AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bear Grylls व्हायचंय की काय या चिमुकल्याला? पाहा, काय धाडस केलं! Video viral

Kid video : एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social media) खूप व्हायरल (Viral) होत आहे, जो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. व्हिडिओमध्ये एका मुलाने सरडा पकडला आणि तो अचानक तोंडात घालू लागला.

Bear Grylls व्हायचंय की काय या चिमुकल्याला? पाहा, काय धाडस केलं! Video viral
सरड्याला तोंडाजवळ नेत असतानाImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 12, 2022 | 12:18 PM
Share

Kid video : मुले शेवटी मुलेच असतात. त्यांना काय चूक आणि काय बरोबर याच्यातला कळत नसतो. जसजसे ते मोठे होतात तसतसे त्यांना याची जाणीव होते. यात पालकांचाही महत्त्वाचा वाटा असतो. खरे तर पालकांचे पहिले काम हेच असते, की मुलांना काय बरोबर आणि काय चूक, त्यांनी काय करावे आणि काय करू नये हे सांगणे. तुम्ही अनेकदा लहान मुलांना पाहिले असेल, की एखादी वस्तू खाण्याचा पदार्थ आहे असे समजून ते खातात. कधीकधी मुले काहीतरी उचलतात आणि त्यांच्या तोंडात घालतात. एखादवेळी ते विषारीही असू शकते. लहान मुलाचा एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social media) खूप व्हायरल (Viral) होत आहे, जो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. व्हिडिओमध्ये एका मुलाने सरडा पकडला आणि तो अचानक तोंडात घालू लागला.

2 सेकंदही उशीर झाला असता, तर…

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक माणूस त्या मुलाकडे येतो, ज्याच्या टी-शर्टवर सरडा धावत असतो. तो मुलाला सरडा दाखवतो. आता ते नेमके काय आहे, हे त्या मुलाला काय माहीत नाही. मुलाने विचार न करता सरडा पकडला आणि तो खाण्यासाठी तोंडाजवळ घेऊन जाताच त्याची आई आणि ती व्यक्ती दोघांनीही मुलाचा हात धरला. 2 सेकंदही उशीर झाला असता, तर मुलाने तो सरडा तोंडात टाकला असता. त्यानंतर काय झाले असते, हे डॉक्टरच सांगू शकतील.

इन्स्टाग्रामवर शेअर

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर thesceneryplace नावाने शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत विक्रमी 43 दशलक्ष म्हणजेच 4.3 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 1 दशलक्ष म्हणजेच 10 लाखांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाइकदेखील केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूझरने लिहिले आहे, की या वयात मुलांना सांभाळणे खूप कठीण आहे, कारण प्रत्येक गोष्ट थेट त्यांच्या तोंडातच जाते, तर दुसऱ्या यूझरने लिहिले आहे, की हे मूल बेअर ग्रिल्स बनण्याचा प्रयत्न करत आहे.

आणखी वाचा :

‘हा’ Jugaad पाहिला? पठ्ठ्यानं डोक्याचा ‘असा’ काही केला वापर आणि बनवली भन्नाट Bike; Video viral

ITBP योद्धा ज्युली आणि ओक्सानाच्या ‘या’ गोंडस पिल्लांना पाहिलं का? Video होतोय Viral

Fact Check : घरात चार्जिंगला लावलेल्या स्कूटर बाइकचा स्फोट, स्फोट नक्की कशानं? पाहा Video

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.