VIDEO : लहान मुलांमध्ये तुफान हाणामारी, तुम्ही देशी WWE बघितलं का?, बघितल्यावर पोट धरुन हसाल

VIDEO : लहान मुलांमध्ये तुफान हाणामारी, तुम्ही देशी WWE बघितलं का?, बघितल्यावर पोट धरुन हसाल

सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या एक नवा व्हिडीओ व्हायरल होतोय (funny viral video of children fighting in WWE style).

चेतन पाटील

|

Apr 09, 2021 | 2:43 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या एक नवा व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ म्हणले लहान मुलांच्या WWE चा. अनेकजण लहानपणी WWE पाहायचे. अनेकांना WWE आवडायचं. त्यानंतर मित्रांसोबत खेळताना थोडाफार वाद झाला तर त्यांच्या डोक्यात WWE चं भूत शिरायचं. कुणी अंडरटेकर व्हायचं तर कुणी द ग्रेट खली व्हायचं. तुमच्या याच आठवणींना आम्ही पुन्हा एकदा उजाळा करुन देणार आहोत. कारण सोशल मीडियावर सध्या तसा व्हिडीओ व्हायरल होतोय (funny viral video of children fighting in WWE style).

व्हिडीओत नेमकं काय?

सोशल मीडियावर दोन लहान मुलांच्या हाणामारीचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राउंडला WWE ची कमेंट्रीचा आवाज जोडण्यात आला आहे. या व्हिडीओत जवळपास चार ते पाच लहान मुलं रस्त्यावर उभे आहेत. एका बाजूला सायकल पडली आहे. दुसऱ्या बाजूला दोन मुलांमध्ये तुफान कुस्ती सुरु आहे.

या दोन मुलांच्या आजूबाजूला असणारे बाकीचे मुलं ही कुस्ती बघत आहेत. त्यांच्यापैकी एक मुलगा तर या हाणामारीची प्रचंड मज्जा घेतोय. तो मार खाणाऱ्या मुलाच्या बाजूला प्रचंड नाचताना दिसतोय. जवळपास 30 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओला कुणीतरी कॅमेऱ्यात अचूकपणे कैद करुन सोशल मीडियावर शेअर केला आहे (funny viral video of children fighting in WWE style).

व्हिडीओ नेमका कुठला?

संबंधित व्हिडीओ नेमका कुठला आहे ते समोर आलेलं नाही. पण लहान मुलांची कुस्ती अशी दाखवण्यात आलीय जणू काही WWE ची फाईट सुरु आहे. या व्हिडीओत एक मुलगा लढाईची मजा घेताना दिसतोय तो आकर्षणाचं कारण ठरत आहे. तो उड्या मारतोय, नाचतोय. त्यामुळे अनेकजणांच्या चेहऱ्यावर हा व्हिडीओ पाहून हसू येत आहे.

हेही वाचा : Video | प्रेयसीची आठवण आली, अन् तरुण हमसून हमसून रडायला लागला, नेटकरी म्हणतायत हेच खर्ऱर्रर्ऱ प्रेम, व्हिडीओ पाहाच

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें