भारतातील ‘या’ ट्रेनमध्ये मिळते मोफत जेवण, एकही प्रवासी राहत नाही उपाशी, कोणती आहे ही ट्रेन?
भारतामधील एकमेव ट्रेन ज्यामध्ये एकही प्रवासी उपाशी राहत नाही. या ट्रेनमध्ये मिळते सर्वांना मोफत जेवण. कोणती आहे ती ट्रेन?

India Train : भारतामधील रेल्वे प्रवास हा केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्याचा मार्ग नसून अनेकदा माणुसकी, सेवा आणि बंधुभाव यांचे जिवंत उदाहरण ठरतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका विशेष ट्रेनमधील प्रवास दाखवण्यात आला आहे, जिथे प्रवाशांना मोफत जेवण दिलं जातं. विशेष म्हणजे या ट्रेनला कितीही उशिर झाला तरी ही यामधील जेवण सेवा कधीही थांबत नाही.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये जी ट्रेन दिसत आहे, ती सचखंड एक्सप्रेस आहे. जी महाराष्ट्रातील नांदेड़ येथून पंजाबमधील श्री अमृतसर साहिबपर्यंत धावते. या मार्गावरील ही एकमेव ट्रेन आहे. जिथे संपूर्ण प्रवासादरम्यान सेवादारांकडून प्रवाशांना मोफक जेवण दिलं जातं. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स म्हणजेच पूर्वीचे ट्विटरवर @Panjaab131313 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे सांगण्यात आलं आहे की, या ट्रेनमध्ये प्रवाशांची जात, धर्म, रंग किंवा आर्थिक स्थिती याबाबत कोणतीही विचारणा न करता सर्वांना समानतेने जेवण दिलं जातं. ही सेवा सिख धर्मातील ‘सेवा परमो धर्मः’ या तत्वज्ञानाचे उत्तम उदाहरण मानली जात आहे.
ट्रेन लेट असली तरी जेवण सुरु असते
अनेकदा ट्रेनला उशिर झाला की प्रवाशांना ट्रेनमध्ये खाण्यापिण्याची मोठी अडचण येते. मात्र, सचखंड एक्सप्रेसमध्ये असे चित्र पाहायला मिळत नाही. ट्रेनला कितीही तास उशिर झाला तरी जेवण सेवा अखंड सुरू असते. सेवादार पूर्ण श्रद्धा, निष्ठा आणि सेवाभावाने प्रवाशांना अन्न वाटप करतात. त्यामुळे लांबच्या प्रवासात कोणताही प्रवासी उपाशी राहत नाही.
सचखंड एक्सप्रेस ही केवळ एक ट्रेन नसून ती सेवा, समानता आणि मानवतेचे चालते-फिरते प्रतीक बनली आहे. या ट्रेनमधील जेवण सिख परंपरेतील त्या महान विचारधारेचे दर्शन घडवतो, जिथे प्रत्येक माणूस समान आहे. हे जेवण श्रीमंत-गरीब, हिंदू-मुस्लिम, सिख-ख्रिश्चन असे सर्वजण एकाच रांगेत बसून जेवण करतात.
Sachkhand Express, The Only Train From Nanded To Sri Amritsar Sahib Where Langar Is Served By Sewadaars To Sangat Travelling Without Asking Their caste, Creed Or Color.
Dhan Baba Nanak. 🙏❤️ pic.twitter.com/dMBRGv1Rgf
— Hatinder Singh🦅🦅 (@Panjaab131313) January 9, 2026
सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर प्रवाशांनी या सेवेचं मोठ्या प्रमाणात कौतुक केलं आहे. ‘हेच खरे भारताचे रूप’ असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. सचखंड एक्सप्रेसमधील ही जेवणाची सेवा आजच्या काळात माणुसकी, एकोप्याची भावना आणि निस्वार्थ सेवेचे महत्व अधोरेखित करते असेच अनेकांचे मत आहे.
