काय सांगता? मच्छरांना बिअर पिणारी लोक आवडतात; अंघोळ करणाऱ्या लोकांशी वैर; रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासे
एका रिसर्चनुसार डासांना बिअर पिणारी माणसे अधिक आवडतात. तर अंघोळ करणाऱ्या, सनस्क्रीन लावणाऱ्या व्यक्तींशी त्यांचे वैर असते. नेदरलँड्समधील वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यास बरेच धक्कादायक खुलासे झाले आहेत. रिसर्चनुसार डासांबद्दल काय माहिती मिळाली जाणून घेऊयात.

तुम्ही अनेकदा पाहिले असेल की एकाच ठिकाणी बसलेल्या लौकांपैकी किंवा गर्दीपैकी काही लोकांना डास जास्त चावतात, तर काहींना फार कमी चावतात किंवा चावतही नाहीत. असे का घडते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? अलिकडेच, शास्त्रज्ञांनी या विषयावर संशोधन केले आणि त्याचे निकाल खूपच आश्चर्यकारक होते.
रिसर्चनुसार मच्छरांना बिअर पिणारी माणसं खूप आवडतात.
या रिसर्चनुसार मच्छरांना बिअर पिणारी माणसं खूप आवडतात. होय,हे थोडं विचित्रट वाटत असेल तरी देखील रिसर्चनुसार हे सत्य आहे. नेदरलँड्समधील शास्त्रज्ञांनी एक नवीन आणि मनोरंजक संशोधन केले आहे ज्यामध्ये असे दिसून आले आहे की मच्छर बिअर पिणाऱ्या लोकांना पसंत करतात. हा अभ्यास रॅडबॉड युनिव्हर्सिटी निजमेगेन येथील शास्त्रज्ञ फेलिक्स होल यांच्या टीमने केला आणि तो बायोआरएक्सिव्ह नावाच्या संशोधन प्लॅटफॉर्मवर प्रकाशित झाला आहे.
हा रिसर्च कसा करण्यात आला?
शास्त्रज्ञ बऱ्याच काळापासून हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की डास काही लोकांना इतरांपेक्षा जास्त का चावतात. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी, टीमने नेदरलँड्समधील एका प्रमुख संगीत महोत्सवात हजारो डासांवर आणि या महोत्सवात हजर राहिलेल्यांवर एक प्रयोग केला. उपस्थितांना त्यांचे हात डासांनी भरलेल्या बॉक्समध्ये घालण्यास सांगण्यात आले. त्यांचे हात संरक्षक कापडाने झाकलेले होते, ज्यामुळे डास त्यांचा वास घेऊ शकत होते परंतु त्यांना चावू शकणार नव्हते. तीन दिवसांच्या या महोत्सवात सुमारे 60,000 लोक उपस्थित होते.
500 लोकांनी डासांनी भरलेल्या बॉक्समध्ये आपले हात घातले
फेस्टिव्हल दरम्यान, सुमारे 500 लोकांनी डासांनी भरलेल्या बॉक्समध्ये आपले हात घातले. प्रत्येक प्रयोग व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करण्यात आला जेणेकरून नंतर प्रत्येक हातावर किती डास बसले आणि किती वेळ बसले हे पाहता येईल. यासोबतच, सर्व लोकांना एक प्रश्नावली भरण्यास सांगण्यात आले, ज्यामध्ये त्यांना विचारण्यात आले की ते काय खातात, काय पितात आणि त्यांची जीवनशैली कशी आहे. संशोधकांनी महोत्सवात एक पॉप-अप लॅब स्थापन केली. उपस्थितांना त्यांच्या आहार, स्वच्छता आणि वर्तनाबद्दल देखील प्रश्न विचारण्यात आले.
जेव्हा शास्त्रज्ञांनी या रिसर्चचे व्हिडिओ पाहिले तेव्हा…
जेव्हा शास्त्रज्ञांनी या रिसर्चचे व्हिडिओ पाहिले तेव्हा त्यांच्या हे लक्षात आले की बिअर पिणारे, गांजा वापरणारे आणि बेड शेअर करणारे लोक सर्वात जास्त आवडतात. संशोधन पथकाने विनोदाने असंही म्हटलं की, “आपल्यातील मजा-मस्ती करणाऱ्या लोकांना डास जास्त पसंत करतात.” दरम्यान, सनस्क्रीन लावणाऱ्या किंवा आंघोळ करणाऱ्या लोकांकडे डास जात नाहीत. त्यांना स्वच्छ, अंघोळ करणारी माणसांसी वैर असते म्हणून ते त्यांना फार कमी चावतात.
डास अशा प्रकारे त्यांचे भक्ष्य ठरवतात
जेव्हा डास चावण्यासाठी लोकांना शोधतात तेव्हा ते प्रथम त्यांना वास घेतात आणि मग ते कोणाला चावायचे हे ठरवतात. परंतु आतापर्यंत त्यांना कोणता वास सर्वात जास्त आवडतो हे पूर्णपणे माहित नाही. तथापि, संशोधनातून असे दिसून आले आहे की डासांना बिअर पिणारे लोक जास्त आवडतात, परंतु शास्त्रज्ञ फेलिक्स होल म्हणतात की हे कदाचित अल्कोहोलमुळे नाही तर त्यांच्या वर्तनातील बदलामुळे घडते. ते म्हणाले, “दारू पिणारे लोक अधिक उत्साहाने नाचतात, ज्यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान आणि घामाचा वास बदलतो आणि यामुळे डास आकर्षित होऊ शकतात”.
डासांबद्दल समजलेली माहिती नक्कीच धक्कादायक
कारण माणसांच्या ब्लडग्रुपवरही डास चावण्याची प्रक्रिया अवलंबून असते असं म्हटलं जातं. त्यामुळे बिअर पिणारे, पार्टी करणाऱ्या लोकांच्या रक्तातील त्या बिअरच्या किंवा अल्कोहोलच्या वासमुळेही डास त्या व्यक्तींकडे आकर्षित होत असावेत असंही म्हटलं गेलं. त्यामुळे हा रिसर्च खरोखरंच रंजक पद्धतीने करण्यात आल्याचं दिसून आलं आणि त्यातून डासांबद्दल समजलेली माहिती नक्कीच धक्कादायक आहे.
