AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगभरातील आनंदी देशांची यादी जाहीर; आपला भारत कोणत्या क्रमांकावर?

जगभरातील आनंदी देशांची यादी जाहिर करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या 2025 च्या जागतिक आनंद अहवालानुसार कोणता देश कोणत्या स्थानावर आहे याची यादी जाहिर करण्यात आली आहे. त्यात आपला भारत कितव्या क्रमांकावर आहे माहितीये?

जगभरातील आनंदी देशांची यादी जाहीर; आपला भारत कोणत्या क्रमांकावर?
Global Happiness Index 2025 India Ranking, Top 5 Happiest Countries Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 21, 2025 | 2:55 PM
Share

‘आंतरराष्ट्रीय आनंद दिना’निमित्त, संयुक्त राष्ट्रांनी जगातील सर्वात आनंदी देशांची यादी जाहीर केली आहे. 2025 च्या या यादीत 147 देशांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामध्ये अनेक युद्धग्रस्त देशांचाही समावेश आहे. या अहवालात समाविष्ट असलेल्या 147 देशांना तेथील लोकांच्या जीवनमानाच्या गुणवत्तेच्या आधारे क्रमांक देण्यात आले आहेत. अहवाल तयार करण्यासाठी वेगवेगळे प्रश्न विचारात घेण्यात आले आहेत.

कोणत्या देशातील लोक त्यांच्या आयुष्यात किती आनंदी आहेत?

या प्रश्नांमध्ये कोणत्या देशातील लोक त्यांच्या आयुष्यात किती आनंदी आहेत, त्यांच्याकडे किती पैसे आहेत, त्यांचे आरोग्य कसे आहे आणि ते किती स्वतंत्र आहेत, अशा विविध प्रश्नांचा विचार करून , आढावा घेऊय आनंदी देश या यादीत प्रत्येकाला क्रमांक देण्यात आले आहेत.

वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2025 नुसार देशांची यादी जाहीर 

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या वेलबीइंग रिसर्च सेंटरने गॅलप, यूएन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्क आणि स्वतंत्र संपादकीय मंडळाच्या भागीदारीत जागतिक आनंद अहवाल 20 मार्च रोजी प्रकाशित केला. हा अहवाल तयार करताना देशातील उत्पन्न, सामाजिक आधार, निरोगी आयुष्य , स्वातंत्र्य, उदारता आणि भ्रष्टाचाराचे प्रमाण या महत्त्वाच्या निकषांचा विचार केला जातो. या अहवालामध्ये सर्वात आनंदी आणि सर्वात कमी आनंदी देशांमधील तफावत अधोरेखित करण्यात आली आहे.

यादीत भारत कितव्या स्थानावर 

जसं की या यादीत अफगाणिस्तान सर्वात खालच्या स्थानावर असल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे. तर पहिल्या 5 देशांमध्ये फिनलंड पहिल्या क्रमांकावर असून डेन्मार्क दुसऱ्या स्थानावर आहे. यानंतर आइसलँड, स्वीडन आणि नेदरलँड्स यांचा क्रमांक लागतो. या यादीत आपला भारत हा 118 व्या स्थानावर आहे. आपल्या भारताचा क्रमांक पाहता खरोखरच विचार करण्याची गरज आहे हे लक्षात येतं.

तर, पाकिस्तानने याबाबतीत भारताला मागे टाकलं 

पण 2024 च्या तुलनेत भारताचे रँकिंग सुधारलं आहे. गेल्या वर्षी भारत हा 126 व्या क्रमांकावर होता. जगातील सर्वात आनंदी देशांच्या यादीत पाकिस्तानचा क्रमांक भारतापेक्षा चांगला आहे. या यादीत पाकिस्तान भारतापेक्षा 9 स्थानांनी वर आहे. म्हणजेच 109 व्या स्थानावर आहे. जगातील अनेक युद्धग्रस्त देशांची क्रमवारीही भारतापेक्षा चांगली दाखवण्यात आली आहे. यामध्ये युक्रेन, पॅलेस्टाईन, इराक, इराण सारखे देश देखील समाविष्ट आहेत.

वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2025 नुसार देशांची क्रमवारी

भारत आणि शेजारील देशांची स्थिती भारत – 118 वा क्रमांक श्रीलंका – 133 वा क्रमांक बांगलादेश – 134 वा क्रमांक पाकिस्तान – 109 वा क्रमांक नेपाळ – 92 वा क्रमांक चीन – 68 वा क्रमांक

पहिल्या 20 आनंदी देशांची यादी:

फिनलंड डेन्मार्क आइसलँड स्वीडन नेदरलँड्स कोस्टा रिका नॉर्वे इस्रायल लक्झेंबर्ग मेक्सिको ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड स्वित्झर्लंड बेल्जियम आयर्लंड लिथुआनिया ऑस्ट्रिया कॅनडा स्लोव्हेनिया चेक प्रजासत्ताक

अमेरिका आणि यूकेची स्थिती

अमेरिका – 24 वा क्रमांक युनायटेड किंग्डम – 23 वा क्रमांक

सर्वात कमी आनंदी देश अफगाणिस्तान – 147 वा (शेवटचा क्रमांक) सिएरा लिओन लेबनॉन

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.