जिओ VS एअरटेल: 349 रूपयांचे रिचार्ज प्लॅन, कोणत्या कंपनीचे प्लॅन आहे अधिक फायदेशीर जाणून घ्या

तुमच्याकडे जिओ किंवा एअरटेलचा प्रीपेड नंबर असेल तर आजची बातमी तुमच्यासाठी आहे. कारण जिओचा 349 रूपयांचा प्लॅन आणि एअरटेलचा सुद्धा 349 रूपयांचा प्लॅन या दोन्ही टेलिकॉम कंपन्याचे रिचार्ज किंमत सारखीच असल्याने कोणत्या कंपनीचा प्लॅन कमी किमतीत जास्त फायदे देतो हे आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.

जिओ  VS एअरटेल:  349 रूपयांचे रिचार्ज प्लॅन, कोणत्या कंपनीचे प्लॅन आहे अधिक फायदेशीर जाणून घ्या
| Edited By: | Updated on: Oct 25, 2025 | 3:52 PM

आपल्या भारतात अनेक टेलिकॉम कंपन्या आहेत जे त्यांचे ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी अनेक नवनवीन रिचार्ज प्लॅन लाँच करत असतात. लोकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यानुसार स्वस्त रिचार्ज प्लॅन देखील लाँच केले जातात. अशातच तुमच्याकडे जर रिलायन्स जिओ किंवा एअरटेलचे प्रीपेड सिम असेल, तर रिचार्ज करण्यापूर्वी तुम्हाला माहित असले पाहिजे की या दोन्ही टेलिकॉम कंपन्यानी त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती सारख्याच ठेवल्या आहेत. तर या दोन्ही कंपन्यांचे रिचार्ज किंमत 349 रुपये आहे. तर तुम्हाला एअरटेलच्या 349 रुपयांचा प्लॅनमध्ये आणि 349 रुपयांच्या जिओ प्लॅनमध्ये तुम्हाला किती डेटा मिळत आहे. तसेच फायद्यांच्या बाबतीत कोणता प्लॅन तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. ते आपण जाणून घेऊयात…

रिलायन्स जिओचा 349 रूपयांचा प्लॅन

349 रुपयांच्या जिओ प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी हाय-स्पीड डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मेसेज करता येतील. 28 दिवसांच्या या प्लॅनमध्ये जिओच्या विशेष ऑफरचाही फायदा मिळतो. दररोज डेटा मर्यादा पूर्ण झाल्यानंतर, स्पीड 64 केबीपीएसपर्यंत कमी होईल.

या ऑफर अंतर्गत तुम्हाला जिओ फायनान्सद्वारे 2% अतिरिक्त जिओ गोल्ड, नवीन जिओ होम कनेक्शनवर दोन महिने मोफत ट्रायल, तीन महिने जिओ हॉटस्टार मोबाइल/टीव्ही सबस्क्रिप्शन आणि 50 जीबी क्लाउड स्टोरेज दिले जात आहे.

एअरटेलचा 349 रूपयांचा प्लॅनची ​​

एअरटेलच्या 349 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा, दररोज 100 एसएमएस मेसेज आणि अमर्यादित व्हॉइस कॉलिंग मिळते. कंपनीचे म्हणणे आहे की हा प्लॅन 5जी क्षेत्रांमध्ये अमर्यादित डेटा, एअरटेल एक्सस्ट्रीम अॅपद्वारे 22हून अधिक ओटीटी सेवांचा प्रवेश प्रदान करतो.

जिओ प्रमाणेच एअरटेलचा हा प्लॅन देखील डेटा मर्यादा पूर्ण झाल्यानंतर 64kbps वर इंटरनेट स्पीड कमी करतो. शिवाय, या प्लॅनमध्ये स्पॅम अलर्ट, दर 30 दिवसांनी एकदा मोफत HelloTune, Perplexity Pro AI चा 12 महिने अॅक्सेस आणि जाहिरात-मुक्त Apple Music यांचा समावेश आहे, म्हणजेच गाणं ऐकताना तुम्हाला जाहिरातींमुळे व्यत्यय येणार नाही.

Follow Us