मुंबईत होतेय एका 10 कोटींच्या सफरचंदाची तुफान चर्चा; यात असं काय खास आहे? पाहा कसं दिसतं हे सफरचंद…
मुंबईत सध्या एका सफरचंदाची तुफान चर्चा होताना दिसत आहे. कारण या सफरचंदाची किंमत आहे 10 कोटी. एवढंच नाही तर या सफरचंदाची नोंद ही इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे. पण या सफरचंदाची एवढी किंमत का आहे? त्यात असं काय खास आहे? चला जाणून घेऊयात.

कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल सांगता येत नाही. सध्या मुंबईत अशीच एक गोष्ट प्रचंड व्हायरल होत आहे. चर्चेत आहे ती वस्तू म्हणजे एक सफरचंद. पण हा सफरचंद काही सामान्य नाही तर हे सफरचंद चक्क 10 कोटींचं आहे. होय , हे सफरचंद खरंच तब्बल 10 कोटींचे आहे. प्रत्येक मुंबईकराला या सफरचंदाची एक झलक पाहायची आहे.
चक्क 10 कोटींचे सफरचंद
या सफरचंदाची एवढी किंमत आहे कारण ते पूर्णपणे 9 कॅरेट 36 सेंट हिरे आणि 18 कॅरेट सोने वापरले गेले आहेत. हे सफरचंद बनवलं आहे रोहित पिसाळ यांनी. रोहित पिसाळ यांना गोल्ड मॅन म्हणून ओळखले जाते. हे सफरचंदाचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये समाविष्ट झाले आहे आणि सध्या थाई रॉयल पॅलेसमध्ये ते विक्रीसाठी आहे.पिसाळ यांनी हे सफरचंद अतिशय काळजीपूर्वक डिझाइन केले आहे, जे पूर्णपणे 18 कॅरेट सोने आणि चमकदार हिऱ्यांनी सजवलेले आहे. त्यामुळे ते अतिशय आकर्षक दिसत आहे.
असं काय खास आहे या सफरचंदात
प्रमाणपत्रानुसार, हे सफरचंद 9 कॅरेट 36 सेंट हिऱ्यांनी जडवलेले आहे. 18 कॅरेट सोन्याचे वजन अंदाजे 29 ग्रॅम आहे. यात एकूण 1,396 तुकडे वापरले गेले. सफरचंदाचे सौंदर्य आणि कारागिरी पाहता, या सफरचंदांचे नाव थेट इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे.
थायलंडमध्ये तर सफरचंदाच्या खरेदीसाठी मागणी वाढली आहे
जगप्रसिद्ध वर्ल्ड इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूटने देखील या सफरचंदाचे प्रमाणन केले आहे. शिवाय, ते आता थायलंडमधील रॉयल पॅलेसमध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. जिथे या सफरचंदाची मागणी आणखीणच वाढल्याचं दिसत आहे. ते जास्त किमतीत खरेदी करण्यासाठी लोक तयार असल्याचं म्हटलं जात आहे.
सफरचंदाचे थेट इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव
रोहित पिसाळ म्हणतात की त्यांनी हे सफरचंद बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. तसेच कलात्मकतेच्या मिश्रणाने तयार केले आहे. हे सफरचंद केवळ एक डिझाइन नाही तर भारतीय दागिन्यांच्या कलेचं सुंदर आणि अनोखं असं प्रतीक आहे. त्यामुळे हे सफरचंद आता चर्चेचा विषय बनसा आहे.
