डोंगरात फिरायला गेले अन् अर्ध्या तासात करोडपती झाले? काय घडलं त्या माळरानावर?
चेक रिपब्लिकमधील दोन ट्रेकर्सना क्रकोनोस पर्वतावर ट्रेकिंग करताना एक अॅल्युमिनियमचा बॉक्स सापडला. या बॉक्समध्ये सोन्याची नाणी, दागिने आणि इतर वस्तू होत्या. या खजिन्याचे मूल्य सुमारे तीन कोटी रुपये आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे आणि या खजिन्याच्या मूळाबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. खजिना संग्रहालयात जमा करण्यात आला असून त्याचे विश्लेषण सुरू आहे.

अनेकदा तुमच्या सवयींवरून लोक तुम्हाला नावं ठेवतात. पण या सवयी कधी कधी फायद्याच्याही ठरतात. चेक रिपब्लिकच्या दोन लोकांना फिरण्याची भारी आवड. त्यातही डोंगर असेल तर मग बघायला नको. डोंगरावर फिरायला जाणं या दोघांना प्रचंड आवडायचं. त्या दिवशीही दोघं डोंगरावर फिरायला गेले अन् अवघ्या अर्ध्या तासात करोडपती झाले. डोंगरावर चालता चालता त्यांच्या हाताला मोठा खजिना लागला. कुणीच कल्पना करणार नाही असा खजिना या दोघांच्या हाती लागला. या दोघांना एक बॉक्स सापडला. त्यात सोन्याची नाणी आणि दागिने होते. मग काय गावाने ओवाळून टाकलेले हे दोघे क्षणार्धात श्रीमंत झाले.
हे दोघेही डोंगर पार करत होते. त्याचवेळी त्यांच्या हाती असं काही लागलं की त्यांचा त्यावर विश्वासच बसेना झाला. चेक रिपब्लिकमधील ही घटना आहे. दोन लोकांच्या हाती मोठा खजिना लागला. फेब्रुवारीमध्ये दोघेही जेव्हा उत्तर पूर्व चेक रिपब्लिकच्या क्रकोनोस पर्वतावरील एका डोंगरावर फिरत होते. त्यावेळी त्यांची नजर एका दगडावर पडली. त्या दगडातून एक ॲल्युमिनियमचा बॉक्स बाहेर पडत असल्याचं त्यांनी पाहिलं.
नाणी आणि दागिणे
बॉक्स दिसल्याने दोघेही धावतपळत गेले. त्यांनी हा बॉक्स सावकाशपणे बाजूला केला. तो उघडला तर त्यता त्यांना 15 पाऊंडचा खजिना सापडला. त्यात दहा बांगड्या, 16 सिगार केस, एक पाऊडर कॉम्पॅक्ट, एक कंगवा, एक चावी असणारी चेन आणि 598 सोन्याची नाणी सापडली.
संग्रहालयात जमा
ज्या दोघांना हा खजिना सापडला त्यांनी आपलं नाव गुप्त ठेवलं. खजिना मिळाल्यावर त्यांनी पूर्व बोहेमिया संग्रहालयाला हा खजिना सुपुर्द केला. या खजिन्याचं मूल्यांकन अजून केलं जात आहे. कारण सिगारच्या दोन बॉक्सेस उघडणं अजून बाकी आहे.
3 कोटींची नाणी
सीएनएननुसार, संग्रहालय विशेषज्ञ वोज्टेक ब्रॅडल यांच्या मतानुसार, फक्त या सोन्याच्या नाण्यांचं जन 8.16 पाऊंड आहे. म्हणजे सुमारे 360,000 डॉलर (तीन करोड़ रुपये) आहे. पण तज्ज्ञ या खजिनाच्या शोधावरून संभ्रमित आहे. या बॉक्समध्ये 1921मधील काही नाणीही आहेत. त्यामुळेच खजिन्याच्या उत्पत्तीबाबत अजून चर्चाच सुरू आहे.
स्थानिकांनी उडवला अफवांचा बाजार
या घटनेनंतर स्थानिक पातळीवर अफवांचा बाजार सुरू आहे. या परिसरातील श्रीमंत कुटुंबाशी या संपत्तीचा संबंध असू शकतो, असं काही लोकांचं म्हणणं आहे. एकदा या खजिन्याचं विश्लेषण झालं तर त्याला संरक्षित करून संग्रहालयात ठेवलं जाणार आहे. दरम्यान, या दोन्ही तरुणांना खजिन्याच्या मूल्याच्या आधारे बक्षीस दिलं जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे.
