…अन् मालकासोबत कुत्र्यानंही मारली पाण्यात उडी, 4 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेलाय ‘हा’ Video

...अन् मालकासोबत कुत्र्यानंही मारली पाण्यात उडी, 4 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेलाय 'हा' Video
कुत्र्याची उडी

कुत्र्यांना जगातला सर्वात निष्ठावान प्राणी मानलं जातं. तसंच आज्ञाधारक प्राणी(Animal)देखील म्हटलं जातं. कुत्र्यांशी संबंधित अनेक प्रकारचे व्हिडिओ (Video) सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल होतात, जे पाहण्यात मजा येते.

प्रदीप गरड

|

Jan 24, 2022 | 7:30 AM

Dog Jumped In Water : कुत्र्यांना जगातला सर्वात निष्ठावान प्राणी मानलं जातं. तसंच आज्ञाधारक प्राणी(Animal)देखील म्हटलं जातं. त्यांचे मालक किंवा काळजीवाहू जे काही सांगतात ते सर्व ते पाळतात. त्यांच्यासोबत खेळण्यापासून ते फिरण्यापर्यंत आणि कुठलंही काम सांगण्यापर्यंत कुत्रे कुठलाही विचार न करता ते काम करायला नेहमीच तयार असतात. कधीकधी असे प्रसंग येतात जेव्हा कुत्रे त्यांच्या मालकाच्या बचावासाठी आपला जीवही गमावतात. आपण त्यांना जिंकू शकत नाही हे माहीत असूनही सिंहांसारख्याशी ते भिडतात. त्यांनी एकनिष्ठतेचं एक उदाहरण आपल्यासमोर मांडलंय. कुत्र्यांशी संबंधित अनेक प्रकारचे व्हिडिओ (Video) सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल होतात, जे पाहण्यात मजा येते आणि काही व्हिडिओ आश्चर्यचकित करणारे असतात. असाच एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

…अन् पाण्यात उडी मारतो

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की एक व्यक्ती पोहण्यासाठी दुरून धावत येत आहे आणि पाण्यात उडी मारते आहे. यादरम्यान त्याच्या मागे एक कुत्राही असतो, जो त्याच्यासोबत पाण्यात उडी मारतो. ती व्यक्ती कुठे उडी मारत आहे, त्याचे काय नुकसान होऊ शकते याचा विचारही तो करत नाही. तो नुसता मागे-पुढे चालतो आणि जातो आणि उडी मारतो.

ट्विटरवर शेअर

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @buitengebieden_ नावानं शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 4 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 21 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइकदेखील केलं आहे. It’s Friday! अशी कॅप्शनही दिली असून 21 तारखेला तो शेअर करण्यात आलाय.

‘लहानपणी अशा गोष्टी आवडायच्या’

व्हिडिओ पाहून अनेकांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका यूझरनं लिहिलंय, की मी हा व्हिडिओ पाहिल्यापासून शोधत आहे. माझ्या आवडींपैकी एक’. त्याचप्रमाणे आणखी एका यूझरनं कमेंट केलीय, की मी लहान होतो तेव्हा मला अशा गोष्टी करायला आवडायचं. मला ते दिवस आठवतात’.

Motivational : आयपॅड प्रो, सॅमसंग गॅलेक्सी टॅब, लॅपटॉप आणि बरंच काही आहे या रिक्षात! आनंद महिंद्रांनी शेअर केला Video

Video : Nach Meri Raniवर आई-मुलाच्या जोडीचा जबरदस्त डान्स, नोरा फतेहीही होईल प्रभावित

Video : स्वतःच्याच लग्नात पैसे लुटायला लागले वधू-वर; यूझर्स म्हणतायत, सर्व 36 गुण जुळले बहुतेक!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें