या राज्यात भरते भूतांची जत्रा, पाहून थरकाप उडले! एका बंद डब्ब्यात… नेमकं काय घडतं?
एक नवका बाबा मंदिर खूपच रहस्यमय आहे. येथे एक मेळावा भरतो. या मेळाव्यात देशभरातून लोक भूतबाधा, त्वचारोग आणि मानसिक समस्यांच्या निवारणासाठी येतात. या मेळाव्याला भूतांचा मेळावा असेही म्हणतात. या मंदिराची कथा खूपच रंजक आहे. चला जाणून घेऊया, वर्षांपूर्वी येथे नेमके काय घडले होते...

आपल्या देशात अनेक रहस्यमय स्थळे आहेत. त्यांच्या कथा तर त्याहूनही अधिक रहस्यांनी भरलेल्या आहेत. असेच एक ठिकाण आहे, नवका बाबा मंदिर. मनियर गावात असलेले हे मंदिर किती जुने आहे, हे कोणालाच माहीत नाही. पण हो, या मंदिरात भूतबाधेने ग्रस्त असलेले लोक देशभरातून येतात आणि आपल्या समस्यांचे समाधान मिळवतात. भूत-प्रेतांपासून मुक्ती देणाऱ्या या मंदिर परिसरात नवरात्रीच्या काळात एक मेळावा भरतो. हजारोंच्या संख्येने लोक येथे जमतात, त्या वेळी येथील दृश्य अत्यंत भयावह असते.
उत्तर प्रदेशातील बलियातील या मंदिराचे पुजारी श्रीराम उपाध्याय सांगतात की, प्राचीन काळात मगध प्रांतातून, ज्याला आज बिहार म्हणतात, तिथून दोन भाऊ येथे आले होते. त्या वेळी येथे एक दाट जंगल होते. या दोन्ही भावांनी खूप मेहनत करून येथे साफसफाई केली आणि या मंदिराची स्थापना केली. त्या वेळी या जंगलात एक भूतीन राहत होती. तिने या दोन्ही भावांना मारून त्यांच्या आत्म्यांना एका छोट्या डब्यात बंद केले होते.
Viral Video: AC कोचमध्ये सिगारेट ओढत होती मुलगी, लोकांनी विरोध करताच…
दोन्ही भावांच्या तेजाने डायन भस्म झाली
या डब्यात बंद झाल्यावरही या दोन्ही भावांचे तेज कायम राहिले. त्या तेजाने संपूर्ण जंगल आपोआप साफ झाले. त्याच आगीत ती डायनही जळून खाक झाली. त्यानंतर हे दोन्ही भाऊ स्थानिक लोकांना स्वप्नात येऊ लागले आणि त्यांनी लोकांना प्रेरित करून येथे आपले स्थान बनवले. तेव्हापासून हे ठिकाण भूतबाधेसह इतर पारलौकिक शक्तींपासून मुक्ती देण्याचे केंद्र बनले. सुरुवातीला येथे फक्त आसपासचे लोक येत असत, पण हळूहळू या मंदिराची कीर्ती वाढत गेली. आता या मंदिरात यूपी-बिहारच नव्हे, तर दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश आणि दक्षिण भारतातील अनेक राज्यांमधूनही लोक येतात.
त्वचारोग आणि भूत-प्रेतांपासून मुक्तीचा दावा
मंदिराचे पुजारी श्रीराम उपाध्याय यांनी पुढे सांगतले की, या मंदिरात केवळ भूतबाधेपासूनच नव्हे, तर कुष्ठरोग, पांढरे डाग यासह इतर असाध्य त्वचारोगांपासूनही मुक्ती मिळते. त्यांनी सांगितले की, गेल्या काही काळापासून लोक येथे मानसिक आजारांच्या समाधानासाठीही येऊ लागले आहेत. अशी श्रद्धा आहे की, या मंदिराच्या प्रसादाने आणि उपचाराने लोकांना फायदा होतो. त्यामुळे लोक एकदा येथे इच्छा मागण्यासाठी येतात आणि दुसऱ्यांदा इच्छा पूर्ण झाल्यावर प्रसाद अर्पण करण्यासाठी येतात. या मंदिरात विशेषतः नवरात्रीच्या काळात मोठा मेळावा भरतो. याला भूतांचा मेळावा म्हणतात.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
