AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

100 वर्षांपूर्वीच्या पुस्तकात असे आहे तरी काय, 11 कोटी रुपये किंमत, खरेदीसाठी खासगी विमानाने आली ही व्यक्ती

Napoleon Hill Book : तर अमेरिकन लेख नेपोलियन हिल हे नाव घेताच अनेकांच्या लक्षात आले असेल की पुस्तक कोणत्या श्रेणीतील, विषयाशी संबंधित असेल. हिल यांनी अनेकांच्या मनाला मोठी उभारी दिली आहे. पण त्यांच्या पुस्तकासाठी या उद्योगपतीने 11 कोटी रुपये मोजले आहे. काय आहे विशेष?

100 वर्षांपूर्वीच्या पुस्तकात असे आहे तरी काय, 11 कोटी रुपये किंमत, खरेदीसाठी खासगी विमानाने आली ही व्यक्ती
पुस्तक खरेदीसाठी मोजले 11 कोटी
| Updated on: Jun 01, 2024 | 4:39 PM
Share

नव्या पिढीतील कित्येक जण समाज माध्यमांवर पडीक असतात. पण त्यातील थोडेच जण पुस्तक चाळतात, वाचतात. ज्यांना पुस्तक वाचणे आवडते अशांची संख्या खालावलेली नाही. पण कमी मात्र नक्कीच झाली आहे. अनेक जण आजही दुसऱ्या ठिकाणी गेले की सोबत पुस्तक ठेवतात. त्यांना पुस्तक वाचणे आवडते. प्रवासात अथवा निसर्गरम्य ठिकाणी पुस्तक वाचण्यासारखा दुसरा आनंद नाही. पण एखाद्या पुस्तकासाठी कोणी 11 कोटी रुपये मोजल्याचे तुम्हाला माहिती आहे का? आणि हे पुस्तक खरेदीसाठी कोणी खासगी विमानाने प्रवास करुन आले, यावर तुमचा विश्वास बसतो का? पण हे घडले आहे. ही पुस्तक खरेदी सध्या जगभरात कौतुकाचा विषय ठरला आहे. काय खास आहे या पुस्तकात?

100 वर्षांपूर्वींचे पुस्तक

तर हे पुस्तक 100 वर्षांपूर्वीचे आहे. हे पुस्तक लोकप्रिय अमेरिकन लेखक नेपोलियन हिल यांनी वर्ष 1925 मध्ये लिहिले होते. या पुस्तकाचे नाव ‘द लॉ ऑफ सक्सेस’ असे आहे. अमेरिकेतील इडाहो येथे राहणाऱ्या रसेल ब्रनसन या उद्योगपतीने या पुस्तकाची पहिली प्रत खरेदी केली आहे. या प्रतीवर नेपोलियन यांची स्वाक्षरी आहे. डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, रसेल यांना हे पुस्तक ऑनलाईन विक्री होणार असल्याची माहिती मिळाली. नेपोलियन यांच्या स्वाक्षरीची पहिली प्रत मिळत असल्याने त्यांना स्वतःला रोखता आले नाही. त्यांनी हे पुस्तक खरेदीचा विचार पक्का केला.

पुस्तक खरेदी नव्हती सोपी

या पुस्तकाची किंमत 1.5 दशलक्ष डॉलर म्हणजे 11 कोटी रुपयांहून अधिक होती. त्यामुळे इच्छुकांना हे पुस्तक खरेदी करणे सोपे नव्हते. रसेल यांनी हार मानली नाही. त्यांनी एक महिना विक्रेत्याचा पिच्छा सोडलाच नाही. शेवटी त्याने तडजोड केली. पण पत्नीला कसे तयार करावे हा मोठा प्रश्न होता. 11 कोटी रुपये मोजून पुस्तक खरेदी करणे हा व्यवहारी विचार नव्हताच. पण त्याने पत्नीला पण तयार केले.

खासगी विमानाने पुस्तक आणले घरी

डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, रसेल हे उद्योगपती आहेत. त्यांच्याकडे नेपोलियन हिलच्या पुस्तकांचा मोठा संच आहे. त्यांनी अनेक पुस्तकं खरेदी केली आहेत. 11 कोटी रुपये खर्चून पुस्तक आणायचे तर मग कारने कशाला जायचे? विमानाने जाऊयात, त्यामुळे या पुस्ताकाला धूळ-माती सुद्धा लागणार नाही, असा विचार रसेल यांनी केला आणि खासगी विमानाने ते हे पुस्तक घेऊन आले.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.