Video | समुद्रात जाऊन तरुणांची मस्ती, मुंबई पोलिसांनी थेट कोंबडा होऊन पळायला लावलं, व्हिडीओ व्हायरल

नियम मोडणाऱ्या तरुणांना मुंबई पोलिसांनी चक्क कोंबडा होण्यास सांगितलं आहे. (mumbai police young boy video )

Video | समुद्रात जाऊन तरुणांची मस्ती, मुंबई पोलिसांनी थेट कोंबडा होऊन पळायला लावलं, व्हिडीओ व्हायरल
मुंबई पोलिसांनी तरुणांना कोंबडा होण्याची शिक्षा दिली.

मुंबई : असं म्हणतात की मुंबई पोलीस हे कोणत्याही गुन्ह्यांची उकल करण्याची क्षमता असणारे तडफदार पोलीस आहेत. कायद्याचे उल्लंघन करुन पंगा घेण्याचा प्रयत्न केला तर मुंबई हमखास आपला इंगा दाखवतात असही म्हटलं जातं. त्याचीच प्रचिती आज पुन्हा आली आहे. नियम मोडणाऱ्या तरुणांना मुंबई पोलिसांनी चक्क कोंबडा होऊन चालण्यास सांगितलं आहे. या शिक्षेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Mumbai police punished young boy to walk like Cock video goes viral)

समुद्रात गेल्यामुळे कोंबडा होण्याची शिक्षा

मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण मुंबईमध्ये काही तरुण नियमांचे उल्लंघन करुन अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर म्हणजेच मरीन ड्राईव्हवर फिरायला जाण्याचा प्रयत्न करत होते. हा प्रकार मुंबई पोलिसांच्या लक्षात आला. त्यांनी लगेचच या तरुणांना रस्त्यावरच पकडलं आणि शिक्षा म्हणून थेट कोंबडा बनण्यास सांगितलं. एवढंच नाही तर मुंबई पोलिसांनी या तरुणांना थेट खाली बसत-बसत चालायला सांगितलं. त्यानंतर त्यांना समज देऊन सोडण्यात आलं.

मास्क न घातल्यामुळे कारवाई केली नाही

या घटनेचा व्हिडीओ काही क्षणांत व्हायरल झाला. हा व्हिडीओ ट्विटवर आल्यानंतर मास्क न लावल्यामुळे पोलिसांनी या तरुणांना ही शिक्षा दिली आहे, असा दावा अनेकांनी केला. मात्र, मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वनाथ कोळेकर यांनी व्हिडीओवर अधिकचं स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे या तरुणांना मास्क न लावल्यामुळे शिक्षा देण्यात आलेली नाही. तर जीव धोक्यात घालून अरबी समुद्रात जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांनी त्यांना कोंबडा होऊन चालायला लावलेलं आहे.

पाहा व्हिडीओ :

 

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. पोलिसांनी तरुणांना कोंबडा होऊन चालायला का लावलं याची विचारणा केली जाईल, असं स्पष्टीकरण मुंबई पोलिसांनी दिलं आहे.

इतर  बातम्या :

New Song : ‘लंडनचा राजा… इटलीची राणी…’, तुम्हाला मिळणार नव्या गाण्याची मेजवाणी

Video | होळीच्या माहोलात भांगेची नशा, मिथुन चक्रवर्तींच्या सुनेचा ‘बलम पिचकारी’वर डान्स, पाहा व्हिडीओ

Rupali Bhosale | ‘बिग बॉस’मधील टशन ते टीव्हीवरची व्हिलन, बघा संजना रिअल लाईफमध्ये ‘कुठे काय करते!’

(Mumbai police punished young boy to walk like Cock video goes viral)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI