Viral Video : अल्लू अर्जुनच्या डायलॉगचं लिपसिंक करत उत्तम अभिनय, किली पॉल जिंकतोय यूझर्सचं मन

Viral Video : अल्लू अर्जुनच्या डायलॉगचं लिपसिंक करत उत्तम अभिनय, किली पॉल जिंकतोय यूझर्सचं मन
किली पॉल, अल्लू अर्जुन

टांझानियन कलाकार किली पॉल (Kili Paul) अशीच लिपसिंक करत असल्याचा व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाला आहे आणि व्हिडिओ सर्वांच्या पसंतीस उतरत आहे. ल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) यांच्या या चित्रपटानं लोकप्रियता मिळवली आहे.

प्रदीप गरड

|

Jan 21, 2022 | 7:19 AM

अल्लू अर्जुन स्टारर तेलुगु चित्रपट पुष्पा : द राइज(Pushpa : the Rise)नं डिसेंबर 2021मध्ये रिलीज झाल्यापासून खळबळ उडवून दिलीय. अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) यांच्या प्रशंसनीय कामगिरी आणि सुपरहिट गाण्यांसाठी या चित्रपटानं लोकप्रियता मिळवली आहे. अल्लू अर्जुनच्या या चित्रपटातल्या दमदार संवादांसाठीही लोक त्यांना पसंत करत आहेत. यूझर्स त्यांचे संवाद लिप-सिंक करत आहेत. आता, टांझानियन कलाकार किली पॉल (Kili Paul) अशीच लिपसिंक करत असल्याचा व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाला आहे आणि व्हिडिओ सर्वांच्या पसंतीस उतरत आहे.

सोशल मीडियावर आहेत सक्रिय

आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, किली पॉल चित्रपटातल्या अल्लू अर्जुनच्या संवादांशी लिप सिंक करताना दिसत आहे. “पुष्पा हे नाव ऐकून तुला एखादं फूल समजलं का? मी फूल नाही, मी अग्नी आहे, मी कोणासमोर वाकणार नाही. व्हिडिओमध्‍ये त्याचे एक्स्प्रेशन्सही अप्रतिम दिसत आहेत. किली पॉल सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि दररोज त्याचे व्हिडिओ शेअर करत असतो.

जुबिनच्या गाण्यावर लिपसिंक

टांझानियातली ही भाऊ-बहीण जोडी गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालत आहे. हिंदी चित्रपटांच्या गाण्यांवर लिपसिंक आणि डान्स करतानाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. ज्याला यूजर्सकडून खूप पसंती मिळत आहे. काही काळापूर्वी टिकटॉक स्टार किली पॉलचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो गायक जुबिन नौटियालच्या ‘मैं जिस दिन भुला दू’ या गाण्यावर लिपसिंक करताना दिसला होता.

View this post on Instagram

A post shared by Kili Paul (@kili_paul)

यूझर्सच्या प्रतिक्रिया

सध्या त्याचा जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्यावर लोकांच्या भरभरून प्रतिक्रिया येत आहेत. यावर टिप्पणी करताना एका यूझरनं लिहिलंय, सुंदर अभिनय सर. दुसर्‍या यूझरनं लिहिलंय, तुमचे व्हिडिओ अप्रतिम आहेत, तुम्ही अल्लू अर्जुनचा हा डायलॉग खूप छान केला आहे. ऑनलाइन पोस्ट केल्यापासून हा व्हिडिओ 1 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. काही यूझर्स असेही होते ज्यांनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये सुपर्ब, सुपर्ब असं लिहिलंय.

नेस्लेनं किटकॅट चॉकलेटवर लावला भगवान जगन्नाथाचा फोटो, लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया

जोरदार वाऱ्यानं वाळूला आला ‘असा’ आकार, सोशल मीडियावर Photos व्हायरल

टॅलेंटेड सिस्टर्स! Viral Videoला पाहून तुम्हीही म्हणाल, काय कमालीचं फेकतायत!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें