AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrayaan-3 | भारतीयांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी, चांद्रयान-3 ‘या’ दिवशी अवकाशात झेपावणार

चंद्रयान-3 अवकाशात झेपवण्यासाठी सज्ज झालं आहे. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांकडून यानाच्या प्रक्षेपणासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. ही मोहिम यशस्वी ठरली तर भारताचा जगभरात डंका होणार आहे. या मोहिमेत यशस्वी होणारा भारत देश हा जगातला चौथा देश ठरणार आहे.

Chandrayaan-3 | भारतीयांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी, चांद्रयान-3 'या' दिवशी अवकाशात झेपावणार
| Updated on: Jul 06, 2023 | 10:53 PM
Share

श्रीहरीकोटा : भारतीय अंतराळ संशोधन केंद्र अर्थात इस्त्रोकडून एक महत्त्वाची माहिती जारी करण्यात आली आहे. इस्त्रोचे शास्त्रज्ञ गेल्या काही दिवसांपासून चांद्रयान-3 मोहिमेसाठी दिवसरात्र काम करत आहेत. ही मोहिम इस्त्रो आणि भारत सरकारसाठी अतिशय महत्त्वकांक्षी अशी मोहीम आहे. ही मोहिम यशस्वी झाली तर शास्त्रज्ञांना चंद्र ग्रहावरील अनेक गोष्टींची माहिती मिळणार आहे. ही मोहीम यशस्वी ठरली तर चंद्राविषयीचे अनेक गूढ उलगडण्यास मदत होणार आहे. इस्त्रोच्या चांद्रयान-2 चं चंद्रावर लँडिंग झाल्यानंतर अंतिम क्षणाला संपर्क तुटला होता. त्यामुळे खगोल शास्त्रज्ञांसह संपूर्ण देशाच्या नागरिकांचा मोठा हिरमोड झाला होता. या नव्या चांद्रयान-3 मोहिमेवर सरकारसह शास्त्रज्ञांना खूप आशा आहे.

इस्त्रोच्या वैज्ञानिकांकडून या मोहिमेसाठी खूप मेहनत आणि प्रयत्नदेखील करण्यात येत आहेत. भारतीय या नव्या चांद्रयानाचं प्रक्षेपण पाहण्यासाठी आतूर झाले आहेत. तसेच हे चांद्रयान जेव्हा चंद्रावर लँड होईल, तेव्हाचा रोमांचक क्षण भारतीयांना आपल्या डोळ्यांत साठवायचा आहे. विशेष म्हणजे इस्त्रोकडून भारतीयांसाठी एक गूड न्यूज देण्यात आली आहे.

चंद्रयान-3 ऑगस्ट महिन्यात चंद्रावर लँड होण्याची शक्यता

इस्त्रोचं महत्त्वकांक्षी असणारं चांद्रयान-3 हे 14 जुलैला लॉन्च होणार असल्याची माहिती जाहीर करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन या यानचं लॉन्चिंग केलं जाणार आहे. 14 जुलैला दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी चंद्रयान-3 चं प्रक्षेपण होणार आहे, अशी माहिती इस्त्रोने ट्विटरवर दिली आहे.

इस्त्रोकडून नुकतंच याबाबतचा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. चांद्रयान-3 हे रॉकेटच्या वरच्या भागात ठेवण्यात आलं आहे. यानंतर ते असेम्लिंग युनीटमध्ये नेण्यात आलं आहे. जीएसएलवी एमके-3 या रॉकेटशी ते संलग्न करण्यात आलं आहे, अशी माहिती समोर आली आहे.

इस्त्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी या विषयी माहिती दिली आहे. चांद्रयान-3 हे यान 23 आणि 24 ऑगस्टला चंद्राच्या पृष्ठभागावर किंवा परिघात लँडिंग करण्याचा प्रयत्न करेल, अशी महिती एस सोमनाथ यांनी दिली आहे.

चंद्रयान-3 या मोहिमेचा बजेट तब्बल 651 कोटी रुपये

चंद्रयान-3 या मोहिमेचा बजेट तब्बल 651 कोटी रुपये इतका आहे. चांद्रयान-3 चं लँडर चंद्रावर लँडिंग होण्यास यशस्वी झालं तर अशी मोहिम करणारा भारत हा जगातील चौथा देश असणार आहे. याआधी अमेरिका, रशिया, चीन या देशांनी चंद्रावर आपले स्पेसक्राफ्ट उतारले आहेत.

या मोहिमेअंतर्गत चंद्राच्या पृष्ठभागावर एक लँडर उतरवण्यात येणार. या लँडरला एक रोवर आहे. ही रोवर चंद्राच्या जमिनीवर फिरेल आणि तिथे काही प्रयोग करणार. हे लँडर चंद्रावर एक लूनार दिवसपर्यंत राहील. एक लूनार दिवस म्हणजे पृथ्वीवरचे 14 दिवस.

चांद्रयान-3 च्या लँडरसाठी चंद्रावर सूर्यप्रकाश असणं जरुरीचा आहे. चंद्रावर 14-15 दिवस सूर्य उगवतो. तर पुढचे 14-15 दिवस सूर्य उगवत नाही.

सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.