टॅलेंटेड सिस्टर्स! Viral Videoला पाहून तुम्हीही म्हणाल, काय कमालीचं फेकतायत!

टॅलेंटेड सिस्टर्स! Viral Videoला पाहून तुम्हीही म्हणाल, काय कमालीचं फेकतायत!
फेकणाऱ्या भगिणी

सध्या दोन बहिणींचा व्हिडिओ सोशल मीडिया(Social Media)च्या दुनियेत व्हायरल झाला आहे. या बहिणींचं कौशल्य पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. व्हिडिओ(Video)मध्ये बहिणी परफेक्ट टायमिंगसह वस्तू फेकताना दिसत आहेत.

प्रदीप गरड

|

Jan 20, 2022 | 4:04 PM

जगात कौशल्या(Skills)ची काही कमतरता नाही. सोशल मीडिया (Social Media) हे आज एक असं माध्यम बनलंय, जिथं असे प्रतिभावान लोक रोज व्हायरल (Viral) व्हिडिओंद्वारे भेटत असतात. यातील काही व्हिडिओ इतके अप्रतिम असतात, की तुम्हाला ते पुन्हा पुन्हा बघायला आवडतात. सध्या दोन बहिणींचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या दुनियेत व्हायरल झाला आहे. या बहिणींचं कौशल्य पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. व्हिडिओमध्ये बहिणी परफेक्ट टायमिंगसह वस्तू फेकताना दिसत आहेत.

वेधून घेतलं नेटकऱ्यांचं लक्ष

प्रतिभावान लोक जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात राहतात, परंतु ते सोशल मीडियावर एक ना एक दिवस नक्कीच दिसतात. या एपिसोडमध्ये इंटरनेटवरील दोन बहिणींनी आपल्या कौशल्यानं नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा व्हिडिओ पाहताच व्हायरल झाला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहू शकता, की दोन बहिणी त्यांच्या पायातला बूट फेकत आहेत. गंमत म्हणजे शूज थेट शू स्टँडमध्ये पडतात. या बहिणी असे अनेक अद्भुत पराक्रम करताना दिसतायत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही या बहिणींच्या कौशल्याची खात्री पटली असेल.

आश्चर्यकारक कौशल्य या भगिनींनी ज्या पद्धतीनं आपलं कौशल्य दाखवलंय, ते पाहता त्यांनी यासाठी खूप सराव केला असेल असं वाटतं. कारण ज्या टायमिंगनं त्यांनी आपलं कौशल्य दाखवलंय ते खरोखरच आश्चर्यकारक आहे.

View this post on Instagram

A post shared by Panda (@dailygameofficial)

इन्स्टाग्रामवर शेअर

प्रतिभावान बहिणींचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर dailygameofficial नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आलाय. यूझरनं कॅप्शनमध्ये लिहिलंय, टॅलेंटेड सिस्टर्स! एका दिवसापूर्वी अपलोड केलेल्या या व्हिडिओला 21 हजारांहून अधिक लोकांनी लाइक केलं आहे. त्याचबरोबर अनेकांनी यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूझरनं कमेंट करताना लिहिलंय, की ‘हे कसं शक्य आहे. खोटं आहे की खरं?’ त्याचप्रमाणे आणखी एका यूझरनं कमेंट करताना लिहिलंय, ‘या बहिणी अप्रतिम आहेत. त्यांच्यात किती टॅलेंट भरलेलं आहे.’ एकंदरीत हा व्हिडिओ पाहून यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. यासोबतच बहिणींचही ते जोरदार कौतुक करत आहेत.

‘ये तो सुपर से भी उपर निकला’, Viral Videoतून दिसेल माकडानं कसं सोडवलं चुकटीसरशी कोडं!

Anand Mahindra Tweet : आनंद महिंद्रा यांना आपल्या बोलण्यानं आश्चर्यचकित करणारा हा मुलगा आहे तरी कोण?

Viral Video : आजोबांचा बूस्टर डोस..! मारला असा काही जबरदस्त शॉट, यूझर्स म्हणाले…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें