घसरगुंडीवरचा स्टंट महागात, लोकांना हसू आवरेना, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना बालपण आठवलं!

मुलं बऱ्याचदा असे काही खेळ करतात, की ते पाहिल्यानंतर त्यांना काही दुखापत होईल यांची भीती वाटते, पण हे भीतीपुरतंच मर्यादित नाही. अनेकदा खेळताना मुलांना चांगलीच दुखापत होते. आज आम्ही तुम्हाला एका मुलाचा असाच व्हिडीओ दाखवत आहोत

घसरगुंडीवरचा स्टंट महागात, लोकांना हसू आवरेना, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना बालपण आठवलं!
एक मुलगा या नालीतून खाली घसरत येतो, मात्र, घसरगुंडी संपण्याआधीच हा मुलगा मोठी चूक करतो.
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Nupur Chilkulwar

Sep 28, 2021 | 7:02 PM

आजच्या जगात प्रत्येकाला काहीतरी वेगळे आणि ‘तुफानी’ करायचं असतं. लहान काय आणि मोठं काय, प्रत्येकाला काही ना काही वेगळं करायला आवडतं, ज्यातून आनंद मिळेल. पण, बऱ्याचदा काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात अशी काही घटना घडते, जी पाहून आपणच थक्क होतो. असेही प्रकार घडतात, जे पाहून आपल्याला हसू आवरत नाह. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हीही पोट धरुन हसाल. ( kids funny stunt and injury video goes viral on Instagram )

मुलं बऱ्याचदा असे काही खेळ करतात, की ते पाहिल्यानंतर त्यांना काही दुखापत होईल यांची भीती वाटते, पण हे भीतीपुरतंच मर्यादित नाही. अनेकदा खेळताना मुलांना चांगलीच दुखापत होते. आज आम्ही तुम्हाला एका मुलाचा असाच व्हिडीओ दाखवत आहोत, ज्यात मजा करण्याच्या नादात या भावाने दुखापत करुन घेतली आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही मुलं तुटलेल्या आणि कोरड्या असलेल्या नालीचा वापर घसरगुंडी खेळण्यासाठी करत आहे. त्यातून हे मुलं घसरत येतात. तेवढ्यात एक मुलगा या नालीतून खाली घसरत येतो, मात्र, घसरगुंडी संपण्याआधीच हा मुलगा मोठी चूक करतो. तो घसरणं संपल्यावर पाय खाली टेकवत नाही, त्यामुळे तो सरळ जाऊस समोरच्या दगडावर आदळतो. जिथं, त्याच्या माकडहाडाला चांगलीच दुखापत होते.

व्हिडीओ पाहा:

View this post on Instagram

A post shared by vip_tashan (@vip_tashan_)

हा मजेदार व्हिडिओ लोकांना सोशल मीडियावर खूप आवडत आहे. अनेक नेटकऱ्यांनी यावर मजेदार कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहले की, ‘आम्हीसुद्धा लहानपणी अशी मजा करायचो.’ तर दुसऱ्याने लिहलं, ‘मुलांची मजा पाहून मी हसू थांबवू शकत नाही.’ अजून एका नेटकऱ्याने कमेंट केली की, ‘यापुढं कुठलाही स्टंट करताना हा मुलगा शंभर वेळा विचार करेल’.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर ‘vip_tashan_’ या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बातमी लिहली जाईपर्यंत हा व्हिडीओ तब्बल 3 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला होता.

हेही पाहा:

बैलानं 7 फुटाच्या भिंतीवरुन मारली जबरदस्त उडी, व्हिडीओ पाहून नेटकरी चक्रावले!

Video: पाकिस्तानी मुलींचा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल, एकमेकींबद्दल प्रेम व्यक्त केल्याने कट्टरतावाद्यांकडून ट्रोल

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें