Mother’s Day 2025: आई म्हणजे आधार, आई म्हणजे ध्यास… मातृदिनाच्या अशा खास शब्दात द्या शुभेच्छा
आपल्या आयुष्यातील आई ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. तिच्याशिवाय आपण काहीच नाही. कारण आई आपल्या सुख-दु:खाच्या प्रत्येक परिस्थितीत आपल्यासोबत राहते आणि आपल्याला आधार देते.

आई ही आपल्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान व्यक्ती आहे. आईशिवाय घरच नाही तर आयुष्यही अपूर्ण आहे. आई तिच्या मुलाला तिच्या पोटात ठेवण्यापासून ते आयुष्यभर आपल्या मुलाचे लाडड करत असते. कुठेतरी आईला देवाचा दर्जा दिला जातो तर कुठेतरी आईच्या पायाखाली स्वर्ग असतो. जर आई असेल तर सगळं काही आहे. बरं, सगळे दिवस आईसाठी असतात. पण आईला खास वाटावे आणि तिच्या योगदानाची आठवण व्हावी यासाठी एक दिवस आवश्यक आहे.
यासाठी सर्वत्र मातृदिन साजरा केला जातो. दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो. या दिवशी लोकं त्यांच्या आईंसाठी सप्राईज प्लॅन करतात, त्यांना भेटवस्तू देतात आणि त्यांना खास वाटावे यासाठी आईच्या आवडीची गोष्ट करतात. साधारणपणे, मुले क्वचितच त्यांच्या आईबद्दलचे प्रेम व्यक्त करू शकतात आणि त्यांच्या भावना व्यक्त करू शकतात. पण मदर्स डे तुम्हाला ही संधी देतो. या दिवशी, तुमच्या आईला फक्त मदर्स डेच्या शुभेच्छा देण्याऐवजी, तिला काही खास पद्धतीने शुभेच्छा द्या. आज या लेखात आम्ही तुम्हाला काही सर्वोत्तम कोट्स आणि शुभेच्छा सांगत आहोत जे तुम्ही तुमच्या आईंना मातृदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी पाठवू शकता किंवा म्हणू शकता.
मदर्स डे निमित्त सर्वोत्तम कोट्स
1. आईच्या कुशीत स्वर्गाचा अनुभव येतो… अशा आईला शतशः नमन आणि मदर्स डे च्या भरभरून शुभेच्छा
2. तुझं प्रेम, तुझा आधार… तू आहेस म्हणून आम्ही आहोत. हॅपी मदर्स डे
3. या कुटुंबाचे हृदय आणि आत्मा असलेल्या आईला मातृदिनाच्या शुभेच्छा.
4. आई म्हणजे श्वास, आई म्हणजे देवतेचा वास… मदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा
5. आई तुझं मोल शब्दांत व्यक्त करता येत नाही. तुझ्यामुळेच आयुष्य सुंदर वाटतं. मदर्स डे च्या प्रेमळ शुभेच्छा
6. आई म्हणजे आधार, आई म्हणजे ध्यास, आई म्हणजे आमचं जग, मदर्स डे च्या प्रेमळ शुभेच्छा
7. तुझं प्रेम, तुझा आधार… तू आहेस म्हणून आम्ही आहोत. हॅपी मदर्स डे
8. आई ही अशी व्यक्ती आहे जी न बोलताही सर्व काही समजून घेते. माझ्या लाडक्या आईला मदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा
9. ज्या स्त्रीने मला जीवन दिले, मला प्रेम शिकवले आणि मला शक्तीचा अर्थ दाखवला तिला मातृदिनाच्या शुभेच्छा.
10. तू फक्त माझी आई नाहीस, तू माझे हृदय, माझा आत्मा आणि माझे सर्वकाही आहेस. मदर्स डेच्या शुभेच्छा!
11. माझा सर्वात मोठा शिक्षक, चांगला मित्र आणि सर्वात विश्वासू समर्थक म्हणजे आई. मदर्स डेच्या शुभेच्छा
12. आईच्या मायेचं मोल नाही, तिच्या कुशीत जगाचं सगळं सुख सामावलं आहे.
13. नसते तिला विश्रांती, नसते तिला तक्रार, आई म्हणजे निरपेक्ष प्रेमाचं अमूल्य देणं अपार.
14. तुझ्या मायेनेच मला आयुष्य जगायला शिकवलं. आई, तू माझं जग आहेस. हॅपी मदर्स डे
15. माझ्या प्रत्येक यशामागे तुझं आशीर्वाद आहे. आज तुझ्या या मायेच्या दिवशी तुला खूप खूप शुभेच्छा
आई म्हणजे एक अशी व्यक्ती आहे जिला आपण कितीही धन्यवाद दिले तरी अपूरेच आहे. कारण आई ही शब्दात न मावणारी भावना आहे. तिचं प्रेम, तिचा त्याग आणि तिचं वात्सल्य आपल्याला आयुष्यभर साथ देतं. मदर्स डे म्हणजे तिच्या प्रेमाला, समर्पणाला आणि काळजीला एक छोटंसं पण हृदयस्पर्शी अभिवादन करण्याचा हा दिवस असतो.
