AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

OMG! चक्क कुत्र्याने चालवली कार, नशेत गाडी चालवणाऱ्या इसमाने पोलिसांपासून वाचण्यासाठी केला जुगाड

मद्यधुंद कार चालक वाहतूक नियमांची पायमल्ली करत मजेत गाडी चालवत होता. मात्र त्याचवेळी समोर पोलिस तपासणी करत होते. त्यांच्यापासून वाचण्यासाठी त्या इसमाने अनोखा जुगाड केला.

OMG! चक्क कुत्र्याने चालवली कार, नशेत गाडी चालवणाऱ्या इसमाने पोलिसांपासून वाचण्यासाठी केला जुगाड
| Updated on: May 18, 2023 | 10:58 AM
Share

Dog Drives Car : दारू पिणे किंवा मद्यपान करणे  (drinking alcohol) हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे हे आपल्या सर्वांना चांगलेच माहीत आहे. असे असूनही काही लोक रात्रंदिवस नशा करताना दिसताल. त्याच वेळी, मद्यपान करून वाहन चालवणे (drink and drive) हा दंडनीय गुन्हा आहे. पण लोकं ऐकतात का ? दारूच्या नशेत ड्रायव्हरने दुसऱ्याच्या गाडीला धडक दिल्याची किंवा कुणाचा जीव घेतल्याची अशी प्रकरणे रोजच वाचायला-ऐकायला मिळतात. ड्रिंक अँड ड्राईव्हच्या अशाच एका प्रकरणात पोलिसांपासून पळून जाण्यासाठी अनोख मार्ग शोधणाऱ्या या व्यक्तीचे कृत्य पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल.

तपासादरम्यान कारच्या ड्रायव्हिंग सीटवर कुत्रा दिसल्याने पोलीस अधिकारी चक्रावून गेले. त्याच कारमध्ये दुसऱ्या सीटवर एक व्यक्ती बसली होती. त्याने भरपूर दारू प्यायली होती. वास्तविक, वाहतुकीचे नियम झुगारून, पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी त्या व्यक्तीने हा पराक्रम केला होता. हे विचित्र प्रकरण अमेरिकेतील कोलोरॅडो येथील स्प्रिंगफील्ड शहरातील आहे.

मात्र पोलिस फसले नाहीत

कोलोरॅडो पोलिसांनी आपल्या फेसबुक पेजवर या विचित्र घटनेची संपूर्ण माहिती दिली आहे. ज्यामध्ये असे लिहिले आहे की, सुमारे 1300 लोकसंख्या असलेल्या स्प्रिंगफील्डमध्ये पोलिस दिसताच एका इसमाने कुत्र्यासोबत जागेची अदलाबदल केली. मद्यधुंद अवस्थेत पकडल्यानंतर ड्रायव्हरने अनेक सबबी सांगितल्या, पण त्याचा हा प्लॅन काही यशस्वी ठरला नाही.

पोलिसांनी त्या व्यक्तीला पकडल्यावर त्याने सांगितलं की, त्याचा कुत्रा वाहन चालवत होता. परंतु तो अडखळत बोलत असताना त्याने मद्यपान केल्याचे उघड झाले. त्याने किती दारू प्यायली आहे, असे विचारताच तो अधिकाऱ्यांपासून पळू लागला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र अखेर त्याला पकडण्यात आले.

चालकाच्या जवळच्या मित्राला कुत्रा सुपूर्द केल्यानंतर त्या व्यक्तीला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचबरोबर कुत्र्यावर कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही, त्यामुळे त्याला एक वॉर्निंग देऊन त्याला जाऊ दिले, असा टोला पोलिसांनी लगावला.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.