Goat Selfie Viral Video | बकरीला सेल्फी नाही रुचली, थेट शिंगेच तरुणीला टोचली

यामध्ये एक तरुणी जंगलात बकरीसमोर लाईव्ह शूट करताना दिसत आहे (Goat Selfie Viral Video).

Goat Selfie Viral Video | बकरीला सेल्फी नाही रुचली, थेट शिंगेच तरुणीला टोचली
goat-selfie

मुंबई : सध्या सेल्फी काढण्याचा आणि व्हिडीओ शूट करण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे (Goat Selfie Viral Video). लोक वेगववेगळ्या अंदाजात सेल्फी घेतात आणि सोशल मीडियावर अपलोडही करतात. खरंतर हा सेल्फी त्यासाठीच काढला जातो. आपला सेल्फी सर्वात हटके असावा यासाठी लोक अतिधोकाही पत्करतात. अनेकांना लाईव्ह व्हिडीओचीही आवड असते. त्यांना लाईव्ह व्हिडीओ थेट आपल्या सोशल मीडिया अकाउण्टवर दाखवतात. पण, अनेकदा ही आवड तुम्हाला अडचणीत आणू शकते. असंच काहीसं या महिलेसोबत झालं आहे (Goat Selfie Viral Video Woman Kicked By Goat During Live Video).

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरुणी जंगलात बकरीसमोर लाईव्ह शूट करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये दोरखंडाला बांधली असलेली बकरीच्या समोर तरुणी वेगवेगळे एक्सप्रेशन्स देते आहे आणि शूटिंग करत आहे. बांधलेली बकरीही पुढे मागे करत आहे. तेव्हा अचानक बकरी वेगात येते आणि तरुणीला शिंग मारते. त्यामुले तरुणीचा मोबाईलही पडतो.

पाहा व्हिडीओ –

या व्हिडीओला इन्स्टाग्रामवर thewildcapture नावाच्या अकाउण्टवरुन शेअर करण्यात आला आहे. पण, बकरीने शिंग मारल्यानंतर हा व्हिडीओ इथेच संपतो. त्यामुळे या तरुणीली दुखापत झाली की नाही याची काहीही माहिती नाही.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोक हा व्हिडीओ फक्त शेअरच करत नाहीये तर सेल्फी क्लिक करताना आणि व्हिडीओ बनवताना सावधान रहाण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. तर काही लोक या तरुणीच्या मूर्खपणावर हसत आहेत. काहींनी तिला सुरक्षेसाठी हेल्मेट वालण्याचीही सल्ला दिली.

Goat Selfie Viral Video Woman Kicked By Goat During Live Video

संबंधित बातम्या :

सहा बायका, 28 मुलं; नग्न मुलींचा डान्स फेस्टिव्हल भरवणाऱ्या ‘या’ राजाचा मृत्यू कशामुळे झाला?

VIDEO : आई-वडिलांचा भीषण अपघात, आकांताने रडणाऱ्या चिमुरडीसाठी होमगार्ड सरसावला, मनाला चटका लावणारा व्हिडीओ

VIDEO : आधी गुडघा टेकला, मग पुष्पगुच्छ, नंतर अश्रूंचा बांध फुटला, तरुणीच्या प्रपोजचा व्हिडीओ होतोय व्हायरल

Published On - 11:58 am, Sat, 13 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI