Video : बॉसला गंडवण्याचा जबरदस्त उपाय, कळणारही नाही काम करताय की टाईमपास, व्हीडिओ बघाच!

तुम्हाला कामाचा कंटाळा आला असेल, टाईमपास करावासा वाटत असेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठीच आहे....

Video : बॉसला गंडवण्याचा जबरदस्त उपाय, कळणारही नाही काम करताय की टाईमपास, व्हीडिओ बघाच!
Follow us
| Updated on: May 16, 2022 | 11:03 AM

मुंबई : आपण करत असलेलं कामाचं क्षेत्र जरी आपण स्वत: निवडलेलं असेल, ते आपलं पॅशन असेल तरी अनेकदा आपल्याला कामाचा कंटाळा येतो. किंवा कामाच्या तासातील (Working Hours) काही वेळ हा कंटाळवाना असतो. अश्यावेळी जरा विंरगुळा (Timepass) म्हणून आपण आपल्या कलिगशी गप्पा मारतो, कधी चहासाठी वेळ काढतो अन् आपला थकवा दूर करतो. पण काहींना यापेक्षा जरा वेगळं करण्याची इच्छा होते. त्यांना वेबसिरीज किंवा सिनेमा पाहण्याची इच्छा होते, अश्यावेळी काय करायचं? त्यावरच आज आम्ही एक उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या बॉसला (Boss) समजणारही नाही की तुम्ही काम करताय की टाईमपास!

तुम्हाला जर ऑफिसमध्ये तुमच्या कलिगसोबत वेबसिरीज पाहायची असेल तर ती कशी पाहावी, हे सांगणारा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होतोय. यात दोन ऑफिसमधले सहकारी आपल्या डेस्कवर बसलेले दिसत आहेत. ते वेबसिरीज बघत आहेत, पण इतक्यात त्यांची बॉस येते. त्यातली महिला सहकारी मग त्याला हाताने इशारा करते. अन् मग हा तरूण टॅब बटन दाबतो अन् त्यांच्या समोरची विंडो चेंज होते. बॉस जेव्हा त्यांचा कंप्युटर पाहाते तेव्हा ते दोघे काम करत असल्याचा तिला भास होतो. ही सगळी प्रक्रिया केवळ २-३ सेकंदात होते. बॉस निघून जाताच दोघं एकमेकांना टाळी देतात. तर तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये हा उपाय करून तुमच्या बॉसला सहज गंडवू शकता…

हा व्हीडिओ Prathamesh Darekar नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हीडिओला लाखो लोकांनी पाहिलंय. तर अडीच लाखांहून अधिक लोकांनी याला लाईक केलंय. तर काहींनी कमेंट करत हा जबरदस्त उपाय आहे, आम्हीही आमच्या बॉसला असंच गंडवू असं म्हटलंय.

याच अकाऊंटवरून आणखी एक व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. यात दोघेही कामामुळे कंटाळलेले दिसत आहेत. त्यांनी शहनाझ गिलच्या ‘सच अ बोरिंग डे’ या कॉमेडी व्हॉईसवर आपले एक्सप्रेशन्स दिले आहेत.

आणखी एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात आपल्या सहकाऱ्यांना कॉफी ब्रेकसाठी कसं विचारायचं याचा हटके पर्याय सांगितला आहे. यात एकजण त्याच्या सहकाऱ्याला कॉफीसाठी जाऊयात का असं विचारतो त्याचं ते विचारणं त्याचे सहकारी पाहतात. अन् मग आम्ही का नाही? असं त्याला विचारतात. मग सगळेच डान्स करत कॉफीसाठी जातात. हा व्हीडिओही व्हायरल होत आहे. याला 18 हजारांहून अधिकांनी लाईक केलंय.

View this post on Instagram

A post shared by Synoriq (@synoriq)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.