AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Explainer : अशी गॅलेक्सी सापडली की ज्याने ब्रह्मांड नेमकं कशावर तरलंय? याचं संशोधकांना नव्याने पडले कोडे

ब्रह्मांडात सर्व गॅलक्सीतील ग्रहांना बांधून ठेवणारी त्यांच्या कक्षा आणि परिभ्रमण यांचे नियंत्रण करणारी शक्ती नेमकी कोणती याविषयी संशोधकांना पुन्हा प्रश्न पडले आहेत....त्यामुळे बिग बँग थिअरीच काल बाह्य ठरण्याचा धोका असल्याचे म्हटले जात आहे..

Explainer : अशी गॅलेक्सी सापडली की ज्याने ब्रह्मांड नेमकं कशावर तरलंय? याचं संशोधकांना नव्याने पडले कोडे
| Updated on: Apr 21, 2025 | 10:25 AM
Share

आतापर्यंत डार्क मॅटरच सर्व ब्रह्मांडाला जोडून ठेवते असे मानले जात होते. डार्क मॅटरमुळे सर्व ग्रह तारे एका ठराविक जागी फिरत असतात असे म्हटले जात होते. आकाशगंगा असो किंवा क्लस्टर यांना डार्क मॅटरने ( डार्क ग्रॅव्हीटी ) बांधून ठेवल्याचे सांगितले जात होते. आकाशगंगेत ( गॅलेक्सी ) सर्व ग्रहांचे संचलन डार्क मॅटरमधील गुरुत्वाकर्षाने होत असते…यावर संशोधक ठाम होते. पण या समजाला एका नव्या गॅलेक्सीने तडा दिला आहे. त्यामुळे कदाचित बिग बँग थिअरीचा पुन्हा एकदा नव्याने विचार करावा लागेल की काय अशी परिस्थिती ओढावली आहे.

 संधोधनाला धक्का लागणार ?

खगोल अभ्यासकांना  FCC 224 ही गॅलेक्सी सापडली आहे. या गॅलेक्सीला साल २०२४ मध्ये प्रथमच शोधले होते. ही साधी गॅलक्सीनसून ड्वार्फ गॅलक्सी आहे.आकाराने लहान परंतू रहस्यमयी. कारण खगोलतज्ज्ञ आणि संशोधकाच्या चर्चेचे ती क्रेंद्र बनली आहे. कारण या गॅलेक्सीत डार्क मॅटर असल्याचे ठोस पुरावे सापडलेले नाही.या डझनावारी चमकणारे स्टार क्लस्टर्स मात्र जरुर आहेत. जे सर्वसाधारणपणे मोठ्या आणि वस्तूमान वाल्या डार्क मॅटरवाल्या गॅलेक्सीत पाहायला मिळतात. परंतू या गॅलेक्सीत कोणतेही डार्क मॅटर नाही….

FCC 224 फॉरनॅक्स क्लस्टरच्या कडेला असून पृथ्वीपासून ६५ अब्ज प्रकाश वर्ष दुर आहे. या गॅलेक्सीचे बनावट आणि लोकेशन दोन्ही आतापर्यंत संशोधन झालेल्या डार्क मॅटर रहित गॅलेक्सीहून वेगळे पाडत आहेत. हा योगायोग नसून कदाचित गॅलेक्सीचा नवीन कॅटगरी आपल्या समोर उघडकीस आली आहे.

या गॅलक्सीच्या संशोधनाचे नेतृत्व ऑस्ट्रलियाच्या मारिया बज्जो आणि त्यांच्या टीमने केले आहे. त्यांनी हवाई येथील केक ऑब्जर्वेटरी डाटा घेतला आणि या गॅलेक्सीच्या स्टार क्लस्टरची मु्व्हमेंट रेकॉर्ड केली त्यानंतर जे उघडकीस आले ते चमत्कारीच होते. या क्लस्टर्सचा वेग खूपच धीमा आहे.म्हणजे यावर डार्क मॅटर असल्यावर असणारे गुरुत्वाकर्षण नाही. सोप्या भाषेत FCC 224 या गॅलक्सीत डार्क मॅटरच नाही.

मग ही गॅलेक्सी ब्रह्मांडात कशी टीकून आहे ?

याचे उत्तर आहे कोलिजन थिअरी होय, कॅलिफोर्नियाच्या युनिव्हर्सिटीचे अंतराळ तज्ज्ञ यिमेंग टांग आणि त्यांच्या टीमने या वर काम गेले. त्यांनी ची तुलना दोन आणखी DF2 आणि DF4 या गॅलक्सीशी होत आहे. या आधीपासून डार्क मॅटर मुक्त गॅलक्सी मानली जात आहे.या दोन्ही गॅलक्सी NGC 1052 ग्रुपमध्ये आहेत. असे म्हटले जाते की कोणे काळी दोन गॅस समृद्ध गॅलेक्सींची जोरदार टक्कर झाल्याने या बनल्या होत्या टक्करीनंतर गॅस डार्क मॅटरपासून वेगळे झाले. आणि या गॅसमधून विना डार्क मॅटरच्या नवीन गॅलक्सी तयार झाल्या.

FCC 224 ही गॅलक्सी कादाचित या टक्करीने तयार झाली असावी आणि हिची जुळी गॅलक्सी देखील असून तिचे नाव FCC 240 आहे. आकार, रुंदी आणि ऑरिएंटेशन …सर्वकाही मेळ खात आहे. आता पुढील संशोधन जर या साम्याचे खात्री देत असेल तर ही कोलिजन थिअरी आणखी मजबूत होऊन जाईल.

आणखी एक शक्यता आहे की FCC 224 मध्ये कधीकाळी खूपच तीव्र फॉर्मेशन झाले होते. अशात ओव्हरमॅसीव्ह स्टार क्लस्टर्सने एवढी ऊर्जा सोडली असेल की डार्क मॅटरलाच बाहेर काढले असेल म्हणजेच स्वतच्या ताकदीने डार्क मॅटरला पळवून लावले.

 बिग बँग थिअरी खोटी ठरणार ?

जर FCC 224 सारखी अन्य उदाहरणे जर पुढे आली तर ब्रह्मांडा संदर्भातील आपले सर्व समज आणि अंदाज बदलणार आहेत. आणि डार्क मॅटरवर आधारित मॉडेल्सचं पुन्हा संशोधन करावे लागणार आहे.बिग बँग थिअरीलाही नव्या प्रश्नांचा सामना करावा लागणार आहे. कारण डार्क मॅटरवर शिवाय या गॅलक्सी स्थिर कशा राहू शकतात. तर मग पुन्हा कोणती ताकद आहे जी यांना ब्रह्मांडात सर्व गॅलक्सीतील ग्रहांना बांधून ठेवते त्यांचे संचलन करते ? याचा शोध नव्याने घ्यावा लागणार आहे.

मारिया बज्जो या स्वत:च मानतात की सारखी गॅलेक्सी या दिशेने संशोधन करण्यात अत्यंत महत्वाच्या ठरणार आहेत. जेवढे जास्त उदाहरण सापडतील तेवढ्या प्रमाणात आपल्याला कळू शकते की डार्क मॅटरची खरंच किती गरजेचे आहे की नाही ?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.