VIDEO : Manike Mage Hitheच्या गाण्याचं हिंदी ट्विस्ट; लोक म्हणाले, मूडच बदलला

Manike Mage Hithe हे गाणं या वर्षातल्या लोकप्रिय गाण्यांपैकी एक आहे. श्रीलंकन ​​गायक योहानी डिलोका डी सिल्वा(Yohani)नं गायलेल्या या गाण्याचे वेगवेगळ्या भाषांमध्ये व्हर्जन्स आली. आता एक व्यक्ती हिंदी ट्विस्टसह हे गाणं गाताना दिसतोय.

VIDEO : Manike Mage Hitheच्या गाण्याचं हिंदी ट्विस्ट; लोक म्हणाले, मूडच बदलला
Manike Mage Hithe हिंदी ट्विस्ट
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्रदीप गरड

Dec 25, 2021 | 1:56 PM

Manike Mage Hithe हे गाणं या वर्षातल्या लोकप्रिय गाण्यांपैकी एक आहे. सोशल मीडियावर येताच या गाण्यानं धुमाकूळ घातला. श्रीलंकन ​​गायक योहानी डिलोका डी सिल्वा(Yohani)नं गायलेल्या या गाण्याचे वेगवेगळ्या भाषांमध्ये व्हर्जन्स आली. भारतात हे गाणं खूप लोकप्रिय झालं. लोक त्यांच्या स्वत:च्या आवाजात हे गाणं गात स्वत:ची स्टाइल अॅड करत ऐकणाऱ्यावा वेड लावत आहेत. या गाण्यावर डान्स करूनही अनेकजण फेमस झालेत.

या गाण्याशी संबंधित सर्व व्हिडिओ तुम्हाला सोशल मीडियावर पाहायला मिळतील. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय. यामध्ये एक व्यक्ती हिंदी ट्विस्टसह हे गाणं गाताना दिसतोय.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की पहिल्यांदा योहानीच्या आवाजात हे गाणं ऐकू येतं. त्यानंतर ती व्यक्ती त्याच्या आवाजात वेगळ्या सुरात गाणं सुरू करते. लोकांना हे गाणं खूप आवडतंय. त्या व्यक्तीचा आवाजही खूप चांगला आहे आणि त्याच्या गाण्याचे बोलही…

हा जबरदस्त व्हिडिओ उद्योगपती हर्ष गोयंका यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला असून कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘2021मधला हिंदी ट्विस्ट असलेलं सर्वात चांगलं गाणं ‘Manike Mage Hithe’. व्हिडिओला 78 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. आतापर्यंत 3 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइक केलंय.

त्याचबरोबर व्हिडिओ पाहून अनेकांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरनं लिहिलं, ‘हे गाणं अप्रतिम आहे. मूड पूर्णपणे बदलला’, तर दुसऱ्या एका युझरनं लिहिलं, ‘भाषा संपूर्ण विचार बदलते’. त्याचप्रमाणं आणखी एका युझरनं कमेंटद्वारे हिंदी ट्विस्ट गाणाऱ्या गायकाचं नाव गोपाल शर्मा दिलं आहे. युझर म्हणतो, की तो एक हिमाचली सिंगर आहे, जो तुम्हाला यूट्यूबवर मिळेल.

VIDEO : न्यूझीलंडमधली कुप्रसिद्ध मांजर..! चोरते महिलांची अंतर्वस्त्रं, पोलीस म्हणतात…

VIDEO : व्हायरल व्हिडिओमधल्या या ट्रेनला आग नाही लागली, तर सजवलंय! UKमधला व्हिडिओ होतोय व्हायरल

Gabriel Boric Dog : गॅब्रिएल बोरिक यांचा कुत्रा पाहिलाय? मुलाखतीही देतो आणि लाइव्ह चॅटही करतो, पाहा व्हिडिओ

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें