AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा काय प्रकार! डॉक्टरने 5 वर्ष आंघोळच केली नाही, पुढे काय झालं तुम्हीच वाचा…

एका डॉक्टरने पाच वर्ष आंघोळच केली नाही. यामागचं कारण त्यांनी 'क्लीन: द न्यू सायन्स ऑफ स्किन' या पुस्तकात सांगितलं आहे. पाच वर्ष आंघोळ करणे बंद केल्यावर 2020 मधील आपला प्रवास या डॉक्टरने सांगितला आणि सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. हे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटू शकतं. जाणून घ्या.

हा काय प्रकार! डॉक्टरने 5 वर्ष आंघोळच केली नाही, पुढे काय झालं तुम्हीच वाचा...
| Edited By: | Updated on: Feb 10, 2025 | 3:02 PM
Share

एका डॉक्टरने पाच वर्ष आंघोळच केली नाही. यामागचं कारण त्यांनी ‘क्लीन: द न्यू सायन्स ऑफ स्किन’ या पुस्तकात सांगितलं आहे. पाच वर्ष आंघोळ करणे बंद केल्यावर 2020 मधील आपला प्रवास या डॉक्टरने सांगितला आणि सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. हे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटू शकतं. जाणून घ्या.

बऱ्याच लोकांसाठी रोज आंघोळ करणे हा स्वच्छतेचा एक भाग आहे. अलीकडच्या काही वर्षांत सौंदर्य आणि वैयक्तिक काळजी उद्योग तेजीत आहे. एकट्या अमेरिकेत 2024 मध्ये हा आकडा 100 अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडेल. वाढत्या बाजारपेठेत जवळपास रोज नवनवीन उत्पादने येत असताना प्रश्न पडतो की, आपल्याला खरोखरच या सर्वांची गरज आहे का? आज आम्ही तुम्हाला अशीच एक वेगळी माहिती देणार आहोत.

प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन आणि पब्लिक हेल्थ एक्सपर्ट डॉ. जेम्स हॅम्ब्लिन यांनी याला आव्हान देण्याचा निर्णय घेतला. रोज आंघोळ करण्याची खरी गरज समजून घेण्याच्या प्रयत्नात त्यांनी पाच वर्ष आंघोळ करणे बंद केले. ‘क्लीन: द न्यू सायन्स ऑफ स्किन’ या पुस्तकात त्यांनी 2020 मधील आपला प्रवास सांगितला आहे.

अंघोळ करण्याऐवजी शरीर स्वच्छ करणे या दरम्यान, हॅम्बलिन यांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागले, विशेषत: शरीराच्या दुर्गंधीबद्दल. अजूनही ते नियमितपणे साबणाने हात धुतात, अधूनमधून केस ओले करतात. पण ते आंघोळ करत नाहीत.

हात धुणे ‘ही’ सर्वात महत्वाची गोष्ट सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत हॅम्बलिन यांनी आपले निष्कर्ष स्पष्ट केले. त्यांना आढळले की बहुतेक वैयक्तिक काळजी उत्पादने स्वच्छतेसाठी नाहीत तर देखाव्यासाठी, सुगंधासाठी असतात. तेलकट अवशेष तोडण्यासाठी साबण महत्त्वाचा आहे, हे त्यांनी मान्य केले असले तरी घाण आणि जंतू काढून टाकण्यासाठी शारीरिक स्वच्छता, हात धुणे ही सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

गरम पाण्याने आंघोळ करणे वाईट हॅम्ब्लिनच्या मते, विशेषत: गरम पाणी आणि साबणाने आंघोळ केल्याने त्वचेचे नैसर्गिक तेल, रसायने आणि मायक्रोबायोमचे नाजूक संतुलन बिघडते. ओव्हरवॉशिंग आवश्यक तेले काढून टाकू शकते, त्वचा कोरडी करू शकते आणि फायदेशीर सूक्ष्मजीव काढून टाकू शकते, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

स्वच्छता आणि आंघोळ यातील फरक काय? हॅम्बलिन स्वच्छता आणि आंघोळ यांच्यातील एक महत्त्वाचा फरक स्पष्ट करतात. स्वच्छता म्हणजे शौचालयाचा वापर केल्यानंतर हात धुणे किंवा शिंका झाकणे यासारख्या पद्धतींद्वारे संसर्गजन्य रोगांचा प्रसार रोखणे. तथापि, आंघोळ हा एक वैयक्तिक विधी आहे जो आरोग्य राखण्याऐवजी ताजेतवाने वाटण्यासाठी आहे.

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....