Video: भारतीय नानची कॉपी, बलून ब्रेड म्हणून व्हिडीओ तयार, भारतीय नेटकऱ्यांकडून इटालियन फूड चॅनल ट्रोल

एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यामध्ये एक इटालियन फूड चॅनल नान बनवून दाखवत आहे, पण त्याला बलून ब्रेड म्हणत आहे. आता भारताच्या नानला बलून ब्रेड म्हणल्यानंतर कुणी शांत थोडीच राहिलं.

Video: भारतीय नानची कॉपी, बलून ब्रेड म्हणून व्हिडीओ तयार, भारतीय नेटकऱ्यांकडून इटालियन फूड चॅनल ट्रोल
एक इटालियन फूड चॅनल नान बनवून दाखवत आहे, पण त्याला बलून ब्रेड म्हणत आहे.
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Nupur Chilkulwar

Oct 06, 2021 | 4:46 PM

चिकन करीचे नाव ऐकताच खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. पण चिकन करी खाण्याची मजा फक्त नानसोबतच येते. आता अशा स्थितीत जर कोणी नान बनवताना गडबड केली तर गोंधळ उडायलाच वेळ लागत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यामध्ये एक इटालियन फूड चॅनल नान बनवून दाखवत आहे, पण त्याला बलून ब्रेड म्हणत आहे. आता भारताच्या नानला बलून ब्रेड म्हणल्यानंतर कुणी शांत थोडीच राहिलं. नेटकऱ्यांनी यावर तुफान फटकेबाजी केली. (Italian food channel calls roti balloon bread netizens share funny memes)

@cookistwow नावाच्या चॅनेलने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात ‘बलून ब्रेड’ कसे बनवायचं याची रेसिपी होती. व्हिडीओमध्ये हा ब्रेड बनवण्याची रेसिपी समजावून सांगितली जात आहे. आणि हा बलून ब्रेड तव्यावर फूगवुनही दाखवला जातो आहे. या व्हिडीओला इन्स्टाग्रामवर 1 कोटीपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by Cookist Wow (@cookistwow)

पाहा लोकांनी कसं ट्रोल केलं?

लोकांनी या रेसिपीचे स्क्रीनशॉट ट्विटरवर शेअर करण्यास सुरुवात केली. काही लोकांनी असंही म्हटले आहे की, “नानबाबतचा हा अन्याय आम्ही सहन करणार नाही.” एका लिहलं की, “मला माहित नाही की लोक असे विचित्र प्रयोग का करतात.” त्याचवेळी, दुसर्‍याने सांगितले की, “आधी मॅगी आणि आता नान, आता पुढच्या वेळी काय होईल मला माहित नाही.” जेव्हा जेव्हा कोणी लोकांच्या आवडत्या अन्नाचे विचित्र प्रयोग करतात, तेव्हा त्याला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केलं जातं.

हेही पाहा:

ऑर्डर केली पॉवर बँक, बॉक्स उघडल्यावर मिळाला विटेचा तुकडा, ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांकडून सोशल मीडियावर दु:ख व्यक्त

Video: समुद्रकिनारी तडपणाऱ्या डॉल्फीनसाठी देवदूत बनून आला, डॉल्फिनला वाचवणाऱ्यांचं नेटकऱ्यांकडून कौतुक

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें