AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईच्या लोकलमधील ‘कांटा लगा’ गाण्यांवर काकांचा डान्स तुफान व्हायरल

मुंबई लोकलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हीही नाचायला लागाल. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या. मुंबई लोकलमधील हा व्हिडिओ आतापर्यंत दीड लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

मुंबईच्या लोकलमधील 'कांटा लगा' गाण्यांवर काकांचा डान्स तुफान व्हायरल
| Updated on: Oct 22, 2024 | 6:52 PM
Share

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दररोज काहीही ना काही व्हायरल होत असते. सोशल मीडियावर बरेच व्हिडिओ असतात. लोकं आता कुठे ही गेली की व्हिडिओ काढण्यात पुढे असतात. कधी जबरदस्त जुगाडचा व्हिडीओ पाहायला मिळतो तर कधी जागेसाठी झालेल्या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल होतो. याशिवाय स्टंट, डान्स, अपघात आदींचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या सर्व व्हिडिओंशिवाय आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मुंबईच्या लोकलमधील हा व्हिडिओ आहे.

दिवसभर ऑफिसमध्ये काम केल्यानंतर प्रत्येक लोकलने जेव्हा घरी जायला निघतो तेव्हा तो दमलेला असतो थकून गेलेला असतो. ऑफिसमधून घरी जाताना त्यांना शांततेत प्रवास करायचा असतो. लोकांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर दिसते की ते खूप थकलेले आहेत. पण ज्यांचा व्हिडिओ व्हायरल होतोय ते पाहून तुम्ही म्हणणारंच नाही की, हे लोकं थकलेले आहेत. ऑफिसमधून घरी जाताना मुंबई लोकलमध्ये एका ग्रुपने ‘कांटा लगा’ गाण्यावर मस्त वातावरण निर्माण केलं. कुणी गात होतं, कुणी टाळ्या वाजवत होतं तर कुणी नाचत होतं. त्यामुळे मुंबई लोकलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.

हा व्हिडिओ मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर @mumbaiheritage नावाच्या अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना ‘मुंबई लोकलला काटा आला’ असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडिओला दीड लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले – लेडीज कंपार्टमेंटमध्ये असण्याचा हा एक तोटा आहे. दुसऱ्या एका युजरने लिहिले- मुंबई व्हाईब्स, त्यांची ऊर्जा आवडली. तिसऱ्या युजरने लिहिले – असे दिसते की प्रत्येकजण बॅकबेंचर आहे.

Follow Us
महापालिकेत आत्म्यांचा वावर?, मंत्र्यांचं धक्कादायक विधान
महापालिकेत आत्म्यांचा वावर?, मंत्र्यांचं धक्कादायक विधान.
भोंदू खरात प्रकरणी पडद्यामागे मोठ्या हालचाली, पोलिसांकडून... बड्या नेत
भोंदू खरात प्रकरणी पडद्यामागे मोठ्या हालचाली, पोलिसांकडून... बड्या नेत.
नाशिकच्या IT कंपनीतील महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचे मलेशिया कनेक्शन,
नाशिकच्या IT कंपनीतील महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचे मलेशिया कनेक्शन,.
अमरावती अत्याचार प्रकरणात पोलीस अलर्ट मोडवर, आयाज अहमदच्या घरावर बुलडो
अमरावती अत्याचार प्रकरणात पोलीस अलर्ट मोडवर, आयाज अहमदच्या घरावर बुलडो.
कैसा हराया... म्हणणाऱ्या सहर शेख यांचं नगरसेविका पद धोक्यात, नेमकं काय
कैसा हराया... म्हणणाऱ्या सहर शेख यांचं नगरसेविका पद धोक्यात, नेमकं काय.
परतवाड्यात लैंगिक शोषण रॅकेट उघड: आरोपी तनवीर अटकेत 180 हून अधिक....
परतवाड्यात लैंगिक शोषण रॅकेट उघड: आरोपी तनवीर अटकेत 180 हून अधिक.....
मुंबई महापालिकेत चक्क चोरी, थेट नगरसेविकेच्या पर्समधून...नेमकं काय घडल
मुंबई महापालिकेत चक्क चोरी, थेट नगरसेविकेच्या पर्समधून...नेमकं काय घडल.
धनंजय मुंडे दुसरे खरात… करूणा मुंडे यांचे विधान चर्चेत
धनंजय मुंडे दुसरे खरात… करूणा मुंडे यांचे विधान चर्चेत.
साताऱ्यात उष्णतेचा कहर: तापमान 42 अंशांच्या पुढे
साताऱ्यात उष्णतेचा कहर: तापमान 42 अंशांच्या पुढे.
अशोक खरात प्रकरणात नवे खुलासे, चक्क नॅशनलाईज बँकेतून...
अशोक खरात प्रकरणात नवे खुलासे, चक्क नॅशनलाईज बँकेतून....