Video: माकडाला जबरदस्ती केळी खाऊ घालण्याचा प्रयत्न अंगाशी, माकडाने चिडून जे केलं, त्यावर नेटकरी अवाक

माणसांप्रमाणेच एका ठराविक काळापर्यंतच कोणताही प्राणी तुमच्या हरकती सहन करतो. पण त्यानंतर जेव्हा त्याचा संयम तुटतो, तेव्हा प्राण्यांच्या रागाचा सामना माणसांही करावा लागतो.

Video: माकडाला जबरदस्ती केळी खाऊ घालण्याचा प्रयत्न अंगाशी, माकडाने चिडून जे केलं, त्यावर नेटकरी अवाक
वारंवार त्रास देणाऱ्या व्यक्तीला माकडाचा दणका

आपल्यापैकी बरेच लोक आहेत ज्यांना प्राण्यांविषयी विशेष प्रेम असतं. पण कधी कधी माणसाचा हा स्वभाव त्याच्यासाठी अडचण ठरतो. मजे मजेमध्येच आपण कधी त्या प्राण्याला त्रास देऊ लागतो हे समजतंही नाही. बरं माणसांप्रमाणेच एका ठराविक काळापर्यंतच कोणताही प्राणी तुमच्या हरकती सहन करतो. पण त्यानंतर जेव्हा त्याचा संयम तुटतो, तेव्हा प्राण्यांच्या रागाचा सामना माणसांही करावा लागतो. (Man was forcibly feeding banana to monkey see what happened next in the video)

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये माकड पिंजऱ्यात बंद असल्याचे दिसतं. ते लोखंडी जाळीजवळ बसले आहे. दरम्यान, एक माणूस माकडाला जबरदस्तीने केळी खाऊ घालण्याचा प्रयत्न करत आहे, शिवाय, हा क्षण कॅमेऱ्यात रेकॉर्डही करत आहे. आधी हा व्यक्ती माकडाला केळी सोलून देतो, पण माकडाला त्यात इंटरेस्ट नाही. ते दुसरीकडे पाहात आहे, तरी हा व्यक्ती ऐकत नाही, आणि त्याच्यापुढे केळी करतो, तरीही माकड तोंड फिरवतं आणि केळी खात नाही. तरी हा माणूस काही केल्या ऐकत नाही आणि त्याच्या तोंडात केळी घालण्याचा प्रयत्न करतो. शेवटी माकड वैतागतं. माकडाला हे कळून चुकलं आहे की हा व्यक्ती व्हिडीओ बनवत आहे, जे त्याला कदाचित आवडलेलं दिसत नाही. त्यामुळे माकड केळीला तर काही करत नाही, पण चिडून या व्यक्तीच्या कॅमेऱ्याला जोरदार पंज मारतं, त्यानंतर व्यक्तीच्या हातातील कॅमेरा खाली पडतो. कॅमेरा खाली पडतानाही हा व्यक्ती माकडाला केळी खाऊच घालण्याचा प्रयत्न करताना दिसतो आहे.

व्हिडीओ पाहा:

हा व्हिडिओ @HoodComedyEnt नावाच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. बातमी लिहीपर्यंत 1 लाख 30 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि 13 हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. यासह, व्हिडिओवर मजेदार कमेंट्स देखील आहेत. एका व्यक्तीने लिहिले की, जबरदस्ती केल्याचा परिणाम पाहा. त्याचवेळी दुसऱ्याने लिहिले की, मला वाटते की माकडाने केळी खायला दिलेल्या व्यक्तीसोबत योग्यच केलं. या व्यतिरिक्त अनेकांनी कमेंट्स आणि इमोजीद्वारे प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बऱ्याच लोकांनी या केळी खाऊ घालणाऱ्याला फटकारलं आहे, पण असा अनुभव अनेकदा प्राणीसंग्रहालयात येतो, जिथं उत्साही नागरिक बळजबरी प्राण्यांना जे नाही ते करायला लावतात. यापूर्वी असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात एक मूल जिराफला काहीतरी खायला देत होते. पण जिराफने या वेळी मुलाला हवेत उचलले. त्यानंतर मुलाला मोठ्या कष्टाने खाली उतरवण्यात आलं होतं.

हेही पाहा:

Video | ताडोबाच्या जंगलात वाघीण-नर अस्वल आमनेसामने, झुंज कॅमेऱ्यात कैद

Video: हत्तीच्या पिलाला Z++ सुरक्षा, रस्त्यावरुन चालणाऱ्या हत्तींच्या कळपाचा व्हिडीओ पाहून नेटकरी खूश

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI