AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लिव्ह इन,सिच्यूएशनशीपनंतर आता ट्रेंड होतेय ‘नॅनोशिप’; नात्याचा हा कोणता प्रकार?

सध्या नात्याचा एक नवा ट्रेंड पाहायला मिळत आहे. लिव्हइन रिलेशनशिपनंतर आलं बेंचिंग,सिचुएशनशिप अन् आता आला आहे 'नॅनोशिप'. नक्की याचा काय अर्थ आहे आणि यात नातं नेमकं कसं असतं? ते पाहुयात.

लिव्ह इन,सिच्यूएशनशीपनंतर आता ट्रेंड होतेय 'नॅनोशिप'; नात्याचा हा कोणता प्रकार?
nanoship meaningImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 09, 2025 | 5:23 PM

एक काळ असा होता जेव्हा नातेसंबंध, लग्न, प्रेम सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमिटमेंट या सर्व गोष्टींना फार महत्त्व होतं. लग्न म्हणजे आयुष्यभर एकमेकांसोबत राहण्याचं वचन होतं. पण आता जग पूर्णपणे बदलले आहे, आता बऱ्याच ठिकाणी अशा वचनांना आणि मुख्य म्हणजे लग्नाला म्हणावी तेवढी भावनिक बाजू राहिली नाही. याचं उदाहरण म्हणजे सोशल मीडियावर लोकप्रिय होत असलेले नात्याचे नवनवीन ट्रेंड. लिव्हइन रिलेशनशिपनंतर आलं सिचुएशनशिप, बेंचिंग अन् आता आला आहे नात्याचा नवीन प्रकार तो म्हणजे ‘नॅनोशिप’.

ट्रेंडींगमध्ये असलेला नात्याचा प्रकार म्हणजे ‘नॅनोशिप’

90 च्या दशकातील डेटिंग म्हणा किंवा प्रेम करण्याच्या वाख्येपेक्षा नवीन पिढीची डेटिंग, ज्यांना ‘जेन झी’ देखील म्हणतात त्यांची पद्धत फार वेगळी आहे. आता ‘जेन झी’ मध्ये ट्रेंडींगमध्ये असलेला नात्याचा प्रकार म्हणजे ‘नॅनोशिप’. होय आता हा ‘नॅनोशिप’ त्यांच्या डेटिंग शब्दकोशात दाखल झाला आहे. नॅनोशिप या नवीन डेटिंग टर्मचा अर्थ त्याच्या नावात लपलेला आहे, जो 90 च्या दशकातील लोकांना आश्चर्यचकित करू शकतो.

नॅनोशिप म्हणजे काय?

नॅनोशिप हे त्याच्या नावावरून समजते. येथे नॅनो म्हणजे खूप लहान आणि शीप म्हणजे नाते. या नात्यला एक लहान काळासाठीचे प्रेमसंबंध म्हणू शकतो किंवा शॉर्टटर्मसाठीचे प्रेमसंबंध म्हणू शकतो. जे थोड्या काळासाठी असते. या नात्याचा कालावधी खूप कमी असतो.जे नाते फारच कमी वेळासाठी सुरु होते आणि लगेच संपते. ते काही मिनिटे, काही तास किंवा काही दिवसांसाठी असू शकते.नवीन पिढी ही नॅनोशिप भविष्यात जास्तच आचरणात आणण्याची शक्यता आहे.

या नॅनोशिपचे उदाहरण द्यायचे म्हटलं तर, जसे एखाद्या पार्टी, मेट्रो किंवा ऑफिसच्या कार्यक्रमात, दोघांची नजरानजर होते, समोरच्याबद्दल आकर्षण निर्माण होतं. मग ते भेटतात,त्यांच्यात बोलणं होतं. अगदी प्रेमसंबंधही होतात.पण दोघांपैकी कोणीही हे नाते पुढे नेण्याचा विचार करत नाही, जे सुरू होताच संपतं. याला नॅनोशिप म्हणतात.

नॅनोशिप हा शब्द कुठून आला?

खरंतर, डेटिंग अॅप टिंडरच्या अहवालात ही नॅनोशिप आढळून आली आहे. यामध्ये 18 ते 34 वर्षे वयोगटातील 8 हजार लोकांचं सर्वेक्षण करण्यात आलं. त्यासाठी ब्रिटन, अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामधून प्रत्येकी दोन हजार लोकांची निवड करण्यात आली. ज्यामध्ये असे आढळून आले की प्रेमसंबंध इतके लहान नक्कीच ठरत नसतं कि त्याला काहीच महत्त्व नसावं. बऱ्याचदा छोट्या छोट्या गोष्टींचा हृदयावर खोलवर परिणाम होतो.

नात्यांचे बदलत जाणारे स्वरुप भयानक 

नॅनोशिपमध्ये भविष्याची अजिबात काळजी केली जात नाही. येथे रोमँटिक भावना येऊ शकतात पण त्या प्रेमापेक्षा आकर्षण मानल्या जातात. जोडप्यांमध्ये काही वेळा भावनिक किंवा शारीरिक संबंधही होत नाही. भावनिक अभावामुळे हे नाते जास्त काळ टिकत नाही. पण सध्या नात्यांचे बदलत जाणारे स्वरुप आणि प्रेमाची वाख्या पाहता पुढे हे किती भयानक रुप धारणं करू शकतं याचा विचार कुठेतरी व्हायला हवा.

भास्कर जाधवांची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी? निवृत्ती घेणार? जाहीर नाराजी
भास्कर जाधवांची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी? निवृत्ती घेणार? जाहीर नाराजी.
इराण-इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुप्रकल्पांवर बॉम्बरनं हल्ला
इराण-इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुप्रकल्पांवर बॉम्बरनं हल्ला.
वारीवरून आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, रस्ता जाम होतोय अन् जाणीवपूर्वक...
वारीवरून आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, रस्ता जाम होतोय अन् जाणीवपूर्वक....
राज यांनी समजून घेतलं पाहिजे, हिंदी सक्तीवरून भाजप नेत्यानं टोचले कान
राज यांनी समजून घेतलं पाहिजे, हिंदी सक्तीवरून भाजप नेत्यानं टोचले कान.
वाहत्या धबधब्या खाली सेल्फी काढायला गेला अन्.., थरारक व्हिडीओ
वाहत्या धबधब्या खाली सेल्फी काढायला गेला अन्.., थरारक व्हिडीओ.
मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं
मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं.
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा.
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका.
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे.
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद.