AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई ते गोवा! 48 वर्षे जुनं विमानाचं तिकीट व्हायरल, भाडं वाचून चकित व्हाल!

होय, तुम्ही बरोबर वाचलेत. आता हे व्हायरल तिकीट पाहून लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. त्याआधी तिकिटाची एक झलक पाहा. इंडियन एअरलाइन्सचे 48 वर्षे जुने तिकीट ट्विटरवर @IWTKQuiz नावाच्या हँडलवरून शेअर करण्यात आले आहे. या पोस्टला काही तासांत 85 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. याशिवाय युजर्स लाइक आणि कमेंटही करत आहेत.

मुंबई ते गोवा! 48 वर्षे जुनं विमानाचं तिकीट व्हायरल, भाडं वाचून चकित व्हाल!
Indian AIrlines TicketImage Credit source: Social Media
| Updated on: Apr 13, 2023 | 5:27 PM
Share

मुंबई: मुंबई ते गोव्याला जाणाऱ्या 48 वर्षे जुन्या विमानाचे तिकीट व्हायरल झाले आहे, ज्याचे भाडे लोकांना आश्चर्यचकित करणारे आहे. आज तुम्ही छोले भटूरेची एक प्लेट खाऊ शकता इतक्या रुपयांचं तिकीट तेव्हा यायचं. आज मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी विमानाचा खर्च पाहिलात तर तुम्हाला 1,782 रुपयांपासून ते 11,894 रुपयांपर्यंत आहे. इतके तिकिटाचे पर्याय आता उपलब्ध आहेत. यात सर्व प्रकारच्या एअरलाइन्सच्या विमानांच्या तिकिटांच्या किमतीचा समावेश आहे. पण व्हायरल झालेल्या इंडियन एअरलाइन्सच्या 1974 च्या तिकिटात प्लाइट फेयर फक्त ८५ रुपये आहे. होय, तुम्ही बरोबर वाचलेत. आता हे व्हायरल तिकीट पाहून लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. त्याआधी तिकिटाची एक झलक पाहा.

इंडियन एअरलाइन्सचे 48 वर्षे जुने तिकीट ट्विटरवर @IWTKQuiz नावाच्या हँडलवरून शेअर करण्यात आले आहे. युजरने लिहिलं, मुंबई ते गोवा 48 रुपयांत. या पोस्टला काही तासांत 85 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. याशिवाय युजर्स लाइक आणि कमेंटही करत आहेत. काहींनी तर आपल्या वेळेबद्दल बोलायलाही सुरुवात केली आहे.

एका युजरच्या म्हणण्यानुसार, 1974 मध्ये मंगलोर ते मुंबईचे भाडे 280 रुपये होते. तर आणखी एका युजरचं म्हणणं आहे की, 1982 मध्ये मुंबई ते अहमदाबाद हे भाडे 200 रुपये होतं. आणखी एका युजरने लिहिले की, “काय दिवस होते तेही.” यावर लोक सतत कमेंट देखील करत आहेत.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.