering love अशी ही स्टोरी आहे….

ही पोस्ट सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केली आहे. ही स्टोरी अनेकांनी प्रेरणा देत आहे.

संबंधित बातम्या

Mike Tyson ची सटकली! भर विमानात प्रवाशाच्या तोंडावर एकामागोमाग एक दे दणादण मुक्के, व्हिडीओ व्हायरल

akshay kumar tobacco controversy : आता फी परत न केल्याने खिलाडी अक्षय झाला ट्रोल, चाहते म्हणाले, पैसे परत कर, जाहिरात थांबव

धावत्या ट्रेनखाली पडलेल्या महिलेचे चमत्कारिकरित्या वाचले प्राण; पहा Shocking व्हिडीओ