AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आनंद महिंद्रा म्हणतात CSK मध्ये MS Dhoni ला ही स्पेशल ट्रीटमेंट असावी, चाहत्यांच्या भरभरून कमेंट्स

मॅच आली रे आली की फॅन्स सुरु होतात. काय ते मिम्स, काय ते जोक्स, रोस्टिंग सगळं जोरात सुरु असतं. चेन्नईच्या संघाच्या मॅचला तर टीआरपी पण प्रचंड असतो. धोनीच्या फॅन्सची संख्या प्रचंड आहे. हे फॅन्स MS Dhoni ला कुठच्या कुठे नेऊन ठेवतात. मॅच जिंकली की धोनी आपल्या फॅन्ससाठी अक्षरशः देव बनतो.

आनंद महिंद्रा म्हणतात CSK मध्ये MS Dhoni ला ही स्पेशल ट्रीटमेंट असावी, चाहत्यांच्या भरभरून कमेंट्स
Anand Mahindra On CSK DhoniImage Credit source: Social Media
| Updated on: Apr 04, 2023 | 3:06 PM
Share

मुंबई: IPL आली की एकीकडे चेन्नईचा CSK संघ आणि एकीकडे मुंबईचा MI दोन्ही मध्ये चांगलीच ओढाताण असते. खरंतर संघांमध्ये नाही पण त्यांच्या फॅन्स मध्ये मात्र चांगलीच ओढाताण सुरु असते. मॅच आली रे आली की फॅन्स सुरु होतात. काय ते मिम्स, काय ते जोक्स, रोस्टिंग सगळं जोरात सुरु असतं. चेन्नईच्या संघाच्या मॅचला तर टीआरपी पण प्रचंड असतो. धोनीच्या फॅन्सची संख्या प्रचंड आहे. हे फॅन्स MS Dhoni ला कुठच्या कुठे नेऊन ठेवतात. मॅच जिंकली की धोनी आपल्या फॅन्ससाठी अक्षरशः देव बनतो. आत्ताच आनंद महिंद्रा यांनी सुद्धा अशीच एक पोस्ट केली. ज्यात आनंद महिंद्रा म्हणाले, “धोनीला एक वेगळा युनिफॉर्म द्यायला हवा हो ना? पाठवा बरं या संदर्भांतल्या तुमच्या कल्पना.”  या पोस्ट वर लोकांनी इतक्या कमेंट्स केल्या की बास. कधी धोनीला सुपरमॅन बनवलं, कधी देव, कधी काय तर कधी काय. फॅन्सला तोड नाही! प्रतिक्रियांचा नुसता पाऊस पडला.

लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने तर कहरच केला. धोनीने बॅटिंग करताना सलग 2 बॉलमध्ये 2 सिक्स ठोकत 12 धावांची खेळी केली. तर तिसऱ्या बॉलवर मोठा फटका मारण्याच्या नादात धोनी आऊट झाला. मात्र 12 धावा करूनही धोनी चाहत्यांच्या नजरेत देवच बॅनला. पैसा वसूल मॅच झाल्याचं चाहत्यांनीच म्हटलं. आता धोनीच्या प्रेमात आकंठ बुडालेले चाहते एवढा मोठा चान्स कसा सोडतील? आनंद महिंद्रा यांनी विचारल्या विचारल्या चाहते सुरूच झाले. इतक्या भारी भारी कल्पना समोर आल्या की तुम्हीच बघा…

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.