’12 तास काम करा, अन्यथा टीम बदला’, 3.8 लाख वार्षिक पगार असणाऱ्या कर्मचाऱ्याचा नकार, त्यानंतरचा बॉसचा मेसेज व्हायरल
Pune Crime: सोशल डिस्कशन फोरम रेडिटवर मेसेज व्हायरल झाल्यानंतर भारतातील नेटीजन्समध्ये चर्चा सुरु झाली आहे. कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या मेसेजचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला आहे. त्यात देशातील वर्क प्लेसमध्ये कर्मचाऱ्यांचे होणारे शोषण यासंदर्भात चर्चा होत आहे.

देशात कामचे तास किती असावे, यावर गेल्या काही महिन्यांपासून चर्चा होत आहे. इन्फोसिसचे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी तरुणांना आठवड्यातून 70 तास काम करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष एस. एन. सुब्रमण्यम यांनी आठवड्यातून 90 तास काम केले पाहिजे, असे म्हटले. आता सोशल मीडियावर 12 तासांची शिफ्टसंदर्भात एक मेसेज व्हायरल होत आहे. ’12 तास काम करा, अन्यथा टीम बदला’, असा मेसेज व्हायरल होत आहे. सोशल डिस्कशन फोरम रेडिटवर एका टॉक्सिक बॉसद्वारे कर्मचाऱ्यांना पाठवलेला मेसेजचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला आहे.
कर्मचाऱ्याने दिला नकार
सोशल डिस्कशन फोरम रेडिटवर मेसेज व्हायरल झाल्यानंतर भारतातील नेटीजन्समध्ये चर्चा सुरु झाली आहे. कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या मेसेजचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला आहे. त्यात देशातील वर्क प्लेसमध्ये कर्मचाऱ्यांचे होणारे शोषण यासंदर्भात चर्चा होत आहे. वर्षाला 3.8 लाख पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यास बॉसने बारा तास काम करण्याचे सांगितले. त्या कर्मचाऱ्याने नकार दिला. त्यानंतर बॉसची प्रतिक्रिया आली. त्या प्रतिक्रियेचा मेसेज व्हायरल झाला आहे.
Manager asking to work 13 14 hrs byu/Ok-Context-2230 inIndianWorkplace
बॉसचा काय आहे मेसेज
मेसेजमध्ये बॉसने हिंदीत लिहिले आहे की, ‘अगर किसी को बहुत अधिक प्रेशर महूसस हो रहा है, तो वो बत्रा सर से बात कर सकते हैं या फिर कोई दूसरी टीम में चले जाओ, पर मैं काम में किसी भी तरह की कमी को एंटरटेन नहीं करूंगा.’
बॉसच्या मेसेजची ही पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. अनेक रेडिट युजर्सने त्यावर टीका केली आहे. एका युजरने म्हटले, जर तुमच्यावर घराची जबाबदारी नसेल तर त्वरित नोकरी सोडून द्या. दुसरा युजर म्हणतो, स्वत: एन्जॉय करु शकत नाही, त्या ठिकाणी असे पैसे कमवणे काय कामाचे? टॉक्सिक वर्कप्लेसपासून लांब राहणे चांगले आहे. एका यूजरने संतापात म्हटले आहे की, 12 तास शिफ्ट हवी आणि कामात गॅप चालणार नाही. 30 हजार पगार देवून गुलाम बनवणार का?
