AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गाडीत इंधन भरल्यानंतर मोफत एसी रूम मिळणार? जाणून घ्या मंत्र्यांनी दिलेली ही खास माहिती!

आता कारमध्ये इंधन भरल्यावर मिळणार एसी रूम मोफत? होय! तुम्ही अ‍ॅपद्वारे ही रूम बुक करू शकता. ही सुविधा प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. खुद्द मंत्र्यांनी या योजनेची माहिती दिली असून, ती लवकरच अंमलात येणार आहे.

गाडीत इंधन भरल्यानंतर मोफत एसी रूम मिळणार? जाणून घ्या मंत्र्यांनी दिलेली ही खास माहिती!
Hardip Surya puriImage Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: Jul 20, 2025 | 7:20 PM
Share

देशभरात डिझेल-पेट्रोलचे दर गगनाला भिडले असताना, वाहनचालकांसाठी सरकारने एक दिलासा देणारी आणि उपयुक्त योजना सुरू केली आहे. विशेषतः ट्रक ड्रायव्हर्स जे रात्रंदिवस प्रवास करून देशाची आर्थिक चाके चालवत आहेत, त्यांच्यासाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी नुकतीच याबाबत माहिती ट्विटर (एक्स) च्या माध्यमातून शेअर केली असून, ‘अपना घर’ नावाचा उपक्रम आता राष्ट्रीय महामार्गांवर सुरू करण्यात आला आहे.

अपना घर

या योजनेअंतर्गत ट्रक चालकांना एसी रूम, गरम-थंड पाण्याची व्यवस्था, शौचालय, स्नानगृह, जेवण किंवा स्वयंपाकाची जागा, बेड आणि पार्किंगसारख्या सर्व सोयी मिळणार आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही सर्व सेवा त्यांना अवघ्या 112 रुपयांत 8 तासांसाठी मिळणार आहे. पण जर चालकांनी आपल्या ट्रकमध्ये 50 लिटरपेक्षा जास्त डिझेल भरवलं, तर त्यांना ही सेवा पूर्णपणे मोफत मिळेल.

मोबाईल अ‍ॅपवरून बुकिंगही शक्य

‘अपना घर’ नावाचे मोबाईल अ‍ॅप Google Play Store आणि Apple App Store वर उपलब्ध आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून चालक त्यांच्या सध्याच्या लोकेशननुसार जवळचे ‘अपना घर’ शोधू शकतात आणि थेट बुकिंग करू शकतात. शिवाय, जर कोणी अ‍ॅप वापरत नसेल, तरीही ते डायरेक्ट ‘अपना घर’ वर जाऊनही ही सुविधा घेऊ शकतात.

वाहतूक अपघातांमध्ये होणार मोठी घट

मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितले की, अनेक अपघातांचा मुख्य कारण म्हणजे वाहनचालकांचा पुरेसा आराम न होणे. झोप पूर्ण न झाल्यामुळे अनेक ट्रक ड्रायव्हर्स रस्त्यावर झोपून राहतात, ज्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढतो. पण ‘अपना घर’ सारख्या सुविधांमुळे चालकांना आता कमी किमतीत सुरक्षित आणि आरामदायक विश्रांती मिळणार आहे, जे त्यांच्या आरोग्यासोबतच इतरांच्या सुरक्षेसाठीही फायद्याचे ठरेल.

हॉटेलचा खर्च वाचणार, सेवा मात्र अधिक

लांबच्या प्रवासात ट्रक चालकांना हॉटेल्समध्ये थांबावे लागते आणि त्यासाठी त्यांना भरपूर पैसे मोजावे लागतात. पण आता हेच चालक आरामात ‘अपना घर’ मध्ये थांबू शकतील तेही कमीत कमी खर्चात किंवा मोफत. सरकारचा हा उपक्रम ट्रान्सपोर्ट क्षेत्रासाठी एक मोठा बदल ठरणार आहे.

शेवटी, ‘अपना घर’ हा उपक्रम केवळ चालकांसाठी सोयीचा नाही, तर समाजासाठीही अत्यंत गरजेचा आहे. हे AC रूम्स ड्रायव्हर्सना थकवून चालवण्यापासून वाचवतील, त्यांना सुरक्षित विश्रांती देतील आणि अपघातांचं प्रमाणही कमी करतील. अशा प्रकारे सरकारने केलेली ही पायाभूत गुंतवणूक, केवळ प्रवास सुखकर करणारी नसून, रस्त्यांच्या सुरक्षेसाठीही एक महत्त्वाचं पाऊल आहे.

राणे बंधूंच्या लढाईत निलेश राणेंची सरशी; मालवण, कणकवलीत भाजपला धक्का
राणे बंधूंच्या लढाईत निलेश राणेंची सरशी; मालवण, कणकवलीत भाजपला धक्का.
उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन, भाजपमध्ये वाद
उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन, भाजपमध्ये वाद.
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल.
कुठं कोणाचा सुपडासाफ? कोण कुणाला नडलं? कुठं कोण कुणाशी भिडलं?
कुठं कोणाचा सुपडासाफ? कोण कुणाला नडलं? कुठं कोण कुणाशी भिडलं?.
नगरपालिकेतही देवाभाऊंचा करिष्मा, महायुती 200 पार अन् भाजप सर्वात पक्ष
नगरपालिकेतही देवाभाऊंचा करिष्मा, महायुती 200 पार अन् भाजप सर्वात पक्ष.
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.