सोशल मीडियामुळे माय-लेकराची 20 वर्षांनी झाली भेट, एकाच ऑफिसमध्ये करत होते काम, फेसबुकच्या मेसेजने आले पुन्हा एकत्र

दोन दशकांनंतर त्याची आईशी कशी भेट झाली, याचे वर्णन त्याने या पोस्टमध्ये केले आहे. साल्ट लेक सिटीमध्ये एचसीए हेल्थकेअरच्या सेंट मार्क हॉस्पिटमध्ये या दोघांनीही एकत्र काम केले होते. हे एकमेकांना भेटल्यावर त्यांच्या लक्षात आले.

सोशल मीडियामुळे माय-लेकराची 20 वर्षांनी झाली भेट, एकाच ऑफिसमध्ये करत होते काम, फेसबुकच्या मेसेजने आले पुन्हा एकत्र
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: संदिप साखरे

Jun 03, 2022 | 7:44 PM

नवी दिल्ली – अमेरिकेतील एका माय-लेकराची (Mother and Son)भेट सध्या व्हायरल होते आहे. आईने आपल्या मुलाला 20 वर्षांनंतर शोधून काढले आहे. तेही सोशल मीडियाच्या (social media)मदतीने. या आई आणि मुलाच्या भेटीची ही सगळी भावनिक कहाणी मुलाने आपल्या फेसबुक पोस्टवर शेअर केली आहे. युटाह राज्यातील बेंजामिन हुलेबर्ग या तरुणाने आपल्या पोस्टमध्ये त्याची आपल्या आईशी भेट कशी झाली हे लिहिले आहे. एका फेसबुक मेसेजमुळे (Facebook message)दोन दशकांनंतर त्याची आईशी कशी भेट झाली, याचे वर्णन त्याने या पोस्टमध्ये केले आहे. साल्ट लेक सिटीमध्ये एचसीए हेल्थकेअरच्या सेंट मार्क हॉस्पिटमध्ये या दोघांनीही एकत्र काम केले होते. हे एकमेकांना भेटल्यावर त्यांच्या लक्षात आले.

facebook post

facebook post

वयाच्या १५ व्या वर्षी मुलाला दिला होता जन्म

होली शिअर्स य़ा १५ वर्षांच्या होत्या, त्यावेळी त्यांनी बैंजामिनला जन्म दिला होता. त्यांच्या गरोदरपणात सहावा महिना सुरु होता तेव्हाच त्यांनी त्या मुलाला दत्तक देण्याची प्रक्रिया सुरु केली होती. या मुलाला आपण चांगले आयुष्य देूऊ शकणार नाही, अशी त्यावेळी शिअर्स यांची भूमिका होती. एंजेला आणि ब्रायन हुलबर्ग यांनी २००१ साली बेंजामिन याच्या जन्माच्या दिवशीच त्याला दत्तक घेतले होते. एंजेला आणि ब्रायन या दोघांनीही लहानपणीच बैंजामिन याला तो दत्तक असल्याची माहिती दिली होती. सध्या बैंजामीन एका शाळेत शिक्षक आहे.

मुलाचा ऑनलाईन शोध घेत होती आई

बैंजामिनची आई हे विसरु शकत नव्हती की आपण २० वर्षांपूर्वी आपल्या मुलाला दत्तक दिले आहे. ज्या एजेन्सीच्या माध्यमातून तिने बैंजामिनला दत्तक दिले होते, त्यांच्याकडे नेहमी ती त्याच्या ख्याली खुशालीची खबरबात घेत असे. २०१४ साली ही एजन्सी बंद झाली. त्यानंतर शिअर्स यांनी ऑनलाईन मुलाचा शोध सुरु केला. त्यांनी सांगितले आहे की- तो नेहमी माझ्या ह्रद्यात होता. सुट्टीच्या दिवसांत आणि त्याच्या जन्मदिनी मी अत्यंत भावनिक होत असे. मी नेहमी त्याचा विचार करीत असे. अखेरीस त्याचे सोशल मीडिया हँडल मला सापडले. त्यावेळी तो १८ वर्षांचा होता आणि मी त्याच्याशी बोलण्यासाठीचा धीर मला होत नव्हता. त्यावेळी त्याच्या जगण्यातही बरेच काही सुरु होते. मी त्याच्या जगण्यात हस्तक्षेप करु इच्छित नव्हते, म्हणून मी बाहेरुन फक्त पाहत होते.

हे सुद्धा वाचा

आईला शोधण्यासाठी डीएनए टेस्ट

तर बैंजामिनही आपल्या खऱ्या आईच्या शोधात होता. त्याने याबाबत अनेकदा आपल्या आई-वडिलांकडे विचारणाही केली होती. आपल्या आईला शोधण्यासाठी त्याने डीएनए टेस्टही केली होती. २०२१ साली नोव्हेंबरमध्ये आलेल्या एका फेसबुक मेसेजने त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्याला मिळाली. बैंजामिन याने सांगितले आहे की- तो मेसेज मला जेव्हा मिळाला तेव्हा मी कुठे होते हे मला आजही आठवतंय. त्यावेळी मी काम करीत होतो. त्यावेळी मी मशिन ऑपरेटर होतो आणि मी मशिन नंबर १५ वर काम करीत होतो. तेव्हा मी तो मेसेज पाहिला आणि त्याला उत्तर दिले. त्या एका मेसेजने माझ्यातील सर्व भावना एकदम उचंबळून आल्या आणि मी हमसून हमसून रडू लागलो.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें