AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अख्ख्या गावात राहतो फक्त एकच माणूस, देशातल्या ‘या’ रहस्यमय गावाबद्दल माहीत आहे का ?

राजस्थानमधील चुरू जिल्ह्यात एक हैराण करणारी बाब समोर आली आहे. खरंतर, तिथे एक गाव आहे, पण लोकसंख्येनुसार तिथे फक्त एकच व्यक्ती राहते. गावात फक्त एकच मंदिर आहे आणि दरवर्षी भाद्रपद महिन्यात तिथे मोठा मेळा भरतो आणि.

अख्ख्या गावात राहतो फक्त एकच माणूस, देशातल्या 'या' रहस्यमय गावाबद्दल माहीत आहे का ?
या गावात राहतो फक्त 1 च माणूसImage Credit source: social media
| Updated on: Jul 26, 2025 | 2:45 PM
Share

एखाद्या लहान गावाची लोकसंख्या किती असू शकते? 100, 50 किंवा कमीत कमी 25 लोकं तरी… पण तुम्ही असं कोणत एखादा गावं ऐकलं किंवा पाहिलं आहे का, जिथे फक्त 1 हो, एकच व्यक्ती राहते ? हे ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर तुम्हाला कदाचित पचणार नाही, पण राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात एक गाव आहे जिथली लोकसंख्या फक्त 1 आहे. हो, हे अगदी खरं आहे. सरकार दरबारी नोंद असलेल्या या गावाचे नाव श्याम पंडिया आहे. हे गाव नेठवा ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येते.

संपूर्ण गावात नाही घर, फक्त 1 मंदिर

आश्चर्याची बाब म्हणजे 2011 साली या रहस्यमय गावात जनगणना देखील करण्यात आली. जनगणनेनुसार, या गावाची लोकसंख्या फक्त एक (व्यक्ती) दाखवण्यात आली आहे. या व्यक्तीचे नाव ज्ञानदास आहे. विशेष म्हणजे या गावात एकही घर नाही. तर श्याम पांडिया धाम नावाचे एकच मंदिर आहे. या गावाचे नाव सरकारी नोंदींमध्ये या मंदिराच्या नावाने नोंदवले गेले आहे. हे मंदिर 521 बिघा सरकारी जमिनीच्या मध्यभागी 300 फूट उंच टेकडीवर बांधले गेले आहे. मंदिराचे पुजारी ज्ञानदास हे नियमितपणे सकाळ-संध्याकाळ मंदिरात येऊन पूजा करतात.

अनेक वर्षांपासून गावात एकच व्यक्ती

असं म्हटले जाते की हे मंदिर शेकडो वर्षे जुने आहे. लोकांची मंदिरावर श्रद्धा आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या अमावस्येला येथे एक मोठा मेळा भरतो ज्यामध्ये शेकडो भाविक सहभागी होतात आणि मंदिरात प्रार्थना करतात. पुजारी ज्ञानदास यांच्या आधी राकेश गिरी नावाचा एक व्यक्ती या मंदिरात पूजा करत असे. राकेश गिरी यांच्या मृत्युनंतर ज्ञानदास यांनी पूजाची जबाबदारी घेतली. पूर्वी राकेश गिरी हे या गावाचे एकमेव रहिवासी होते आणि आता ज्ञान दास हे देखील या गावाचे एकमेव रहिवासी आहेत.

पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरतंय हे गाव

विशेष म्हणजे हे विचित्र गाव पाहण्यासाठी दरवर्षी शेकडो पर्यटक येतात. या गावाबद्दल ज्याला ऐकायला मिळतं, ती व्यक्ती हे गाव पाहण्यासाठी नक्कीच येतो. लोकांना हे आश्चर्यकारक वाटते की आपल्या देशात, एका राज्यात असंही एक गाव आहे ज्याची लोकसंख्या फक्त 1 आहे.. एकूण 521 बिघा जमीन असलेल्या या गावात मंदिराशिवाय इतर कोणतेही निवासी ठिकाण नाही. फक्त दीड बिघा जमीन घरांसाठी राखीव आहे. उर्वरित जमीन जनावरे चरण्यासाठी वापरली जाते.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.