Video | इंजेक्शनची सुई पाहून तरुणीला फुटला घाम, नंतर जे घडलं ते एकदा पाहाच !

इंजेक्शनच्या भीतीमुळे एका तरुणीची होत असलेली घबराट, तिला वाटत असलेली भीती सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. (girl scared crying during covid vaccination)

Video | इंजेक्शनची सुई पाहून तरुणीला फुटला घाम, नंतर जे घडलं ते एकदा पाहाच !
YOUNG GIRL INJECTION VIRAL VIDEO
Follow us
| Updated on: May 04, 2021 | 7:56 PM

मुंबई : देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोज हजारो रुग्ण आढळत आहेत. कोरोनाला थोपवायचे असेल तर लसीकरणाची मोहीम युद्धपातळीवर राबवणे हाच नामी उपाय असल्याचे सांगितले जात आहे. सध्या देशात 18 वर्षावरील सर्वांचे लसीकरण केले जात आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर अनेक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहेत. इंजेक्शन आणि सुईच्या भीतीमुळे एका तरुणीची होत असलेली घबराट, तिला वाटत असलेली भीती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. (girl getting scared and crying during Covid vaccination video goes viral on social media)

इंजेक्शन पाहून तरुणी घाबरली

अनेकांना इंजेक्शनच्या सुईची प्रचंड भीती वाटते. इंजेक्शन टोचायचं म्हटलं तर अनेकांचा थऱकाप उडतो. लहान मुलापासून ते मोठमोठ्या व्यक्तींमध्ये इंजेक्शनविषयीची भीती आपल्याला दिसते. कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी तर चक्क दोन वेळा इंजेक्शन घ्यावे लागणार आहे. थोड्या दिवसांच्या फरकाने ही दोन्ही इंजेक्शन टोचून घ्यावी लागणार आहेत. हीच लस घेताना सध्या एका तरुणीची चांगलची भंबेरी उडाली आहे. तिला वाटत असलेली इंजेकक्शनची भीती ही सोशल मीडियावर चर्चाचा विषय ठरली आहे. ही तरुणी इंजेक्शन टोचून घेताना सुई पाहून चांगलीच घाबरलेली आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होतोय.

व्हिडीओमध्ये काय आहे ?

व्हिडीओमध्ये एक तरुणी लसीकरण केंद्रामध्ये कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी गेली आहे. येथे एक नर्स तिला लस देत आहे. मात्र, इंजेक्शन टोचून घेताना ही मुलगी प्रचंड घाबरलेली दिसतेय. यावेळी घाबरल्यामुळे ती तिच्या आईलासुद्धा बोलवत असल्याचे दिसत आहे. चेहऱ्याला मास्क असल्यामुळे या तरुणीचा पूर्ण चेहरा दिसत नाहीये.  व्हिडीओमध्ये ही तरुणी लस घेण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचेसुद्धा दिसतेय. तिच्या सोबत आलेल्या तिच्या मेत्रिणी तिला समजावताना दिसतायत. याच कारणामुळे ही तरुणी नर्सचे बोलणेसुद्धा खात आहे. या निर्सने तरुणीला चांगलंच फटकारल्याचं दिसतंय. मात्र, तरुणीचा हा व्हिडीओ सध्या अनेकांना आवडला आहे. या व्हिडीओला पाहून अनेकजण पोट धरून हासत आहेत.

पाहा व्हिडीओ :

तरुणीची सोशल मीडियावर चर्चा

दरम्यान, शेवटी थोडं फटकारल्यानंतर ही तरुणी लस घेण्यासाठी तयार झाल्याचं दिसत आहे. नंतर तिने कोरोना लस घेतली. मात्र, तिचा हा व्हिडीओ मजेशीर असल्याचं अनेकांनी म्हटलंय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर आल्यानंतर त्यावर मजेदार कमेंट्स येत आहेत. तसेच तरुणीचा हा भित्रेपणा अनेकांना खळखळून हसवतोय. सोशल मीडियावर सध्या या व्हिडीओची चांगलीच चर्चा होतेय.

इतर बातम्या :

Video | जीव वाचवण्यासाठी आईला तोंडावाटे श्वास, मुलीकडून जीवाच्या आकांताने प्रयत्न, व्हिडीओ व्हायरल

Video | कोविड वॉर्डमध्ये कर्तव्यावर असणाऱ्या नर्सची देशभरात चर्चा, व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा सॅल्यूट ठोकाल

Video | कोरोनामुक्त झालेल्या तरुणाचा धडाकेबाज डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा थिरकणार !

(girl getting scared and crying during Covid vaccination video goes viral on social media)

Non Stop LIVE Update
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.