अंत्यसंस्कारासाठी लोक निघाले, वृद्धाने अचानक श्वास घेतला, डोळेही उघडले!

नरेलाच्या टिकरी खुर्द गावातील 62 वर्षीय नागरिक सतीश भारद्वाज यांचा रविवारी सकाळी मृत्यू झाल्याचा दावा त्यांच्या परिवारातील लोकांनी केला होता. वृद्धाच्या मृत्यूनंतर कुटुंबिय शोकसागरात बुडाले. त्यानंतर त्या वृद्धाचे शरीर अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आलं होतं. मात्र, स्मशानभूमीत मुखाग्नी देण्यापूर्वी वृद्धाच्या चेहऱ्यावरील कपडा बाजूला करण्यात आला, त्यावेळी लोक चांगलेच हैराण झाले.

अंत्यसंस्कारासाठी लोक निघाले, वृद्धाने अचानक श्वास घेतला, डोळेही उघडले!
Follow us
| Updated on: Dec 27, 2021 | 12:17 PM

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या (Delhi) नरेला परिसरात लोक एका घटनेनं चांगलेच हैराण झाले. त्याचं झालं असं की एका वृद्धाच्या मृत्यूनंतर लोक अंत्यसंस्काराची (Funeral) तयारी करत होते. मात्र, अंत्यसंस्कारापूर्वीच त्या वृद्धाने आपले डोळे उघडले! महत्वाची बाब म्हणजे हे तेव्हा घडलं, ज्यावेळी त्या वृद्धाचं शरीर अर्थीवरुन उचलून चितेवर ठेवण्याची तयारी सुरु होती.

नरेलाच्या टिकरी खुर्द गावातील 62 वर्षीय नागरिक सतीश भारद्वाज यांचा रविवारी सकाळी मृत्यू झाल्याचा दावा त्यांच्या परिवारातील लोकांनी केला होता. वृद्धाच्या मृत्यूनंतर कुटुंबिय शोकसागरात बुडाले. त्यानंतर त्या वृद्धाचे शरीर अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आलं होतं. मात्र, स्मशानभूमीत मुखाग्नी देण्यापूर्वी वृद्धाच्या चेहऱ्यावरील कपडा बाजूला करण्यात आला, त्यावेळी लोक चांगलेच हैराण झाले. कारण, तो वृद्ध व्यक्ती जिवंत निघाला आणि श्वास घेऊ लागला. इतकंच नाही तर त्या व्यक्तीने डोळेही उघडले.

डॉक्टरांकडून ती व्यक्ती जिवंत असल्याची पुष्टी

स्मशानभूमीत जमलेल्या नागरिकांनी लगेच दिल्ली पोलीस आणि रुग्णवाहिकेला फोन करुन त्याबाबत माहिती दिली. इतक्यात तिथे स्माशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आलेल्या एका डॉक्टरनं तपासणी केली असता तो व्यक्ती जिवंत असल्याची पुष्टी त्यांनी केली. तो व्यक्ती श्वास घेत आहे आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर तिथे असलेल्या रुग्णवाहिकेतून त्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आले.

सश्मानभूमीवर उपस्थित असलेल्या लोकांपैकी दोघांनी पोलीस ठाण्यात फोन करुन याबाबत माहिती दिली होती त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारण दुपारी 3 वाजताचा हा संपूर्ण प्रकार आहे. त्या वृद्ध व्यक्तीचं नाव सतीश भारद्वाज असून, त्यांचं वय 62 वर्षे आहे.

स्मशानभूमीतून थेट रुग्णालयात

त्या वृद्ध व्यक्तीने आपलं शरीर चितेवर ठेवण्यापूर्वी डोळे उघडले. त्यानंतर त्यांचा रक्तदाब तपासण्यात आला. हार्ट बीटसह सर्वकाही नॉर्मल असल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर स्मशानभूमीतूनच त्या व्यक्तीला रुग्णवाहिकेतून तातडीने राजा हरिश्चंद्र रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. तिथे त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

हा हैराण करणाऱ्या घटनेबाबत दिल्ली पोलीसांमधील सूत्रांनी सांगितलं की, तो वृद्ध व्यक्ती जिवंत होते. तो व्यक्ती ज्या रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं, तिथे डॉक्टरांच्या सल्ल्याविना परिवारातील लोकांनी डिस्चार्ज घेतला होता. रुग्णालयातून डिस्चार्ज घेताना डिस्चार्ड पेपरवर LAMA (left against medical advice) असं लिहिलं होतं. तसंच तो वृद्ध व्यक्ती कर्करोगाचा रुग्ण असून व्हेंटीलेटरचा खर्च जास्त होत असल्यानं परिवारातील लोक त्यांना रुग्णालयातून घरी घेऊन गेले होते.

प्राथमिकदृष्ट्या रुग्णालयाचा हलगर्जीपणा

व्हेटिंलेटरवरुन काढल्यानंतर त्या व्यक्तीचा श्वास बंद झाला होता. त्यानंतर सकाळी 11 वाजता परिवारातील लोकांना त्यांचा मृत्यू झाला असं वाटलं आणि ते अंत्यसंस्कारासाठी त्या व्यक्तीला स्मशानभूमीत घेऊन गेले होते. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाचा तपास सुरु आहे. यात प्राथमिकदृष्ट्या रुग्णालयाचा हलगर्जीपणा दिसून येत आहे.

इतर बातम्या :

आफ्रिकन व्यक्तीने ‘डान्स मेरी राणी’वर केला हटके डान्स, व्हिडीओ लोकांच्या पसंतीला

उत्तर महाराष्ट्रात अलीबाबाची गुहा…! तब्बल 32 ठिकाणी कारवाई, 175 अधिकाऱ्यांनी 12 तास मोजला पैसा

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.