प्रसिद्ध युट्यूबरची मार्कशीट व्हायरल, ज्या विषयात कमी मार्क, आज त्याच विषयात कोट्यवधीची कमाई

सध्या सोशल मीडियावर एक मार्कशीट तूफान व्हायरल होताना दिसत आहे. ही व्हायरल होणारी मार्कशीट कोट्यवधी संपत्ती असलेल्या व्यक्तीची आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी ही मार्कशीट सोशल मीडियावर शेअर करण्यात आलीये. ही मार्कशीट चांगलीच चर्चेत आल्याचे देखील बघायला मिळत आहे.

प्रसिद्ध युट्यूबरची मार्कशीट व्हायरल, ज्या विषयात कमी मार्क, आज त्याच विषयात कोट्यवधीची कमाई
Ankur Warikoo
Follow us
| Updated on: Apr 16, 2024 | 8:07 PM

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, हे सांगणे फार जास्त कठीण आहे. बऱ्याच वेळा लोक आपल्या पर्सनल लाईफबद्दलही सोशल मीडियावर काही गोष्टी शेअर करताना दिसतात. आपण नेहमीच ऐकले असेल की, सोशल मीडियाचा जमाना आहे. अनेकदा काही आयपीएस अधिकाऱ्यांच्याही मार्कशीट देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. अशीच एक मार्कशीट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ही मार्कशीट एका प्रसिद्ध युट्यूबरची आहे. ही मार्कशीट पाहून अनेकांना मोठा धक्का देखील बसल्याचे बघायला मिळत आहे.

व्हायरल होणारी ही मार्कशीट दुसरी तिसरी कोणाचीही नसून प्रसिद्ध युट्यूबर अंकुर वारिकू यांची आहे. या मार्कशीटमध्ये अंकुर वारिकू यांना जवळपास सर्व विषयात चांगले मार्क पडल्याचे बघायला मिळत आहे. फक्त या मार्कशीटमध्ये अंकुर वारिकू यांना इंग्रजीमध्ये चांगले मार्क पडले नसल्याचे बघायला मिळत आहे.

अंकुर वारिकू यांनी ही मार्कशीट 12 ची शेअर केलीये. बारावीमध्ये त्यांना इंग्रजीमध्ये कमी मार्क पडले आणि त्याच इंग्रजीमध्ये त्यांनी दोन पुस्तके लिहिली आणि त्यातूनच त्यांनी कोट्यवधीची कमाई केली. आज अंकुर वारिकू हे कोट्यवधी संपत्तीचे मालक आहेत. त्यांची एक कंपनी देखील आहे. मोठी संपत्ती अंकुर वारिकू यांनी कमावली.

दहावी आणि बारावीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा असतात. अनेकदा दहावी आणि बारावीमध्ये कमी मार्क पडले की, विद्यार्थ्यांचे मनोबल हे कमी होते. मात्र, अंकुर वारिकू यांनी ही मार्कशीट शेअर करत हे दाखवून दिले आहे की, दहावी आणि बारावीच्या मार्कवरच सर्वकाही अवलंबून अजिबात नसते, मार्क कमी पडले तरीही करिअरमध्ये व्यक्ती यशस्वी ठरू शकतो.

अंकुर वारिकू यांना बारावीच्या परीक्षेत इंग्रजीमध्ये 57 मार्क पडले आहेत. अंकुर वारिकू यांचे सोशल मीडियावर तब्बल 20 लाख फाॅलोवर्स आहेत. अंकुर वारिकू हे आज करोडपती आहेत. अंकुर वारिकू यांनी दोन पुस्तके देखील लिहिली आहेत. अंकुर वारिकू हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. अंकुर वारिकू सोशल मीडियावर सक्रिय असतात.

Non Stop LIVE Update
शंभूराज देसाईंचा संताप,अंधारेंसह धंगेकरांना बजावली अब्रुनुकसानीचीनोटीस
शंभूराज देसाईंचा संताप,अंधारेंसह धंगेकरांना बजावली अब्रुनुकसानीचीनोटीस.
अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून आव्हाडांची पाठराखण; म्हणाले...
अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून आव्हाडांची पाठराखण; म्हणाले....
मरीन ते पेडर रोड, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 'या' महिन्यात होणार पूर्ण
मरीन ते पेडर रोड, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 'या' महिन्यात होणार पूर्ण.
तर मी संन्यास घेईन...अजितदादांच्या त्या आव्हानावर दमानियांचं थेट उत्तर
तर मी संन्यास घेईन...अजितदादांच्या त्या आव्हानावर दमानियांचं थेट उत्तर.
सोलापुरातील मिलमधील ऐतिहासिक चिमणी इतिहासजमा; क्षणार्धात जमीनदोस्त
सोलापुरातील मिलमधील ऐतिहासिक चिमणी इतिहासजमा; क्षणार्धात जमीनदोस्त.
हवं तर मला फाशी द्या...मनुवादाविरोधात असणारे आव्हाड नेमकं काय म्हणाले?
हवं तर मला फाशी द्या...मनुवादाविरोधात असणारे आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तर मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा, धंगेकरांचा रोख नेमका कुणावर?
तर मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा, धंगेकरांचा रोख नेमका कुणावर?.
माफी मागितली नाही तर... शिंदेंच्या नोटीसीवर शिरसाटांचा राऊतांना इशारा
माफी मागितली नाही तर... शिंदेंच्या नोटीसीवर शिरसाटांचा राऊतांना इशारा.
फॉरेन नाही, शिंदेंचा आपल्या गावी फेरफटका; गाव दाखवत दिला मोलाचा संदेश
फॉरेन नाही, शिंदेंचा आपल्या गावी फेरफटका; गाव दाखवत दिला मोलाचा संदेश.
रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, 'या' राज्याला सर्वाधिक तडाखा
रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, 'या' राज्याला सर्वाधिक तडाखा.