AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या खिशातली ५०० रुपयांची नोट खोटी तर नाही ना? गृह मंत्रालयाच्या या टिप्सने लगेच ओळखा!

रोजच्या वापरातली ५०० रुपयांची नोट घेता-देता तुम्ही कधी विचार केलाय, की ती खरी आहे की खोटी? कारण गृह मंत्रालयाने नुकताच एक गंभीर इशारा दिलाय, तो म्हणजे बाजारात ५०० च्या बनावट नोटा मोठ्या प्रमाणात पसरल्या आहेत! या नोटा इतक्या हुबेहूब आहेत की सहज ओळखू येत नाहीत. पण काळजी करू नका! तुमच्या पाकिटातील नोट खरी आहे ना, हे ओळखण्याचे काही सोपे मार्ग आहेत. चला, जाणून घेऊया!

तुमच्या खिशातली ५०० रुपयांची नोट खोटी तर नाही ना? गृह मंत्रालयाच्या या टिप्सने लगेच ओळखा!
फाईल फोटो
| Edited By: | Updated on: Apr 26, 2025 | 3:46 PM
Share

आपण सगळेच दररोज व्यवहार करताना ५०० रुपयांच्या नोटा वापरत असतो. पण ही खरी आहे की खोटी, याचा तुम्ही कधी विचार करता का? गृह मंत्रालयाने नुकताच एक गंभीर इशारा दिला आहे की देशात मोठ्या प्रमाणावर बनावट ५०० रुपयांच्या नोटा सापडत आहेत. त्यामुळे सतर्क राहण्याची गरज आहे.

या बनावट नोटा इतक्या हुबेहूब बनवल्या जात आहेत त्यामुळे त्या खऱ्या की खोट्या हे ओळखणं जवळपास अशक्य होतं. पण चिंता करण्याचं कारण नाही. गृह मंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेने काही सोपी पद्धती सांगितल्या आहेत, ज्यामुळे तुम्ही नकली नोट लगेच ओळखू शकता.

तुमच्या खिशातली नोट खरी आहे की खोटी हे कसं ओळखाल ?

1. स्पेलिंग – खरी नोट असेल तर त्यावर इंग्रजीत “RESERVE BANK OF INDIA” असं स्पष्ट लिहिलेलं असतं. पण या बनावट नोटांमध्ये “RESERVE” या शब्दातील ‘E’ ऐवजी ‘A’ छापलेलं आहे. म्हणजे “RESARVE” असं चुकीचं लिहिलेलं असतं. ही एक लहानशी चूक खरी-खोट्या नोटेमधला मोठा फरक स्पष्ट करते.

2. रंग – अचूक स्पेलिंगसह छापल्या जातात. त्यामुळे आणखी एक पद्धत वापरणं महत्त्वाचं आहे. ५०० रुपयांच्या नोटेवर समोरच्या बाजूला हिरव्या रंगात ‘५००’ आकडा असतो. ती नोट तुम्ही थोडीशी तिरकी केलीत, तर हा आकडा निळ्या रंगात बदलतो. जर असं घडलं, तर नोट खरी आहे. पण जर रंगात कोणताही बदल झाला नाही, तर ती नोट बनावट असण्याची शक्यता आहे.

काय काळजी घ्याल?

1. कोणतीही ५०० रुपयांची नोट घेताना, विशेषतः अनोळखी व्यक्तीकडून किंवा घाईगडबडीत, ती तपासून घ्या.

2. वर दिलेल्या दोन्ही पद्धती वापरा. फक्त एकाच गोष्टीवर अवलंबून राहू नका.

3. जर तुम्हाला नोटेबद्दल शंका आली, तर ती स्वीकारण्यास नम्रपणे नकार द्या किंवा बँकेत जाऊन तपासून घ्या.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.