AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोखंडी तारांच्या कुंपणावरून कसा चपळाईनं पळतोय बिबट्या? पाहा Leopard Viral Video

Wild Animal Video : बिबट्या (Leopard) हा आशिया आणि आफ्रिका खंडात आढळणारा एक धोकादायक प्राणी आहे. सिंह (Lion), वाघ (Tiger) आणि चित्ता (Panther) यांसारख्या प्राण्यांच्या तुलनेत बिबट्यादेखील अतिशय शक्तिशाली प्राणी आहे. त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय.

लोखंडी तारांच्या कुंपणावरून कसा चपळाईनं पळतोय बिबट्या? पाहा Leopard Viral Video
बिबट्या/प्रातिनिधिक छायाचित्र
| Updated on: Feb 06, 2022 | 3:51 PM
Share

Wild Animal Video : बिबट्या (Leopard) हा आशिया आणि आफ्रिका खंडात आढळणारा एक धोकादायक प्राणी आहे. सिंह (Lion), वाघ (Tiger) आणि चित्ता (Panther) यांसारख्या प्राण्यांच्या तुलनेत बिबट्यादेखील अतिशय शक्तिशाली प्राणी आहे. अत्यंत चपळ…  जेव्हा संधी मिळते तेव्हा तो सर्वात मोठ्या प्राण्यालाही फाडून टाकतो. बिबट्याची एकाग्रता अतिशय अद्भुत आहे आणि तो एक अतिशय हुशार प्राणी आहे. बिबट्याची शिकार पकडण्याचे तंत्र आणि हल्ल्याची शैली यामुळे तो उच्च दर्जाचा शिकारी बनतो, असे म्हटले जाते. बिबट्या सहसा रात्री शिकार करतात आणि ताशी 55 ते 60 किमी वेगाने पळून त्यांची शिकार पकडतात. बिबट्या आपल्या भक्ष्याला एवढ्या वेगाने पकडतो, की आपण शिकार कधी झालो हेही शिकाराला कळत नाही.

तुम्ही विचार करत बसाल

सध्या सोशल मीडियावर बिबट्याचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. बिबट्या भिंतीच्या वरच्या तारांवर चालताना दिसत आहे. हे दृश्य पाहून अनेकांना भीतीही वाटतेय. व्हिडिओमध्ये दिसत आहे, की बिबट्या तारांवर अशा प्रकारे धावत आहे की तुम्हीही विचार करत बसाल, की एवढ्या कठीण वाटेवरून तो कसा जात आहे? हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

इन्स्टाग्रामवर शेअर

कारमध्ये बसलेल्या लोकांनी हा व्हिडिओ शूट केला आहे. भिंतीवर असलेल्या लोखंडी तारेतून निसटून बिबट्या अतिशय चपळाईने पळत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यादरम्यान कारमध्ये बसलेले लोक काच उघडण्याबाबत बोलतात. मात्र, यावेळी काही लोक घाबरतानाही दिसत आहेत. बिबट्या काहीवेळ एका जागी थांबून उभा राहतो. मग तो वळून गाडीकडे पाहतो. त्यानंतर लोक घाबरून गाडीची खिडकी बंद करतात. इन्स्टाग्रामच्या nature27_12 पेजवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by طبیعت (@nature27_12)

Viral Video : चक्क गेंड्याचं चुंबन घेतेय ‘ही’ तरुणी; यूझर्स म्हणतायत, जंगली प्राण्यांपासून दूर राहा, भडकला तर…

Viral : स्वत:वरच का भुंकतोय हा कुत्रा? Cute Puppy Video पाहून तुम्हालाही हसायला येईल!

Animal Jugaad : शेळी आणि गाढवाचा अनोखा जुगाड? टीमवर्क पाहून म्हणाल, कोणतंही काम अवघड नाही! Video Viral

रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...