काळीज चिरणारी घटना! बायकोच्या मृत्यूचा इतका मोठा धक्का बसला की 12 तासात त्यानेही जीव सोडला; अख्खं गाव रडलं ढसाढसा
एक काळीज चिरणारी घटना समोर आली आहे. बायकोच्या निधनानंतर नवऱ्याला मोठा धक्का बसला. त्याने देखील १२ तासाच्या आत जीव सोडला. या घटनेमुळे अख्ख गाव ढसाढसा रडलं.

नवरा-बायकोचे नाते हे सात जन्माचे असते असे म्हटले जाते. बहुतांश वेळा भांडणानंतर देखील नवरा-बायको संसारात तडजोड करुन एकत्र राहातात. म्हणूनच ही समजूत देखील दृढ आहे की, एखाद्या व्यक्तीने एकदा कोणाशी लग्न केले की ते मृत्यूपर्यंत चालू राहते आणि त्या विवाहात पवित्रता असते. असेच काहीसे एका जोडप्यासोबत घडले आहे. बायकोचे निधन झाल्यानंतर नवऱ्याला मोठा धक्का बसला. बारा तासाच्या आता नवऱ्याचाही मृत्यू झाला आहे.
नेमकं काय घडलं?
झांसीच्या गरौठा नगरात समाजसेवी दांपत्य राम रतन गुप्ता आणि रामदेवी गुप्ता यांच्या दु:खद निधनाने नगरवासीयांना धक्का बसला. सकाळी रामदेवी गुप्ता यांचे निधन झाले आणि अवघ्या काही तासांनंतर त्यांचे पती राम रतन गुप्ता यांनीही अखेरचा श्वास घेतला. ही घटना नगरातील लोकांसाठी शोक आणि धक्क्याचा विषय ठरली आहे.
वाचा: गौतमी पाटीलची दर महिन्याची कमाई किती? आकडा वाचून फुटेल घाम
12 तासाच्या आत पतीचा देखील मृत्यू
राम रतन गुप्ता यांनी आपल्या 60 वर्षांच्या आयुष्यात नगर आणि समाजाच्या सेवेत आपले योगदान दिले. धर्मार्थ कार्य आणि समाजसेवेसाठी ते संपूर्ण नगरात प्रसिद्ध होते. त्यांच्या मेहनती आणि समर्पणामुळे अनेक गरजू कुटुंबांना मदत मिळाली होती. रामदेवी गुप्ता याही आपल्या पतीसोबत प्रत्येक सामाजिक आणि धर्मार्थ कार्यात सक्रिय होत्या.
काही तासांच्या अंतराने पती-पत्नीचे एकाच दिवशी निधन होणे हे चर्चेचा विषय ठरला आहे. असे म्हटले जात आहे की त्यांचे बंधन केवळ जीवनापुरते मर्यादित नव्हते, तर मृत्यूपर्यंतही अटळ राहिले. नगरवासीयांनी त्यांचे आदर्श दांपत्य म्हणून स्मरण केले. त्यांच्या मुलांनी आज दोघांचे एकत्र अंतिम संस्कार केले, आणि संपूर्ण नगराच्या डोळ्यात अश्रू होते.
नगरात या दांपत्याच्या निधनानंतर शोक व्यक्त केला जात आहे. लोक म्हणतात की राम रतन आणि रामदेवी गुप्ता यांनी खऱ्या अर्थाने विवाहाचे सात वचन पाळले आणि आयुष्यभर एकमेकांना साथ दिली. त्यांचे जीवन प्रेम, समर्पण आणि समाजसेवेचे प्रतीक होते. गरौठा नगराने एक आदर्श समाजसेवी जोडी गमावली आहे. त्यांचे योगदान आणि जीवनातील आदर्श येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणा बनतील. राम रतन आणि रामदेवी गुप्ता यांनी हे दाखवून दिले की खरे प्रेम आणि समर्पण केवळ जीवनातच नाही, तर मृत्यूपर्यंतही एकत्र राहते.
