AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हँड ग्रेनेडचा स्फोट किती वेळात होतो आणि त्यांनतरही वाचण्यासाठी मिळतो का वेळ? जाणून घ्या

तुम्ही अनेकदा चित्रपटांमध्ये पाहिलं असेल की सैनिक ग्रेनेडची पिन खेचतो आणि काही सेकंदांनी तो फुटतो. पण नेमका किती वेळ असतो त्या स्फोटामध्ये? आणि त्या थोड्याशा वेळेत एखादा व्यक्ती स्वतःला वाचवू शकतो का? हे प्रश्न अनेकांच्या मनात असतात. चला, जाणून घेऊया हँड ग्रेनेडची संपुर्ण माहिती

हँड ग्रेनेडचा स्फोट किती वेळात होतो आणि त्यांनतरही वाचण्यासाठी मिळतो का वेळ? जाणून घ्या
| Edited By: | Updated on: Jul 08, 2025 | 3:40 PM
Share

आजचं युग जरी फायटर जेट्स आणि अत्याधुनिक क्षेपणास्त्रांचं असलं, तरीही हँड ग्रेनेडचं महत्त्व अजूनही संपलेलं नाही. लहान ऑपरेशन्स, दहशतवाद्यांविरोधातील कारवाया किंवा विशिष्ट ठिकाणं उद्ध्वस्त करण्यासाठी आजही या छोट्या पण अत्यंत घातक शस्त्राचा वापर केला जातो. त्यामुळेच ‘हँड ग्रेनेड’ म्हणजे काय, तो कसा काम करतो, आणि त्यापासून वाचण्यासाठी किती वेळ मिळतो हे जाणून घेणं गरजेचं आहे.

हँड ग्रेनेडची रचना कशी असते?

हँड ग्रेनेड मुख्यतः तीन भागांपासून बनलेला असतो.

1. पहिला भाग म्हणजे त्याची बॉडी, यामध्ये स्फोटक भरलेलं असतं.

2. दुसरा भाग फ्यूज मेकॅनिझम ज्यामध्ये पिन, लीव्हर (spoon) आणि इग्निशन सिस्टम असतो.

3. तिसरा भाग असते सेफ्टी पिन, जी ग्रेनेड वापरण्याआधी खेचली जाते.

जेव्हा एखादा सैनिक ग्रेनेडची पिन खेचतो, तेव्हा तो अजूनही निष्क्रिय असतो. तोपर्यंत तो स्फोट करत नाही, जोपर्यंत लीव्हर सोडला जात नाही. लीव्हर सुटताच आतला इग्निशन सिस्टीम सक्रिय होतो आणि स्फोटाच्या दिशेने वेळ मोजायला सुरुवात होते.

पिन खेचल्यावर किती सेकंदात स्फोट होतो?

सर्वसामान्यपणे वापरला जाणारा M67 अमेरिकन ग्रेनेड सुमारे 4 ते 5 सेकंदात स्फोट होतो. म्हणजेच, पिन खेचल्यावर आणि लीव्हर सोडल्यानंतर, वापरकर्त्याकडे फेकण्यासाठी 4-5 सेकंदचाच वेळ असतो. काही ग्रेनेड्सचा वेळ याहून कमी म्हणजे 3 सेकंदांचाही असतो, तर काही प्रगत मॉडेल्समध्ये हा वेळ 7 सेकंदांपर्यंत वाढवलेला असतो.

हा वेळ एक प्रकारचा ‘डिले फ्यूज’ (Delay Fuse) असतो, जो सैनिकाला ग्रेनेड योग्य जागी फेकण्यासाठी काही क्षण देतो, आणि त्याचबरोबर स्वतःपासून स्फोट दूर ठेवण्याची संधीही.

ग्रेनेडपासून वाचणं शक्य आहे का?

जर ग्रेनेड तुमच्यापासून काही मीटर अंतरावर फेकला गेला असेल, तर तुमच्याकडे वाचण्यासाठी अंदाजे 3 ते 4 सेकंद असतात. पण, वाचणं ही गोष्ट अनेक गोष्टींवर अवलंबून असते जसं की:

* जर तुम्ही खुल्या जागेत असाल, तर तुम्हाला लगेच जमिनीवर झोपून किंवा कोणत्यातरी कवरमागे जावं लागेल.

* ग्रेनेडचा मुख्य स्फोटक परिणाम 5 ते 15 मीटरच्या आत असतो, पण त्याचे तुकडे (shrapnel) 50 मीटरपेक्षा जास्त अंतरापर्यंत जाऊ शकतात.

हँड ग्रेनेड जरी छोटा वाटत असला, तरी त्याची मारक क्षमता अत्यंत घातक आहे. पिन खेचल्यावर मिळणारे 4-5 सेकंद म्हणजे जीवन-मरणाचा निर्णय करणारे क्षण असतात. आजच्या आधुनिक लढायांमध्ये त्याचं महत्त्व कमी झालं असलं, तरी काही विशिष्ट परिस्थितींमध्ये हँड ग्रेनेड अजूनही अत्यंत प्रभावी आणि धोरणात्मक शस्त्र ठरतो. त्यामुळे, याबाबतची माहिती सामान्य नागरिकांनाही असणं फारच महत्त्वाचं आहे.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.