
जगात अनेक विचित्र घटना घडतात. आपल्या आजूबाजूला पण अनेक धक्कादायक गोष्टी घडतात. काही ठिकाणी बुद्धी काम करत नाही. तर्क लागत नाही. या घटना विज्ञानाला आव्हान देतात. अशीच एक विचित्र घटना इंडोनेशिया या देशात समोर आली आहे. मुरांग कुटुंबासोबत असं काही घडतं की गावकरी चळचळ कापतात. त्यांना कापरं भरतं. कारण सकाळी आणि दुपारी पाहिलेले हे कुटुंबिय रात्री अत्यंत भंयकर दिसतात. त्यांना भेटण्यासाठी कुणीच जात नाही. गावकऱ्यांना त्रास नको म्हणून ही मंडळी सुद्धा संध्याकाळी घराच्या बाहेर पडत नाही. कारण या मुरांग कुटुंबातील सदस्यांचे चेहरे पालीसारखे होतात. ते एकदम विचित्र दिसतात. अनेकांच्या काळजाचा थरकाप उडतो. रात्री तर हे चेहरे अत्यंत भीतीदायक दिसतात. डॉक्टर्सपासून जगातील अनेक वैज्ञानिक तिथं पोहचलेले आहेत. पण त्यांनाही हे कोडं सोडवता आलेले नाही.
संध्याकाळ झाली की चेहरे आपोआप लांबतात
मुरांग कुटुंब हे इंडोनेशियातील दुर्गम भागात राहते. तिथे सुविधा पण नाहीत. हा भाग शहरापासून खूप आत आहे. या भागात जंगल आणि मोठे डोंगर आहेत. येथे अजूनही लोक झाडपाल्याचा वापर करून आजार दूर करतात. येथे प्राथमिक आरोग्य सुविधा नाही. या कुटुंबातील सदस्य सूर्या मुरांग हे बालपणी अगदी सामान्य जीवन जगत होते. इतर मुलांप्रमाणेच त्यांचा चेहरा आणि शरीरयष्टी होती. पण सूर्या जेव्हा जवळपास 12 वर्षांचा झाला. तेव्हा मात्र त्याला संध्याकाळी काहीतरी विचित्र होत असल्याचे जाणवले.
त्याचा चेहरा लांब होऊ लागला. डोळे बारीक आणि सुजायला लागले. त्वचा तर एकदम रखरखीत होऊ लागली. त्याचा चेहरा एखाद्या पालीसारखा दिसू लागला. चेहरा ताणल्या गेला. पण त्याचा चेहरा कायम असा राहत नाही. सकाळी आणि दुपारी त्याचा चेहरा सर्वसामान्यासारखा असतो. तर संध्याकाळी मात्र त्याच्या चेहऱ्याला काय होते तेच कळत नाही. त्याचा चेहरा लांबतो. तो पसरतो आणि पालीसारखा दिसायला लागतो. ही बातमी सिंगापूरच्या वृत्तपत्रांनी अगोदर छापली. पुढे सूर्याचे लग्न झाले आणि त्याच्या कुटुंबातील सर्वांनाच या विचित्र प्रकाराचा सामना करावा लागला. त्याची बायको, मुलं यांचे चेहरे संध्याकाळ झाली की पालीसारखे दिसायला लागले. डोळे एकदम बडबडीत आणि चेहरा पालीच्या जबड्यासारखा मोठा व्हायला लागला. बरं हा प्रकार काही रोजच होतो असे नाही. पण एका निश्चित कालावधीत संध्याकाळी हा प्रकार घडतो आणि सकाळी हे कुटुंब पुन्हा सर्वसामान्यांसारखं दिसतं. त्यामुळे गावकरी घाबरलेले आहेत.
गावात पसरली अफवा हे मनुष्य नाहीत, एलियन्स आहेत
चेहऱ्यातील या बदलाची वार्ता सर्वदूर पसरली. अनेक तज्ज्ञ त्यांना भेटायला आले. पण कुणी अजून त्यावर काही उपाय सांगितलेला नाही. त्यामुळे संध्याकाळ झाली की गावकरी सूर्या मुरांग आणि त्यांच्या कुटुंबियाकडं फिरकत नाही. गावकऱ्यांच्या मते ही माणसं नाहीत, तर एलियन्स आहेत, किंवा एलियन्सचा यांच्यावर प्रभाव आहे. वैज्ञानिक आणि संशोधकांच्या मते हा एखादा दुर्मिळ आजार आहे. त्यामुळे चेहरा बदलतो. पण संध्याकाळी आणि सकाळी चेहरा का बदलतो हे त्यांना सांगता आलेले नाही. त्यामुळे हे कुटुंब सध्या एक गुढच बनले आहे.