Love you Zindagi वर नाचणाऱ्या तरुणीवर आयुष्य रुसलं, 30 व्या वर्षीच अखेरचा श्वास

'लव्ह यू जिंदगी' या गाण्यावर ठेका धरणाऱ्या कोरोनाग्रस्त तरुणीचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता (Girl Dancing to Love you Zindagi)

Love you Zindagi वर नाचणाऱ्या तरुणीवर आयुष्य रुसलं, 30 व्या वर्षीच अखेरचा श्वास
Girl Dancing to Love you Zindagi Dies

मुंबई : शाहरुख खान आणि आलिया भट्ट यांच्या ‘डिअर जिंदगी’ चित्रपटातील ‘लव्ह यू जिंदगी’ (Love you Zindagi ) हे गाणं कठीण काळात अनेकांच्या मनाली उभारी देतं. ऑक्सिजन मास्क लावूनही याच गाण्यावर ताल धरणाऱ्या एका युवतीचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी समोर आला होता. परंतु कोव्हिडशी झुंज देताना या तरुणीने वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षीच जगाचा निरोप घेतला. (Girl Dancing to Love you Zindagi Trending song on Viral Social Media Video Dies of COVID)

आशेचा किरण देणारी युवती

सोशल मीडियावर ‘लव्ह यू जिंदगी’ या गाण्यावर ठेका धरणाऱ्या कोरोनाग्रस्त तरुणीचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ कोरोना काळातील भयानक आणि वेदनादायी चित्रांदरम्यान आशेचा नवीन किरण असल्याचे बोललं जात होतं. मात्र तीच उत्साहाने भरलेली युवती आता या जगात राहिली नाही. उपचारादरम्यान तिचे निधन झाले.

डॉ. मोनिका लेंगे यांनी शेअर केलेला व्हिडीओ

डॉ. मोनिका लेंगे यांनी रुग्णालयाच्या कोव्हिड इमर्जन्सी वॉर्डमधील तरुणीची प्रेरणादायी गोष्ट ट्विटरवर एका व्हिडिओसह शेअर केली होती. Lesson: Never lose hope असं कॅप्शन देत डॉक्टरांनी तिची संघर्षगाथा सांगितली होती. कुठल्याही परिस्थितीत उमेद हरवू नका, आशा कायम जागृत ठेवा, असा संदेशच ती तरुणी देत होती. बर्‍याच काळापासून तो व्हिडीओ ट्रेंड होताना दिसला.

तरुणीला आयसीयू बेड मिळाला नव्हता

8 मे रोजी दिलेल्या माहितीनुसार तिला आयसीयू बेड मिळत नव्हता. त्यामुळे ती कोव्हिड इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल होती. तिला नॉन इन्व्हेसिव वेंटिलेशनवर (एनआयव्ही) (Non Invasive Ventilation – NIV) ठेवण्यात आले होते. याशिवाय तिला रेमडेसिव्हीर आणि प्लाझ्मा थेरपीही दिली जात होती.

संगीत ऐकण्याची तरुणीची इच्छा

डॉ मोनिका लांगेह यांनी लिहिलं होतं, की त्या तरुणीची इच्छाशक्ती दांडगी आहे. रुग्णालयात दाखल झाल्यावर तिने विचारलं होतं, की मनोबल वाढवण्यासाठी आपण काही संगीत लावू शकतो का. डॉक्टरांनी शाहरुख खान आणि आलिया भट्ट यांचा 2016 मधील चित्रपट ‘डिअर जिंदगी’तील ‘लव्ह यू जिंदगी’ हे गाणं लावलं होतं. त्यावर ती थिरकू लागली. (Girl Dancing to Love you Zindagi)

तब्येत ढासळली आणि…

तरुणीची प्रकृती सुधारत आहे, असं त्यावेळी डॉक्टरांकडून सांगण्यात आले होते. तिला डिस्चार्ज देण्याचा विचारही डॉक्टर करत होते. पण अचानक तिची तब्येत ढासळली आणि तिने अखेरचा श्वास घेतला. तिच्या निधनाच्या वृत्ताने नेटिझन्सही हळहळले.

संबंधित बातम्या :

‘तेरा मुझसे है पहले का नाता कोई…’ व्हिडीओ कॉलवर लेकाचं गाणं, आईला अखेरचा निरोप

(Girl Dancing to Love you Zindagi Trending song on Viral Social Media Video Dies of COVID)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI