AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shocking Video : काळ आला होता, पण… पाहा, ट्रकच्या चाकाखाली जाता जाता कसा वाचला युवक

सध्या असाच एक अपघाता(Accident)चा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मुसळधार पाऊस (Rain) पडत आहे आणि रस्त्यावर वाहनं सुसाट वेगानं धावत आहेत. यादरम्यान एक दुचाकीस्वार अचानक घसरून रस्त्याच्या मधोमध पडतो. तेवढ्यात समोरून एक मोठा ट्रक (Truck) तिथं येतो. ट्रक त्या व्यक्तीला चिरडणारच होता, की फिल्मी स्टाइलनं स्वत:ला वाचवत त्यानं मृत्यूला टाळलं.

Shocking Video : काळ आला होता, पण... पाहा, ट्रकच्या चाकाखाली जाता जाता कसा वाचला युवक
अपघातातून बचावला युवक
| Updated on: Jan 30, 2022 | 12:27 PM
Share

Shocking Accident Video : देव तारी त्याला कोण मारी… ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल, पण सध्या असाच एक अपघाता(Accident)चा धक्कादायक (Shocking) व्हिडिओ व्हायरल होत आहे. हे पाहिल्यानंतर तुम्हालाही याचा प्रत्यय येईल. तुम्ही सर्वांनी अनेक रस्ते अपघाताच्या बातम्या वाचल्या आणि ऐकल्या असतील, परंतु समोर आलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की मुसळधार पाऊस (Rain) पडत आहे आणि रस्त्यावर वाहनं सुसाट वेगानं धावत आहेत. यादरम्यान एक दुचाकीस्वार अचानक घसरून रस्त्याच्या मधोमध पडतो. तेवढ्यात समोरून एक मोठा ट्रक (Truck) तिथं येतो. ट्रक त्या व्यक्तीला चिरडणारच होता, की फिल्मी स्टाइलनं स्वत:ला वाचवत त्यानं मृत्यूला टाळलं. ती व्यक्ती रस्त्यावरून उठण्यात इतकी तत्परता दाखवते की तो ट्रक टाळून बाजूला येतो.

दुखापतही नाही

सुरुवातीला असं दिसतं, की तो ट्रकच्या धडकेपासून स्वत: ला वाचवू शकणार नाही, परंतु नशिबानं साथ दिली, ज्यामुळे तो ‘यमराज’ला चकमा देण्यास यशस्वी झाला. आश्चर्याची बाब म्हणजे या धोकादायक अपघातात त्या व्यक्तीला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. 21 सेकंदाच्या या क्लिपबाबत हा दावा करण्यात येतोय, की 24 जानेवारी रोजी ही घटना घडली असून यामध्ये कोणीही जखमी झालं नाही.

नशीबवान व्यक्ती

ViralHog नावाच्या पेजवरून हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक यूझर्सनी आपापल्या प्रतिक्रियाही दिल्या. एका यूझरनं व्हिडिओवर कमेंट करत लिहिलंय, की ती व्यक्ती खूप नशीबवान होती की ट्रक त्याला धक्काही लावू शकला नाही. तर दुसऱ्या यूझरनं लिहिलंय, की देव त्याच्यासोबत होता. दुसऱ्या यूझरनं लिहिलंय, की देव तारी त्याला कोण मारी..! या व्हिडिओला एक लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

घरात घुसला कोब्रा, वाचवण्यासाठी गेलेल्या सर्पमित्रावरच करतोय हल्ला, पाहा Viral Video

Video : ‘ही’ आग लागली नाही, तर लावलीय; शिकागोतल्या रेल्वेरुळाच्या आगीचं काय आहे सत्य? वाचा…

Dog Video : जोरदार लाटांमध्ये बुडत होता कुत्रा मग जीव धोक्यात घालत होमगार्डनं पाण्यात घेतली उडी, आणि…

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.