Gaurav Taneja Flying Beast: सगळ्यांच्या लाडक्या यूट्युबर ‘फ्लाइंग बीस्ट’ला अखेर जामीन! मेट्रो स्टेशनवर वाढदिवस साजरा, फॅन्सची प्रचंड गर्दी, गौरव तनेजाला अटक

Fying Beast: कुठल्याही परवानगी शिवाय इतकी गर्दी जमवल्यामुळे गौरव तनेजाला अटक करण्यात आली. ही सगळी घटना शनिवारी, 9 जुलैला झाली. काल, रविवारी गौरव तनेजाला जामीन मिळालाय.

Gaurav Taneja Flying Beast: सगळ्यांच्या लाडक्या यूट्युबर 'फ्लाइंग बीस्ट'ला अखेर जामीन! मेट्रो स्टेशनवर वाढदिवस साजरा, फॅन्सची प्रचंड गर्दी, गौरव तनेजाला अटक
Gaurav Taneja Flying Beast arrestImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 11, 2022 | 7:25 AM

नवी दिल्ली: गौरव तनेजा (Gaurav Taneja) हा सध्याचा खूप चर्चेचा विषय’आहे. भारतातला सगळ्यात फेमस व्लॉगर (Famous Vlogger Flying Beast) असणाऱ्या गौरव तनेजाचा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त त्याच्या पत्नीनं, रितू राठीनं गौरवच्या फॅन्सला भेटण्यासाठी आणि त्याच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी मेट्रो स्टेशनवर बोलावलं. जेव्हा तिने हे इंस्टाग्रामवरून अनाऊन्स केलं तेव्हा तिला पुढे काय होईल याचा अंदाज आला नव्हता. तिने इंस्टाग्रामवर येत लोकांना एक वेळ दिली आणि त्या वेळेला मेट्रो स्टेशनवर हिरा स्वीट्स समोर यायला सांगितलं. दिलेल्या वेळी गौरव तनेजाला भेटायला इतकी गर्दी झाली की ती गर्दी नियंत्रणात आणणं अवघड झालं. मुळातच इतक्या संख्येनं लोकं उपस्थित राहतील अशी अपेक्षा रितू राठीला (Ritu Rathee) नव्हती त्यामुळे हा सगळं गोंधळ उडाला. कुठल्याही परवानगी शिवाय इतकी गर्दी जमवल्यामुळे गौरव तनेजाला अटक करण्यात आली. ही सगळी घटना शनिवारी, 9 जुलैला झाली. काल, रविवारी गौरव तनेजाला जामीन मिळालाय. नोएडामध्ये कोव्हिडची वाढती प्रकरणे लक्षात घेता तनेजा यांना यापूर्वी प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले होते.

नेमकं काय घडलं?

युट्यूबर गौरव तनेजा याला शनिवारी उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.खरंतर त्याच्या चाहत्यांनी त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मेट्रो स्टेशनवर मोठ्या संख्येने गर्दी केली होती. तनेजा यांनी आपल्या इन्स्टाग्राम पेजवर एक पोस्ट करत चाहत्यांना मेट्रो स्टेशनवर जमण्यास सांगितलं होतं. यानंतर सेक्टर 51 मेट्रो स्टेशनवर हजारो लोक जमा झाले, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. गौरव तनेजा यांचे इन्स्टाग्रामवर ३३ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. गौरवची पत्नी रितू राठी, जिचे इन्स्टाग्रामवर 1.6 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत, तिने इन्स्टाग्रामवर सांगितले होते की तिने एक संपूर्ण मेट्रो बुक केली आहे ज्यामध्ये ती तनेजाचा वाढदिवस साजरा करेल आणि केक कापेल.

कोणत्या कलम अंतर्गत गुन्हा?

त्याच्यावर कलम 341 आणि 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. परवानगी न घेताच जमावाला सेलिब्रेशनला बोलावल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. तेही नोएडामध्ये कलम १४४ लागू असताना. मात्र, रात्रीच गौरव तनेजा यांना बेल मिळाली. बाहेर पडल्यानंतर रात्री उशिरा त्याने घरी पत्नीसोबत वाढदिवस साजरा करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

कोण आहे गौरव तनेजा?

गौरव तनेजा युट्युबर आहे. त्याच्या फॅमिली व्लॉग मुळे तो खूप प्रसिद्ध आहे. युट्यूबवर तो फ्लायिंग बीस्ट नावाने आहे. कानपूर मध्ये जन्मलेल्या गौरवने आधी आयआयटी केलंय त्यानंतर तो पायलट झाला आणि मग तो या क्षेत्राकडे वळला. मध्यंतरी त्याने एलएलबी साठी प्रवेश घेतला होता. युट्यूबर गौरव तनेजाचे इन्स्टाग्रामवर 30 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. यूट्यूबवर त्याच्या चॅनलवर 7 कोटीहून अधिक सब्सक्रायबर्स आहेत. त्याचे आणखी २ चॅनल आहेत. तो एका टीव्ही शो मध्ये सुद्धा सहभागी झाला होता.

Non Stop LIVE Update
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.