हा फोटो बघा, भारावून जाल! IFS अधिकाऱ्याने पोस्ट केलेला फोटो खूप अर्थपूर्ण
या चित्रात आणखी हृदयस्पर्शी गोष्ट म्हणजे या बेघर माणसाने केवळ स्वत:लाच नव्हे तर...

एका बेघर व्यक्तीने आपल्या आपल्या जवळ भटक्या कुत्र्यांना आश्रय दिल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी रविवारी शेअर केला आहे. या फोटोमध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या फुटपाथवर एक बेघर माणूस दिसतोय. त्याच्या खाली एक चादर आहे. या व्यक्तीने आपल्या छोट्याशा पलंगावर सुमारे सात भटकी कुत्री जवळ घेतलीत आणि एकदम आरामात झोपलाय. हा फोटो शेअर करताना आयएफएस ऑफिसरने एक हृदयस्पर्शी गोष्ट लिहिलीये.
या चित्रात आणखी हृदयस्पर्शी गोष्ट म्हणजे या बेघर माणसाने केवळ स्वत:लाच नव्हे तर आपल्या अबोल मित्रांसाठीही छत्री ठेवली आहे. त्या व्यक्तीने प्राण्यांबद्दल इतके प्रेम दाखविले की ते क्वचितच कोणीही करू शकेल.
आयएएफ अधिकाऱ्याने कॅप्शनमध्ये ट्विट केले आहे की, “या मोठ्या जगाला सामावून घेण्यासाठी आपले हृदय सुद्धा इतके मोठे असणे आवश्यक आहे.” एका यूजरने लिहिले की, “हे चित्र २४ कॅरेट सोन्याइतके शुद्ध आहे.
कुत्र्यासोबत पडलेली व्यक्ती अतिशय आरामात झोपलेली असते आणि हे पाहून लोकांनी आपलं मत मांडलंय. एका युझरने लिहिले की, ‘देवाने पृथ्वीवर कोणत्याही प्राण्याला एकटे सोडले नाही. कोणीतरी नक्कीच मदतीचा हात पुढे करतो”.
Out heart has to be large enough to accommodate this big world. pic.twitter.com/LjQGYaARjR
— Susanta Nanda (@susantananda3) November 20, 2022
दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “याला शांत झोपणे म्हणतात. माझी इच्छा आहे की मला अशाच प्रकारची झोप यावी. एका तिसऱ्या युझरने लिहिले, “त्या माणसाने किमान असे करण्याचा विचार तरी केला. आपल्यापैकी बहुतेकजण असे लोक आहेत जे फक्त बघू शकतात, पण मदतीसाठी पुढे येण्यास कचरतात.”
