नवऱ्यानेच शोधून दिला बायकोला दुसरा पती, लग्नही लावलं, कारण वाचून अचंबित व्हाल!
सध्या एक अजब प्रकार समोर आला आहे. एका पुरुषाने आपल्याच पत्नीला दुसरा पती शोधून दिला आहे. विशेष म्हणजे त्याने आपल्या बायकोचे दुसरे लग्नही लावून दिले आहे.

Viral News : पती-पत्नीचे नाते हे फारच पवित्र मानले जाते. एकदा लग्न झालं की पुढच्या सात जन्मी हाच पती आणि हीच पत्नी भेटू दे अशी प्रार्थना केली जाते. काही पती-पत्नी तर आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकांना साथ देतात. आपल्या आजूबाजूला असे अनेक आदर्श पती-पत्नी असतील. पण सध्या मात्र पती-पत्नीचं एक अजब नातं समोर आलं आहे. या नात्यात पतीनेच आपल्या पत्नीसाठी नवा पती शोधला आहे.
नवऱ्याने बायकोला शोधून दिला दुसरा पती
सध्या या घटनेची सगळीकडेच चर्चा होत आहे. पती-पत्नीच्या नात्यात अनेकवेळा भांडणं होतात. छोट्या-छोट्या गोष्टींवरून रुसवे-फुगवे होतात. काही काही पती-पत्नी तर कित्येक दिवस एकमेकांशी बोलत नाहीत. पण शेवटी सुख, दु:खाच्या प्रसंगी ते एकत्र होतातच. काही जोड्या तर अशा असतात की आपल्या जोडीदाराच्या कठीण काळात ते एकमेकांसाठी खंबीरपणे उभे राहतात. विशेष म्हणजे मी जोपर्यंत हयात आहे, तोपर्यंत माझ्या पतीच्या किंवा पत्नीच्या आयुष्यात दुसरं कोणीही येऊ नये, असंच प्रत्येकाला वाटतं. सध्या चर्चेत आलेल्या नवऱ्याने मात्र आपल्याच बायकोला नवा पती शोधून दिला आहे.
ही घटना अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहरातील आहे. इथे एका पतीने जिंवतपणीच आपल्या बायकोसाठी नवा पती शोधला आहे. त्याने हे नेमके का केले, याचाही कारण खास आहे. हे कारण वाचल्यावर तुमचेही डोळे भरून येतील.
नेमकं प्रकरण काय आहे?
मिळालेल्या माहितीनुसार नूयॉर्कमध्ये नुकतेच एका महिलेने एक पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात तिने तिच्याबद्दल सर्वकाही सांगितले आहे. याच पुस्तकात तिने माझ्या पतीने हयात असतानाच माझ्यासाठी दुसरा पती शोधायला मदत केली, असं लिहून ठेवलंय. सध्या या पुस्तकाची सगळीकडे चर्चा होत आहे. खरं म्हणजे या महिलेचा पहिला पती एका आजाराने ग्रस्त होता. हा पहिला पती फार काळ जगू शकणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले.
महिलेने अगोदर केला विरोध, पण नंतर…
त्यानंतर बराच विचार केल्यावर आजारी पहिल्या पतीने संबंधित महिलेसाठी दुसरा पती शोधण्याची मोहीम चालू केली. अगोदर तर त्या महिलेने याला विरोध केला. पण सगळ्या गोष्टी समजून सांगितल्यानंतर या महिलेने दुसरे लग्न करण्यास संमती दर्शवली. त्यानंतर आजारी असलेल्या पतीने त्याच्या बायकोसाठी दुसर्या पतीचा शोध घेतला.
पुढे पहिला पती हयात असतानाच त्या महिलेने लग्न केले. नंतर आजारी असलेला पहिल्या पतीचे निधन झाले. या सर्व प्रसंगांची माहिती त्या महिलेने या पुस्तकात लिहून ठेवलेली आहे. हे पुस्तक सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय ठरले आहे.
